संदीप नलावडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या हस्ते त्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ दि नाईल’ने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांना एखाद्या देशातील सर्वोच्च सन्मानाने गौरविण्याची ही १३ वी वेळ. मोदी यांना मिळालेल्या सर्वोच्च पुरस्कारांचा धांडोळा…

Sahitya Lifetime Achievement Award to dr Salunkhe and Social Work Award to Javadekar
डॉ. आ. ह. साळुंखे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर, महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे शरद जावडेकर यांना समाजकार्य विशेष पुरस्कार
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Ranji Trophy Goa Batters Highest Ever Partnership in 90 Year Old History
Ranji Trophy: ६०६ धावांची विक्रमी भागीदारी अन् गोव्याच्या २ फलंदाजांची त्रिशतकं, रणजी ट्रॉफीच्या ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!
Border-Gavaskar Trophy What is Monkeygate Controversy in Marathi
Monkeygate Controversy: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील प्रसिद्ध मंकीगेट प्रकरण काय होतं? हरभजन-सायमंड्समध्ये त्यावेळी नेमका कसा झाला वाद?
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
himachal pradesh cm sukhvinder singh sukhu
मुख्यमंत्र्यांसाठीचे सामोसे खाल्ले कुणी? CID करतेय चौकशी; राज्यभर त्याचीच चर्चा!

पंतप्रधान मोदी यांना आतापर्यंत कोणते सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाले आहेत?

नरेंद्र मोदी यांना त्यांच्या नऊ वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यापैकी १३ देशांनी त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी या नेत्याला गौरविले आहे. २०१६ मध्ये सौदी अरेबिया या देशाच्या ‘ऑर्डर ऑफ अब्दुलाझिझ अल सौद’ या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. त्याच वर्षी अफगाणिस्तानने ‘गाझी अमिर अमानुल्लाह खान’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने मोदी यांना सन्मानित केले. २०१८ मध्ये पॅलेस्टाइनने ‘ग्रँड कॉलर ऑफ दी स्टेट ऑफ पॅलेस्टाइन’ हा पुरस्कार देऊन मोदी यांचा सन्मान केला. संयुक्त अरब अमिरात (यूएई) या देशाने २०१९ मध्ये ‘ऑर्डर ऑफ झायद’ देऊन भारतीय पंतप्रधानांना गौरविले. रशियाच्या ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू’, मालदीवच्या ‘डीस्टीग्विश्ड रूल ऑफ निशान इज्जुद्दीन’, बहारिनच्या ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ दी रेनेसाँ’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारांचेही मोदी मानकरी ठरले आहेत. भूतानने २०२१ मध्ये त्यांच्या देशाच्या ‘ड्रक गायल्पो’ या पुरस्काराने मोदींना सन्मानित केले, तर याच वर्षी मे महिन्यात पापुआ न्यू गिनीच्या दौऱ्यादरम्यान रिपब्लिक ऑफ पलाऊ या देशाने ‘ईबाकी पुरस्कार’ देऊन भारतीय पंतप्रधानांचा गौरव केला. फिजीचा सर्वोच्च सन्मान ‘कम्पॅनियन ऑफ ऑर्डर’ हा पुरस्कार गेल्या महिन्यात मोदींना मिळाला. प्रशांत द्वीपराष्ट्रांच्या एकतेसाठी प्रयत्न केल्याने पापुआ न्यू गिनीने ‘कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लाेगोहू’ या पुरस्काराने मोदींचा गौरव केला.

मोदी यांना कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी सन्मानित केले?

