Pride Month 2022 Celebrations: एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायासाठी जून महिना खूप खास आहे. हा महिना प्राइड मंथ म्हणून साजरा केला जातो आणि भारतासह जगभरात प्राइड परेडचे आयोजन केले जाते. जून १९६९ मध्ये न्यूयॉर्कमधील एलजीबीटीक्यू समुदायाच्या लोकांनी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला होता. मग तिथे पोलिसांनी एलजीबीटीक्यू समुदायाच्या लोकांना पकडून, मारहाण करून तुरुंगात टाकले. तेव्हा त्यांना कोणतेही कायदेशीर अधिकार नव्हते. अमेरिकेनंतर प्राइड मंथ जगभरात साजरा केला जाऊ लागला. भारतातही तो साजरा केला जातो. भारतात प्राइड मंथ कसा सुरू झाला याचा इतिहास जाणून घ्या.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

२८ जून १९६९ रोजी, पोलिसांनी न्यूयॉर्क शहरातील सर्वात लोकप्रिय एलजीबीटीक्यू समुदायाच्या लोकांनाचा बार असलेल्या स्टोनवॉल इनवर, दारूच्या परवान्याशिवाय चालवत असल्याच्या कारणाने छापा टाकला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, १९६६ पर्यंत संपूर्ण राज्यात एलजीबीटीक्यू समुदायाच्या लोकांना दारू देणे बेकायदेशीर होते. गे बारवर छापा टाकणे हा पोलिसांच्या नित्यक्रमाचा एक भाग होता. पण यावेळी, स्टोनवॉल छाप्याची बातमी शहरभर पसरली. त्या संध्याकाळपर्यंत (२८ जून) स्टोनवॉलचे संरक्षक आणि इतर स्थानिकांसह हजारो लोक सामील झाले आणि त्यांनी सहा दिवस पोलिसांच्या क्रूरतेचा प्रतिकार केला.

हे मोठे मीडिया कव्हरेज मिळवणारे पहिले आंदोलन होते आणि त्यामुळे अनेक समलिंगी हक्क गटांची निर्मिती झाली. या घटना स्टोनवॉल दंगल म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या; आज, त्याला स्टोनवॉल उठाव, स्टोनवॉल बंड किंवा फक्त स्टोनवॉल असेही म्हणतात.

भारतात प्राइड परेडची सुरुवात कधी झाली?

भारतातील पहिली प्राइड परेड २ जुलै १९९९ रोजी कोलकत्ता येथे आयोजित करण्यात आली होती. तेव्हा त्याला कोलकत्ता रेनबो प्राईड वॉक असे म्हटले गेले. सिटी ऑफ जॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलकत्ता येथील या परेडमध्ये केवळ १५ जण सहभागी झाले होते, ज्यामध्ये एकही महिला नव्हती. त्या परेडला जवळपास २२ वर्षे झाली आहेत आणि तेव्हापासून ती देशातील अनेक राज्यांमध्ये/शहरांमध्ये आयोजित केली जाते. यामध्ये दिल्ली, मुंबई, बंगळुरू, भुवनेश्वर, भोपाळ, सुरत, हैदराबाद, चंदीगड, ओडिशा आणि डेहराडून या शहरांच्या नावाचा समावेश आहे.

बंगळुरू नम्मा प्राइड मार्च २००८ मध्ये बंगळुरू येथे आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी डिसेंबरमध्ये ही परेड आयोजित केली जाते. यामध्ये गोल्डमन सॅक्स, गुगल (Goldman Sachs, Google )आणि आयबीएम (IBM) सारख्या कॉर्पोरेट कंपन्यांचाही समावेश आहे. २००८ मध्ये, दिल्ली आणि मुंबईमध्ये प्रथमच, एलजीबीटीक्यू समुदायाने प्राइड परेड आयोजित केली होती. दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी दिल्लीत प्राइड परेडचे आयोजन केले जाते. चेन्नई येथे २००९ मध्ये पहिला चेन्नई रेनबो प्राइड आयोजित करण्यात आला होता. २०१४ साली गुवाहाटी येथे ईशान्येत प्रथमच प्राईड परेडचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हापासून ते दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केले जाते. २०१८ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकतेवरील कलम ३७ बेकायदेशीर घोषित केले. हे साजरे करण्यासाठी, एलजीबीटीक्यू समुदायाच्या लोकांनी देशभरात स्वतंत्र नागरिक म्हणून मोर्चा काढला.

LGBTQ+ म्हणजे काय?

LGBTQ म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्विअर. शेवटी असलेला प्लस पॅनसेक्सुअल, टू स्पिरीट (two-spirit), अलैंगिक आणि सहयोगी ( asexual) यासह इतर लैंगिक ओळख दर्शवतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When what is pride month why it is celebrated in june concept significance global celebrations explain ttg
Show comments