सिंगापूरमध्ये बनावट लग्नाचा ट्रेंड वाढत आहे. त्यामुळे सिंगापूरमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. इमिग्रेशन अँड चेकपॉईंट्स अथॉरिटी (आयसीए)ने म्हटले आहे की, परदेशी मुली सिंगापूरचे नागरिकत्व मिळविण्यासाठी सिंगापूरमधील पुरुषांशी लग्न करत आहेत. अशी प्रकरणे नियंत्रणात आणण्यासाठी आता कसून तपास केला जाणार आहे. ‘आयसीए’ने या चिंतेवर प्रकाश टाकत अहवाल दिला आहे की, २०२३ मधील याच कालावधीत फक्त चार प्रकरणे आढळून आली होती; परंतु २०२४ मध्ये जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान याची ३२ प्रकरणे आढळून आली.

‘आयसीए’च्या गुप्तचर विभागाचे उप-अधिकारी-प्रभारी निरीक्षक मार्क चाय यांनी अशा प्रकरणांमध्ये वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी असे नमूद केले की, यामुळे बहु-जातीय सिंगापूरमध्ये सामाजिक समस्या उद्भवू शकतात. विशेषत: जर हे परदेशी नागरिक अवैध क्रियाकलापांमध्ये गुंतले असतील. सिंगापूरमध्ये राहणे आणि काम करणे सुरू ठेवण्यासाठी त्यांच्या भेटीचा कालावधी वाढविण्याचा परदेशी लोकांचा हा मार्ग असल्याचे अनेक वृत्तांत नमूद करण्यात आले आहे. बनावट लग्न म्हणजे काय? बनावट लग्न बेकायदा आहे का? याचा ट्रेंड वाढण्याची कारणे काय? त्याविषयी जाणून घेऊ.

highest paid man in the world
तासाला दोन कोटी, तर वर्षाला १७ हजार कोटी; जगात सर्वाधिक पगार घेणारे जगदीप सिंग कोण आहेत?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Tamil Nadu CM Stalin offers $1 million prize for deciphering Indus Valley script
Indus Valley script: ५००० वर्षे प्राचीन सिंधू लिपीचा अर्थ उलगण्यासाठी १० लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर; का आहे ही लिपी महत्त्वाची?
iim bangalore student death
२९ वा वाढदिवस साजरा केला आणि विद्यार्थ्याचा काही तासातच झाला मृत्यू; IIM बंगळुरुमधील धक्कादायक घटना
isis history
न्यू ऑर्लीन्समधील हल्लेखोर इस्लामिक स्टेटचा; ‘ISIS’मध्ये कशी केली जाते तरुणांची भरती? या संघटनेचा इतिहास काय?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
What is grooming gangs and the politics elon musk
UK’s Grooming Gangs: ब्रिटनमधील हजारो मुलींचे पाकिस्तानी पुरुषांनी केले लैंगिक शोषण; एलॉन मस्क यांनी आवाज उठवताच ‘ग्रुमिंग गँग’ चर्चेत
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?

हेही वाचा : न्यू ऑर्लीन्समधील हल्लेखोर इस्लामिक स्टेटचा; ‘ISIS’मध्ये कशी केली जाते तरुणांची भरती? या संघटनेचा इतिहास काय?

बनावट लग्न म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास बनावट लग्न म्हणजे लग्नाचे नाटक. बनावट लग्नात दोन लोक लग्न करतात, ते एकमेकांवर प्रेम करतात म्हणून नव्हे, तर त्यांना कुठला तरी उद्देश साध्य करायचा असतो म्हणून. बनावट लग्न करण्याचे सर्वांत सामान्य कारण म्हणजे स्थलांतर. एखाद्याला नवीन देशात राहायचे असेल, तर तेथील नागरिकाशी लग्न करणे हा शॉर्टकट आहे. बनावट लग्नात जोडप्यातील दोन्ही व्यक्ती एकमेकांवर प्रेम असल्याचे भासवू शकतात. परंतु, खऱ्या अर्थाने बघायला गेल्यास ते एकमेकांसाठी अनोळखी असतात. एखादा उद्देश पुढे ठेवून अशा प्रकारची लग्नं केली जातात.

सिंगापूरमध्ये बनावट लग्नात सहसा परदेशी महिला सिंगापूरच्या पुरुषाला पैसे देतात. (छायाचित्र-रॉयटर्स)

सिंगापूरमध्ये नक्की घडतंय तरी काय?

सिंगापूरमध्ये बनावट लग्नात सहसा परदेशी महिला सिंगापूरच्या पुरुषाला पैसे देतात. त्यामुळे त्यांना देशात राहण्यासाठी किंवा काम करण्यासाठी परवाना मिळू शकतो, असे ‘द स्ट्रेट्स टाइम्स’ने रविवारी आपल्या वृत्तात नोंदवले. या लग्नाकडे अस्सल साथीदाराऐवजी स्थलांतराचे फायदे मिळविण्याचे साधन म्हणून पाहिले जाते. “अशा विवाहांची माहिती अनेकदा एकमेकांनी तोंडी देऊन पसरवली जाते. काही सिंगापूरचे पुरुष पैसे मिळवण्यासाठी हा मार्ग निवडतात,” असे पोलीस अधिकारी चाय म्हणाले. “परंतु ते बेकायदा आहे आणि ‘आयसीए’ अशा बाबींवर आळा घालण्यासाठी कारवाईचा ओघ वाढवत आहे,” असे ते पुढे म्हणाले. बनावट विवाहात अडकलेल्यांना १० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १०,००० डॉलर्सपर्यंतच्या दंडाचा समावेश आहे.

‘आयसीए’च्या गुप्तचर विभागातील वरिष्ठ सहायक संचालक अधीक्षक गोह वी कियाट यांनी उघड केले की, अशा प्रकारची बहुतेक प्रकरणे सार्वजनिक टिप-ऑफद्वारे आयसीएकडे नोंदवली जातात. ते म्हणाले, “आमच्या अधिकाऱ्यांनी अशा लग्नावर बंदी घालण्यासाठी कारवाई सुरू केली आहे.” त्यांनी एका सिंगापूरच्या महिलेचे उदाहरण दिले, जिला तिच्या मुलाच्या लग्नाबद्दल माहिती नव्हती. दुसऱ्या एका प्रकरणात एक पत्नी तिच्या पतीपासून वेगळी राहत असल्याचे आढळून आले, ज्यानंतर बनावट लग्नात अडकल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. गोह यांनी सर्व माहिती गोपनीय ठेवली जाईल. त्यावर जोर देऊन बनावट लग्नाच्या कोणत्याही संशयित प्रकरणांची तक्रार करण्याचे आवाहन केले. जून २०२४ मध्ये सहा व्हिएतनामी स्त्रिया आणि सिंगापूरचे सात पुरुष अशा १३ लोकांवर बनावट लग्नामध्ये कथित सहभाग असल्याचे आरोप करण्यात आले होते.

बनावट लग्नाचे पाच प्रकार कोणते?

इमिग्रेशन कायदे किंवा इतर कायदेशीर गरजा टाळण्यासाठी अनेकदा बनावट लग्न केले जातात. बनावट लग्नाचे सामान्य प्रकार खालीलप्रमाणे :

स्थलांतर संबंधित : हा कदाचित सर्वांत लोकप्रिय प्रकार आहे. यामध्ये व्यक्तींनी त्यांच्यापैकी एकाला एखाद्या विशिष्ट देशात निवास किंवा नागरिकत्व मिळवायचे असल्याने त्या दोघांचे लग्न लावले जाते. या लग्नामध्ये अस्सल नातेसंबंध नसतात.

बेनिफिट फ्रॉड : या प्रकारात व्यक्ती करकपात, गृहनिर्माण किंवा सामाजिक सुरक्षा लाभ यांसारखे फायदे मिळविण्यासाठी लग्न करतो.

व्यवसाय किंवा आर्थिक व्यवस्था : काही प्रकरणांमध्ये केवळ आर्थिक लाभ किंवा व्यावसायिक हेतूंसाठी लग्न केले जाते. त्यामध्ये संपत्ती, मालमत्ता सामायिक करण्यासाठी किंवा व्यावसायिक सौदे सुलभ करण्यासाठीच्या करारांचा समावेश असू शकतो.

लष्करी सेवा टाळणे : काही देशांमध्ये लग्न झालेल्या व्यक्तींना सक्तीच्या लष्करी सेवेतून सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे अशा जबाबदाऱ्या टाळण्यासाठीही बनावट विवाह केले जातात.

सांस्कृतिक किंवा सामाजिक दबाव : विशिष्ट संस्कृतींमध्ये विशिष्ट वयात लग्न करण्याचा महत्त्वपूर्ण दबाव असतो. त्यामुळे काही प्रकरणांमध्ये व्यक्ती कौटुंबिक किंवा सामाजिक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बनावट विवाह करू शकतात.

बनावट लग्नाचे दुष्परिणाम

कायदेशीर दंड : अनेक देशांमध्ये बनावट लग्न करण्यात गुंतणे हा एक गंभीर गुन्हा आहे, विशेषत: जेव्हा त्याचा स्थलांतरविषयक कायद्यांतून पळवाट काढण्यासाठी वापर केला जातो. या गुन्ह्यात कुणाचा सहभाग आढळल्यास, मोठा दंड व तुरुंगवास यांसह गंभीर कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

नातेसंबंधातील गुंतागुंत : बनावट लग्न केवळ थेट गुंतलेल्यांचे जीवनच गुंतागुंतीचे करत नाहीत तर खऱ्या नातेसंबंधांवरही याचे परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ- जर एखाद्या व्यक्तीने बनावट लग्नात असताना बाहेर प्रेमसंबंध जोडले, तर ते विश्वासघात, मत्सर व भावनिक वेदनांच्या भावनांसाठी कारणीभूत ठरू शकते. या परिस्थितींमुळे कुटुंबांमध्येही तणाव निर्माण होऊ शकतो; विशेषत: जर ही बाब कुटुंबाच्या नैतिक मूल्यांच्या विरोधात असेल.

विश्वास कमी होणे : बनावट लग्नात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हे उपस्थित होऊ शकतात. विश्वास कमी होणे ही बाब त्या व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रभाव टाकू शकते. सहकारी आणि नियोक्ते त्यांच्या निर्णय आणि विश्वासार्हतेबाबत प्रश्न विचारू शकतात; ज्यांचा त्यांच्या करिअरच्या संधी आणि सामाजिक संबंधांवर परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा : ‘हे’ मशीन ओळखणार तुमच्या मनातलं? त्याचा होईल फायदा की, बसेल फटका?

आर्थिक जोखीम : बनावट लग्नामध्ये अनेकदा आर्थिक करारांचा समावेश असतो; ज्याची कायदेशीर अंमलबजावणी होऊ शकत नाही. विवाद उदभवल्यास, जसे की एक पक्ष सहमत रक्कम भरण्यात अयशस्वी झाला किंवा वेळेपूर्वी व्यवस्थेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तर यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते.

भावनिक ताण : बनावट लग्न टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेली फसवणूक अनेकदा चिंता आणि तणावाचे कारण ठरते. अधिकारी, कुटुंब आणि मित्रांपासून सतत सत्य लपवणे आणि दुहेरी जीवन जगणे यांमुळे मानसिक त्रास होऊ शकतो.

Story img Loader