संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि शेती संघटनेने (एफएओ) द स्टेट ऑफ वर्ल्ड फिशरीज् अँड ॲक्वाकल्चर २०२४, हा अहवाल नुकताच जाहीर केला आहे. जागतिक मत्स्य उत्पादनाचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे. त्याबाबत…

जागतिक मत्स्य उत्पादनाची सद्य:स्थिती काय?

जागतिक मत्स्य आणि जलचर उत्पादन २०२२ मध्ये १८५० लाख टनांवर पोहोचले आहे. २०२० च्या तुलनेत २०२२ मध्ये जागतिक उत्पादनात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण उत्पादनापैकी सुमारे ५१ टक्के म्हणजे ९४० लाख टन उत्पादन मत्स्य आणि जलचर शेतीतून मिळाले आहे. समुद्र आणि नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहातील मासेमारीचा वाटा ४९ टक्क्यांवर गेला असून, ९१० लाख टन उत्पादन झाले आहे. एकूण उत्पादनात समुद्रातील मत्स्य आणि जलचर उत्पादनाचा वाटा ६२ टक्क्यांवर म्हणजे ११५० लाख टनांवर गेला आहे, तर गोड्या पाण्यातील उत्पादन ३८ टक्क्यांवर म्हणजे ७०० लाख टनांवर गेले आहे. २०१९ मध्ये जगात ५३ लाख बोटी, होड्या, जहाजांद्वारे मासेमारी केली जात होती. २०२२ मध्ये ४९ लाख जहाजांद्वारे मासेमारी केली जात आहे. यापैकी दोन तृतीयांश बोटी, होड्या, जहाजे यांत्रिक आहेत. २०२२ मध्ये जागतिक मत्स्य आणि जलचर उत्पादनांची उलाढाल ४५२ अब्ज डॉलरवर गेली आहे.

Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
wpi inflation hits 4 month high in october on rising food prices
भाज्यांमधील किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाई दराचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर
loksatta analysis global foods mnc s selling less healthy products in India
बहुराष्ट्रीय खाद्य उत्पादक कंपन्या भारतात हलक्या प्रतीची उत्पादने विकतात? काय सांगतो नवा अहवाल?
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी

हेही वाचा >>>लैंगिक शक्ती वाढवणारी व्हायग्रा मेंदूसाठी ठरणार फायदेशीर? काय सांगतंय नवीन संशोधन?

जागतिक मत्स्य उत्पादनात भारत कुठे?

भारतात २०२२ मध्ये १०२ लाख टन उत्पादन झाले आहे. २०२० च्या तुलनेत ८६ लाख टनांनी उत्पादनात वाढ झाली आहे. आशिया खंडात चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच जगभरात २०२२ मध्ये १ कोटी १३ लाख २१ हजार टन गोड्या पाण्यातील मत्स्य आणि जलचर प्राण्यांचे उत्पादन झाले. त्यात भारताचा वाटा १६.७ टक्के इतका सर्वाधिक असून, २०२२ मध्ये देशात १८ लाख ९० हजार टन मत्स्य आणि जलचर प्राण्यांचे उत्पादन झाले आहे. भारतानंतर बांगलादेशचा दुसरा क्रमांक असून, ११.७ टक्क्यांसह १३ लाख २२ हजार टन उत्पादन होते. चीन तिसऱ्या क्रमांकावर असून, १०.३ टक्क्यांसह ११ लाख ६६ हजार टन उत्पादन होते. जागतिक एकूण मत्स्य आणि जलचर प्राण्यांच्या उत्पादनात गोड्या पाण्यातील उत्पादनांचा वाटा १२ टक्के आहे.

चीनची मक्तेदारी का आहे?

जागतिक मत्स्य आणि जलचर प्राण्यांच्या उत्पादनात चीनची मक्तेदारी आहे. एकूण जागतिक उत्पादनात चीनचा वाटा १४.८ टक्के इतका सर्वाधिक असून, २०२२ मध्ये चीनमध्ये एकूण १,१८,१९,००० टन मत्स्य आणि जलचर प्राण्यांचे उत्पादन झाले आहे. त्यानंतर इंडोनेशियाचा वाटा ८.६ टक्के असून, उत्पादन ६८,४३,००० टन आहे. पेरू तिसऱ्या क्रमांकावर असून, ६.६ टक्के वाट्यासह ५२,८९,००० टन आहे. रशियाचा वाटा ५.९ टक्के असून, ४७,१७,००० टन आहे. अमेरिकेचा वाटा ५.३ टक्के असून, ४२,४३,००० टन आहे. यानंतर जागतिक मत्स्य आणि जलचर प्राण्यांच्या उत्पादनात भारत ४.५ टक्के वाट्यासह सहाव्या स्थानावर असून, ३५,९७,००० टन उत्पादन २०२२ मध्ये झाले आहे. आशिया खंडात २०२२ मध्ये ८३४ लाख टन मत्स्य आणि जलचर प्राण्यांचे उत्पादन झाले. २०२० च्या तुलनेत ७७५ लाख टन उत्पादन झाले होते. त्यात ५९ लाख टनांनी मत्स्य उत्पादनात वाढ झाली आहे. आशियातील एकूण मत्स्य उत्पादनात चीन आघाडीवर आहे. आशियातील एकूण उत्पादनात ५५४ लाख टन उत्पादनाचा वाटा चीनचा आहे. २०२० च्या तुलनेत चीनमध्ये ३३ लाख टनांनी उत्पादनात वाढ झाली आहे. आशियातील उत्पादनात चीनचा वाटा २७.१ टक्के आहे. मध्य आशिया आणि पश्चिम आशियातही मत्स्य उत्पादन होते.

