नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर कधी परततील, असा ज्वलंत प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. त्यांच्या परतीच्या प्रवासात अनेक अडचणी येत असल्याचे वृत्त मध्यंतरी समोर आले होते. अंतराळस्थानकावरून ‘लाइव्ह’ झालेल्या वार्तालापात त्यांना हाच प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हा सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोघांनीही पृथ्वीवर सुरक्षित परतण्याबाबत विश्वास व्यक्त केला होता. बोईंग स्टारलायनरला काही तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने ६ जूनपासून हे दोन अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर (आयएसएस) अडकले आहेत; ज्यामुळे त्यांच्या परतीला विलंब लागतोय. अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर नक्की कधी परततील? याविषयी सुनीता विल्यम्स काय म्हणाल्या? नक्की कोणत्या कारणामुळे दोघे अद्यापही अंतराळातच आहेत? याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अगदी नवीन अंतराळयानातून अंतराळात पाठविण्यात आले होते. हे अंतराळयान नासा ऑर्बिटल आउटपोस्टवरील कर्मचाऱ्यांना घेऊन परतेल, अशी अपेक्षा होती. हे यान आठवडाभर तिथे थांबणार होते. पण, प्रवासादरम्यान थ्रस्टरमधील बिघाड आणि हेलियमच्या गळतीमुळे यान परत आलेच नाही. आतापर्यंत त्यांच्या परतीची कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. परंतु, नासाचे व्यावसायिक क्रू प्रोग्राम मॅनेजर स्टीव्ह स्टिच यांनी सांगितले की, ते लवकरात लवकर जुलैच्या अखेरीस परत येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : ‘Naked Resignation’ म्हणजे काय? चीनी तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे?

आपल्या परतीबाबत दोन्ही अंतराळवीर काय म्हणाले?

थेट प्रेस कॉलद्वारे अंतराळस्थानकावरील अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोघांशीही संवाद साधण्यात आला. स्टारलाइनर टीम आणि अंतराळयान ठीक होऊन, त्याद्वारे त्या दोघांच्या पृथ्वीवर व्यवस्थित येण्याबाबत अजूनही विश्वास आहे का, असे विचारले असता, मिशन कमांडर विल्मोर यांनी उत्तर दिले, “आम्हाला त्याबाबत पूर्ण विश्वास आहे.” सुनीता विल्यम्स म्हणाल्या, “माझ्या मनात खरोखर हीच सकारात्मक भावना आहे की, हेच अंतराळयान आम्हाला घरी आणेल.” त्या पुढे म्हणाल्या, “आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर त्या या वेळेचा आम्ही आनंद घेत आहोत. लघवीचे पुन्हा पिण्याच्या पाण्यात परिवर्तित करणाऱ्या मशीनचा पंप बदलणे आणि सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणात जीन सिक्वेन्सिंगसारखे विज्ञानाचे प्रयोग करणे यांसारखी कामे आम्ही करीत आहोत.

अंतराळयानासंदर्भातील निष्काळजीपणा

प्रक्षेपण करण्यापूर्वी अंतराळयानामधून हेलियमची थोडीशी गळती होत होती; परंतु उड्डाणादरम्यान ही गळती वाढली. इतकेच काय, स्टारलाइनरचे काही थ्रस्टर्सही निकामी झाले. त्यामुळे डॉकिंगसाठी विलंब झाला. अभियंत्यांना याची काहीही कल्पना नाही की, क्राफ्टच्या संगणकाने थ्रस्टर्सबरोबरचा आपला संपर्क का तोडला. ते सर्वच थ्रस्टर्स पुन्हा सुरू करू शकतील की नाही याचीही त्यांना खात्री नाही. एका पत्रकार परिषदेत बोईंगचे कार्यकारी मार्क नप्पी यांनी पत्रकारांना सांगितले की, जास्त फायरिंगमुळे थ्रस्टर गरम झाल्यामुळे त्याच्या कार्यशीलतेवर परिणाम होतो. हेलियमची गळती बोईंगमध्ये जाऊ नये म्हणून त्यावर सील लावले जाते; मात्र त्याचा आकार तुलनेने छोटा असतो.

हेही वाचा : भारतीय पोस्ट खात्याच्या नावे लोकांची आर्थिक फसवणूक; काय आहे हा घोटाळा? कशी टाळता येईल फसवणूक?

नासा आणि बोईंग याकडेही लक्ष केंद्रित करतात की स्टारलायनर आपत्कालीन परिस्थितीतही उड्डाण करू शकते; विशेषत: केवळ थ्रस्टर्सची समस्या असल्यास. कारण- थ्रस्टर्स अभिमुखता नियंत्रित करतात; परंतु अद्याप बरेच काही अस्पष्ट आहे. अंतराळवीरांना थ्रस्टर्सवर अवलंबून राहणे आवश्यक आहे, असे नासा अधिकारी स्टीव्ह स्टिच म्हणाले. त्यांनी सांगितले की, नासा अद्याप विल्यम्स आणि विल्मोरला स्पेसएक्स क्रू ड्रॅगनवर परत आणण्याचा विचार करीत नाही. २०१२ मध्ये स्पेस शटल प्रोग्रामच्या निवृत्तीनंतर स्पेसएक्स आणि बोईंगद्वारे क्रूड स्पेसशिप विकसित करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सचे कंत्राट देण्यात आले होते.