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही देशांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले, असले तरी काही आंतरराष्ट्रीय संस्थांनीही मोदी यांचा गौरव केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ‘यू. एन. चॅम्पियन्स ऑफ दी अर्थ’ या पुरस्काराने २०१८ मध्ये मोदी यांचा सन्मान करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमांतर्गत हा पुरस्कार सार्वजनिक, खासगी क्षेत्रातील उत्कृष्ट पर्यावरणीय नेत्यांना दिला जातो. मोदी यांना धोरणात्मक नेतृत्व म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. अमेरिकेतील बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा ‘ग्लोबल गोलकीपर’ पुरस्कार मोदी यांना देण्यात आला. ‘स्वच्छ भारत अभियाना’च्या अंमलबजावणीसाठी मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. अमेरिकेच्या सशस्त्र दलाचा लष्करी पुरस्कार ‘द लीजन ऑफ मेरिट’ देऊनही मोदी यांचा गौरव करण्यात आला आहे. उत्कृष्ट सेवा आणि कामगिरीच्या अपवादात्मक गुणवत्तेसाठी तसेच परदेशी सरकारांच्या लष्करी व राजकीय व्यक्तींना हा सन्मान दिला जातो. वर्ल्ड मार्केटिंग समिट इंडिया या संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘फिलिप कोटलर प्रेसिडेंशियल ॲवार्ड’ने मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे.

‘ऑर्डर ऑफ दि नाईल’ हा पुरस्कार कशासाठी दिला जातो?

उत्तर आफ्रिकेतील इजिप्त या देशातर्फे ‘ऑर्डर ऑफ दि नाईल’ हा पुरस्कार दिला जातो. हा या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असून १९१५ पासून हा पुरस्कार दिला जातो. इजिप्तसाठी किंवा मानवतेसाठी अमूल्य सेवा देणारे राष्ट्रप्रमुख, राजपुत्र अथवा उपाध्यक्षांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. ‘ऑर्डर ऑफ दि नाईल’ हे इजिप्तच्या सार्वभौमत्वाच्या चिन्हांचा समावेश असलेल्या तीन चौकोनी आकारांच्या सोनेरी युनिट्सने बनलेले शुद्ध सोन्याचे सन्मानचिन्ह आहे.

‘ऑर्डर ऑफ दि नाईल’ हा पुरस्कार आतापर्यंत कोणत्या परदेशी व्यक्तींना मिळाला आहे?

इजिप्तचा हा सर्वोच्च सन्मान अनेकदा परदेशी नागरिकांना मिळाला आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांना १९७९ मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यता आले. त्यापूर्वी ब्रिटिश सम्राज्ञी राणी एलिझाबेथ द्वितीय यांना १९७५ मध्ये हा पुरस्कार मिळाला. सौदी अरेबियाचे राजे आणि पंतप्रधान फहद बिन अब्दुल्लाझिझ अल सौद यांना १९८९ मध्ये हा पुरस्कार मिळाला. दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. बांगलादेशचे माजी अध्यक्ष झिऊर रहमान. तत्कालीन युगोस्लाव्हियाचे माजी अध्यक्ष मार्शल जोसेफ टिटो, जॉर्डनचे राजे हुसेन यांसह अनेक जण या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार परदेशी नागरिकांना दिला जातो का?

भारतातर्फे ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला जातो. त्यानंतर पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री आदी नागरी पुरस्कार दिले जातात. भारतरत्न हा पुरस्कार आतापर्यंत दोन वेळा परदेशी नागरिकांना दिला आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले आणि ‘सरहद्द गांधी’ म्हणून ओळखले जाणारे खान अब्दुल गफारखान यांना १९८७ मध्ये भारतरत्नने सन्मानित करण्यात आले. ते पाकिस्तानचे नागरिक होते. फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि गांधीवादी नेते नेल्सन मंडेला यांना १९९० मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. पद्म पुरस्कारही अनेकदा परदेशी नागरिकांना देण्यात आला आहे. गेल्या वर्षी जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो ॲबे, आयर्लंडमधील संस्कृत अभ्यासक रुटर कॉर्टेनहॉर्स्ट, पोलंडचे भारतातील राजदूत मारिया ख्रिस्तोफर ब्यारस्की आदी व्यक्तींना भारतरत्नने गौरविण्यात आले.