हेही वाचा >>>‘या’ देशात गाईंच्या ‘ढेकर’वर आकारला जायचा कर; ढेकरवर कर का लावावा लागला? आता हा निर्णय मागे का घेण्यात आला?

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनाची स्थिती काय?

गोड्या पाण्यातील मत्स्य आणि अन्य जलचर प्राण्यांच्या उत्पादनात चीन २०१९ पर्यंत अव्वल होता. २०१९ मध्ये चीनमध्ये १८ लाख ४१ हजार टन मत्स्य आणि जलचर प्राण्यांचे उत्पादन झाले होते. चीनमधील गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात यांगत्से नदीत होणाऱ्या मासेमारीचा वाटा सर्वाधिक होता. यांगत्से नदीत बेसुमार मासेमारी होऊन नदीतील जैवसाखळी आणि अनेक मत्स्य प्रजाती अडचणीत आल्या होत्या. त्यामुळे चीनच्या कृषी आणि ग्रामविकास मंत्रालयाने यांगत्से नदीत मासेमारी करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे चीनमधील गोड्या पाण्यातील मत्स्य आणि जलचरांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. केवळ यांगत्से नदीतील मासेमारी बंद असल्यामुळे चीनमधील गोड्या पाण्यातील उत्पादनात मोठी घट झाली आहे.

महासागरनिहाय मासेमारीची स्थिती काय?

एकूण जागतिक उत्पादनात पॅसिपिक समुद्राचा वाटा ४१ टक्के आहे. त्या खालोखाल आशिया आणि आशियातील गोड्या पाण्यातील मासेमारीचा वाटा ३४ टक्के आहे. अटलांटिक महासागर आणि शेजारील समुद्रातील मासेमारीचा वाटा १३ टक्के आहे. हिंदी महासागराचा वाटा सात टक्के आहे. आफ्रिका आणि आफ्रिकेतील गोड्या पाण्यातील मासेमारीचा वाटा तीन टक्के, दक्षिण अमेरिका आणि तेथील गोड्या पाण्यातील मासेमारीचा वाटा एक टक्का, युरोप आणि युरोपमधील गोड्या पाण्यातील मासेमारीचा वाटा एक टक्का, उत्तर अमेरिका आणि उत्तर अमेरिकेतील गोड्या पाण्यातील मासेमारी एक टक्के, दक्षिण ध्रुवीय महासागरातील मासेमारीचा वाटा एक टक्का आणि ओशोनिया (ऑस्ट्रेलिया आणि शेजारील देश) आणि ओशोनियातील गोड्या पाण्यातील मासेमारीचा वाटा एक टक्का आहे.

एल – निनोमुळे मत्स्य – जलचर उत्पादन घटले?

प्रशांत महासागरात २०२३-२४ मध्ये सक्रिय असलेल्या एल-निनोचा परिणाम म्हणून समुद्रातील मत्स्य आणि अन्य जलचरांचा अधिवास धोक्यात आला आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्यामुळे विविध प्रकारच्या समुद्री शैवालांच्या वाढीवर परिणाम झाला. मासे आणि अन्य जलचरांना अपेक्षित खाद्य मिळाले नाही, त्यांना अनुकूल अधिवास मिळाला नाही. माशांना पुरेसे खाद्य न मिळाल्यामुळे माशांनी स्थलांतर केल्याचे दिसून आले. अनेक प्रजातींच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम झाला. परिणामी सागरी जलचरांच्या उत्पादनातही घट झाली. अनेक मत्स्य प्रजातींच्या वाढीवरही परिणाम झाला. जगातील १९ पैकी ११ प्रमुख मत्स्य उत्पादन क्षेत्रावर एल-निनोचा प्रभाव दिसून आला. एल-निनोचे परिणाम प्रदेशनिहाय, प्रजातीनिहाय वेगवेगळे आहेत, असेही एफएओने म्हटले आहे.

dattatray.jadhav@indianexpress.com