-सुशांत मोरे
मुंबई महानगरातील लोकसंख्या गेल्या काही दशकांत झपाट्याने वाढली. परराज्यातून मुंबईत स्थलांतर वाढत गेले. त्याचा भार थेट महानगरातील मेल, एक्स्प्रेस गाड्यांवरही येऊ लागला. बाहेरगावी जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना गर्दी होऊ लागली आणि त्याची संख्या वाढवण्याची मागणी दिवसेंदिवस वाढू लागली. ही मागणी पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) तसेच लोकमान्य टिळक टर्मिनसवरून (एलटीटी) गेल्या काही वर्षांत नियमित धावणाऱ्या आणि विशेष गाड्याची संख्या वाढवण्यात आली. आता या टर्मिनसची क्षमताही कमी पडू लागली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने पनवेल टर्मिनसचा पर्याय शोधाला आहे. तर परळ टर्मिनस मात्र रखडले आहे. पनवेल टर्मिनसला अंतिम स्वरूप देण्याचे काम सध्या सुरू असून २०२३मध्ये आणखी काही मेल, एक्स्प्रेस येथून सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा