देशाच्या आर्थिक राजधानीच्या आकर्षणामुळे दररोज परगावातून आणि राज्यांतून मुंबई महानगरात नागरिकांचा लोंढा येतच आहे. परिणामी, मुंबई महानगरातील लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. मुंबईपासून पालघर, कसारा, कर्जत आणि पनवेलपर्यंतच्या परिसरातील लोकसंख्या सातत्याने वाढतच असल्याने वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे नेरुळ – खारकोपर – उरण हा चौथा उपनगरीय मार्ग, पनवेल – कर्जतला थेट लोकल व इतर रेल्वे मार्गिका वाढविण्याचे काम सुरू आहे. सध्या पनवेल – कर्जतदरम्यान एकच मार्ग आहे. त्यामुळे मेल, एक्स्प्रेस आणि मालवाहतूक सेवा याच मार्गावरून धावते. नागरिकांच्या सोयीसाठी कर्जत आणि पनवेलला जोडणारा रेल्वे मार्ग उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. यामुळे सीएसएमटी – कल्याण – कर्जतसह आता लवकरच सीएसएमटी – पनवेल – कर्जत असा पर्यायी मार्ग खुला होणार आहे. या प्रकल्पात सर्वात मोठा बोगदा आकाराला येत असून मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीच्या १०८ वर्षे जुन्या पारसिक बोगद्यापेक्षाही तो मोठा आहे.

पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाची आवश्यकता काय?

लोकल प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे कल्याणपलिकडील प्रवाशांचा लोकल प्रवास गैरसोयीचा होत आहे. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांना जीव धोक्यात घालून, लोकलच्या दरवाज्यावर उभे राहून प्रवास करावा लागतो. यामुळे अनेक प्रवाशांचा अपघाती मृत्यूही होतो. मर्यादित रेल्वे मार्गामुळे लोकल फेऱ्या वाढविण्यावर मर्यादा येत आहेत. प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग तयार करण्यात येत आहे. त्यामुळे कर्जतवरून कल्याणमार्गे मुंबई गाठण्याऐवजी पनवेलमार्गे मुंबई गाठणे सोयीस्कर होणार आहे. पनवेल – कर्जत दरम्यानच्या २९ किमी रेल्वे मार्गामुळे मुंबईला जाण्यासाठी आणखी एक पर्यायी मार्ग खुला होईल.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
flying squads, Thane district code of conduct , assembly election
ठाणे : आचार संहितेच्या काळात २३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त; लाखो लिटर दारू; ६ कोटींचे मोफत वाटप साहित्य; १ कोटींचे अंमली पदार्थ
Metro stopped, Metro Mumbai, MMRC Mumbai,
दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद, एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका
London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार

हेही वाचा >>>विश्लेषण: परदेशी शिष्यवृत्तीच्या नवीन धोरणाला बहुजन विद्यार्थ्यांचा विरोध का?

कर्जत हे ठिकाण महत्त्वाचे का आहे?

विविध शैक्षणिक व दळणवळणाच्या सुविधा, बाजारपेठ, शासकीय कार्यालयांसाठी कर्जत तालुका प्रसिद्ध आहे. यासह कर्जत येथे निसर्गरम्य ठिकाणे, धार्मिक स्थळे असल्याने तेथे पर्यटकांची कायम वर्दळ असते. तसेच मुंबई – पुण्याला जोडणारे कर्जत हे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे कर्जतमध्ये नागरी वस्ती वाढत आहे. आता मुंबई – कर्जत रेल्वे प्रवास सोयीस्कर होण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध होणार आहेत.

पनवेल-कर्जत दुहेरी मार्गाचे काम कोणाकडे?

मध्य रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या पनवेल – कर्जत दुहेरी रेल्वे प्रकल्पाचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) करीत आहे. एमआरव्हीसीच्या ‘मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३’ (एमयूटीपी-३) अंतर्गत या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाला २०१८ साली मंजुरी मिळाली. तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण ५६.८७ हेक्टर खासगी जमिनीपैकी ५६.८२ हेक्टर जागेचा ताबाही मिळाला आहे. ४.४ हेक्टर सरकारी जमीन संपादित करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण ९.१३ हेक्टर वन जमिनीच्या हस्तांतराला मंजुरी मिळाली आहे. यात सरकारी आणि खासगी वन जमिनीचा समावेश आहे.

हेही वाचा >>>मुलींना भुरळ घालतोय AI बॉयफ्रेंड; का ठरतोय वेगळा?

एक किमीपेक्षा जास्त लांबीचा पहिला बोगदा कोणता?

आशिया खंडातील सर्वात पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबईच्या बोरीबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते ठाणे दरम्यानच्या २१ किमी मार्गावर धावली होती. त्यानंतर १८५४ सालापासून कल्याण दिशेकडील रेल्वे मार्गाच्या विस्तारास सुरुवात झाली. मात्र, पारसिक टेकडी पार करणे अवघड होते. त्यामुळे बोगदा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. पारसिक बोगद्याच्या बांधकामाला १९०६ साली सुरुवात झाली आणि तब्बल १० वर्षांनी म्हणजे १९१६ मध्ये पारसिक बोगद्याचे बांधकाम पूर्ण झाले. हा बोगदा १.३१७ किमी लांबीचा असून भारतीय रेल्वेवरील एक किमीपेक्षा जास्त लांबीचा हा पहिला बोगदा होता. त्यावेळी तो आशियातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरला.

पनवेल-कर्जत मार्गावर किती लांबीचा बोगदा?

पनवेल – कर्जत दुहेरी रेल्वे प्रकल्पात ३,१६४ मीटर लांबीचे नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे बांधण्यात येत आहेत. यापैकी नढाल बोगद्याची लांबी २१९ मीटर, तर किरवली बोगद्याची लांबी ३०० मीटर इतकी आहे. नढाल बोगद्याच्या खोदकामास ऑक्टोबर २०२२ रोजी सुरुवात कण्यात आली आणि या बोगद्याचे काम मे २०२३ मध्ये पूर्ण झाले. सध्या या बोगद्यातील जल रोधकीकरण आणि सिमेंट-क्राँक्रिटीकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत. तर, किरवली बोगद्याच्या खोदकामास २९ सप्टेंबर २०२३ रोजी सुरुवात झाली. हे काम ३० मार्च २०२४ रोजी पूर्ण झाले. वावर्ले बोगद्याची एकूण लांबी २,६२५ मीटर असून या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. वावर्ले बोगद्याच्या खोदकामास २२ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरुवात करण्यात आली होती. या बोगद्याचे खोदकाम जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र काटेकोर नियोजनामुळे ७ जून रोजीच खोदकाम पूर्ण करून प्रकल्पाच्या यशाचा आणखी एक टप्पा गाठण्यात आला.

वावर्ले ठरणार सर्वाधिक लांबीचा बोगदा?

मध्य रेल्वेवर ठाणे – दिवादरम्यान १.३१७ किमी लांबीचा पारसिक बोगदा आहे. मुंबई महानगरातील रेल्वे मार्गावरील हा सर्वाधिक लांबीचा बोगदा असून या बोगद्यामुळे मुंबई – कल्याणमधील अंतर ९.६ किमीने कमी झाले. येत्या काळात पनवेल – कर्जत दुहेरी मार्गावरील वावर्ले बोगदा पारसिकपेक्षा दुप्पट लांबीचा बोगदा असणार आहे. या बोगद्याची एकूण लांबी २.६२ किमी इतकी आहे.

वावर्ले बोगद्याची निर्मिती कशी होत आहे?

वावर्ले बोगदा तयार करताना न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. पाण्याची गळती, खडकाचे भाग पडणे, रात्रीच्या वेळी परवानगी नसल्याने फक्त दिवसाच सुरुंग स्फोट करणे अशा समस्यांना तोंड देऊन काम करण्यात आले. प्रति महिना १७५ मीटर लांबीचे खोदकाम करून वावर्ले बोगदा तयार करण्यात आला. उत्तम प्रकाश व्यवस्था, अग्निशामक यंत्रणा आणि वायुविजन यांसारख्या अनेक आधुनिक सुविधांनी हा बोगदा सुसज्ज आहे. तसेच वावर्लेसह किरवली, नढाल या बोगद्यांमध्ये खडीविहरित रेल्वे मार्ग असेल. रेल्वे रुळांच्या खाली खडीऐवजी संपूर्ण सिमेंट कॉंक्रीटचा थर टाकण्यात येणार आहे.

पनवेल – कर्जत दुहेरी रेल्वे मार्ग कधी पूर्ण होणार?

पनवेल – कर्जत २९.६ किमी दुहेरी रेल्वे मार्गात दोन रेल्वे उड्डाणपूल, आठ मोठे पूल आणि ३६ लहान पूल बांधण्यात येणार आहेत. या मार्गिकेसाठी २,७८२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आतापर्यंत या प्रकल्पाचे ५० टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर २०२५ पर्यंत दुहेरी मार्गाचे काम पूर्ण करण्याचा संकल्प एमआरव्हीसीने सोडला आहे.

नवीन कोणती स्थानके तयार होणार?

पनवेल – कर्जत मार्गावर पाच स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे. यात पनवेल, चौक, मोहापे, चिखले, कर्जत या स्थानकांचा समावेश आहे.

लोकल प्रवासात वेळेची बचत होणार का?

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी – कर्जत धीम्या लोकलने जाण्यासाठी कमीत कमी २ तास १५ मिनिटे, तर जलद लोकलने कमीत कमी २ तास लागतात. मात्र मेल – एक्स्प्रेस, मालगाड्यांची ये-जा आणि अपुऱ्या रेल्वे मार्गामुळे कर्जत गाठण्यास नियोजित वेळेपेक्षा जास्त कालावधी लागतो. सध्या हार्बर मार्गावरून सीएसएमटी येथून पनवेलला लोकलने जाण्यासाठी १ तास २० मिनिटे लागतात. पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग कार्यान्वित झाल्यास हार्बर मार्गावरून लोकलने सीएसएमटी – पनवेल – कर्जत असा प्रवास करता येईल. या मार्गावरून प्रवासासाठी साधारणपणे १ तास ५० मिनिटे कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे २० मिनिटांची बचत होईल. तसेच भविष्यात हार्बर मार्गावरून सीएसएमटी – पनवेल जलद लोकल धावल्यास प्रवासाचा कालावधी आणखी कमी होईल.