मंगळवारी (४ जून) रोजी लोकसभेचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) २९३ जागा जिंकल्या, तर विरोधी भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी (इंडिया आघाडी) ने २३२ जागा मिळवल्या. यंदाच्या निवडणुकीत भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवता आले नाही, तर दुसरीकडे इंडिया आघाडीला झंझावाती यश आले. एक्झिट पोलच्या सर्व अंदाजांना झुगारून इंडिया आघाडी एक मजबूत बहुपक्षीय युती म्हणून उदयास आला आहे. विविध प्रादेशिक आणि राष्ट्रीय हितसंबंधांचा समावेश असलेली आघाडीसाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली होती.

२०२३ मध्ये २६ पक्षांच्या युतीची कल्पना होती. बिहारच्या जनता दल (युनायटेड) ने युती सोडली आणि एनडीएचा हात धरला, तर उत्तर प्रदेशच्या अपना दल (कामेरवाडी) ने असदुद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) बरोबर युती केली. तसेच, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस आता आघडीचे नाममात्र सदस्य आहेत, कारण त्यांनी निवडणुकीसाठी आघाडीच्या भागीदारांबरोबर जागावाटप केले नाही. इंडिया आघाडीतील मित्रपक्षांचा इतिहास, प्रभावाचे क्षेत्र आणि २०२४ पूर्वीच्या अलीकडील प्रमुख निवडणुकांमध्ये त्यांनी कशी कामगिरी केली याचा थोडक्यात आढावा घेऊ या.

देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
India Alliance News
INDIA Alliance : इंडिया आघाडी महाराष्ट्रातील निकालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, भाजपाने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप कायम
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Patil : “तेव्हाच सांगितलं होतं आधी निवडून तर या”, राधाकृष्ण विखेंचा बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल
Sharad Pawar On Mamata Banerjee
Sharad Pawar : ‘ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता’; शरद पवारांचं मोठं विधान

हेही वाचा : मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी ‘या’ राष्ट्रांच्या प्रमुखांना निमंत्रण, निमंत्रणांचे महत्त्व काय?

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

राज्य : राष्ट्रीय पक्ष
चिन्ह : हात
इतिहास : काँग्रेसची स्थापना १८८५ मध्ये झाली. या पक्षात सुरुवातीला ब्रिटीश सरकार विरोधात असणार्‍या भारतीय आणि ब्रिटीश लोकांचा समावेश होता. स्वातंत्र्यानंतर पक्षाने धर्मनिरपेक्षता, कल्याणवाद आणि सामाजिक न्यायाचे आदर्श मांडले.
कामगिरी : १९५२ मधील पहिल्या संसदीय निवडणुकीपासून, काँग्रेस हा एक प्रबळ राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास आला. काँग्रेसने अनेक सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या. अनेक काळ देशात काँग्रेसचे प्रभुत्व राहिले. मात्र, अलीकडच्या काळात निवडणुकांमध्ये पक्षाला फार चांगली कामगिरी करता आली नाही. २०१९ मध्ये काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत केवळ ५२ जागा जिंकल्या. ही आतापर्यंतची पक्षाची सर्वात वाईट कामगिरी. याव्यतिरिक्त, पक्ष स्वतंत्रपणे आणि युती आघाडीचा भाग म्हणून पाच राज्यांमध्ये सरकारमध्ये आहे.

आम आदमी पार्टी (आप)

राज्य : राष्ट्रीय पक्ष
चिन्ह : झाडू
इतिहास : २०१२ मध्ये आयआरएस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्ते आणि व्यावसायिकांच्या गटासह आप पक्षाची स्थापना केली. केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली, आपने कल्याणकारी उपायांवर आणि मूलभूत आरोग्य सेवा आणि शिक्षण सुविधा सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले.
कामगिरी : आपने २०१५ आणि २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आणि २०२२ च्या पंजाब निवडणुकीत मोठा विजय मिळवला. २०१९ मध्ये त्यांच्याकडे एक लोकसभा खासदार होता, ते म्हणजे सध्याचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान. राज्यसभेत त्यांचे १० खासदार आहेत.

ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (टीएमसी)

राज्ये : पश्चिम बंगाल, मेघालय, त्रिपुरा
चिन्ह : फुले आणि गवत
इतिहास : १९९८ मध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस सोडल्यानंतर टीएमसीची स्थापना केली. सुरुवातीला एनडीएचा भाग, टीएमसी पश्चिम बंगालमध्ये एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास आला. विशेषत: भूसंपादनाच्या विरोधात नंदीग्राम आंदोलनाचे नेतृत्व केल्यानंतर.
कामगिरी : राज्य निवडणुकांमध्ये, विशेषत: पश्चिम बंगालमध्ये पक्षाने उल्लेखनीय वाढ दर्शविली आहे. २०१६ आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत पक्ष बहुमताने विजयी झाला. आसाम आणि त्रिपुरासारख्या काही राज्यांमध्ये आव्हानांचा सामना करत असतानाही, टीएमसीने पश्चिम बंगालमध्ये आपला गड राखला आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना एकही जागा मिळाली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)

राज्य : महाराष्ट्र
चिन्ह : तुतारी
इतिहास : सोनिया गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तेव्हापासून त्यांनी विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रात, पक्षाला विशिष्ट स्थानावर नेऊन ठेवले. २०२३ मध्ये, शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला आणि भाजपा-शिवसेना (शिंदे) सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले. राष्ट्रवादीचे पारंपरिक पक्षाचे घड्याळाचे चिन्ह तात्पुरते अजित पवार गटाकडे गेले.
कामगिरी : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे पाच खासदार निवडून आले आणि सध्या राज्यसभेत पक्षाचे तीन खासदार आहेत. सध्या शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला राज्य विधानसभेतील राष्ट्रवादीच्या ५३ पैकी सुमारे १३ आमदार आणि अनेक खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)

राज्य : बिहार
चिन्ह : कंदील
इतिहास : ५ जुलै १९९७ रोजी जनता दलाचे लालू प्रसाद यादव आणि सुमारे २५ खासदार नवी दिल्लीत एकत्र आले आणि त्यांनी आरजेडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. जनता दलापासून वेगळं होत या पक्षाची स्थापना करण्यात आली आणि लालू यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या पारंपरिकपणे व्होट बँकेत मुस्लीम व यादव (ज्याला ‘माय’ गट म्हणतात) आणि इतर मागास गटांचा समावेश होतो.
कामगिरी : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आरजेडी आपले खाते उघडण्यात अपयशी ठरले. २०२० च्या राज्य विधानसभा निवडणुकीत पक्षाला ७५ जागा मिळाल्या. त्यांनी या निवडणुकीत २४३ पैकी १४४ जागा लढवल्या होत्या.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

राज्य : महाराष्ट्र
चिन्ह : मशाल
इतिहास : बाळासाहेब ठाकरेंनी १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना केली. गेल्या साडेपाच दशकांमध्ये शिवसेनेने एक प्रादेशिक पक्ष म्हणून राजकारणात ठसा उमटवला. बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यानंतर पक्षाचे नेतृत्व केले. २०२२ मध्ये, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी पक्षापासून फारकत घेतली आणि महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपामध्ये सामील झाले. फेब्रुवारी २०२२ मध्ये निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता दिली. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट स्थापन झाला.
कामगिरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) यांच्यासह महाराष्ट्रात महाविकास आघाडी युतीचा भाग आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या.

समाजवादी पार्टी (सपा)

राज्य : उत्तर प्रदेश
चिन्ह : सायकल
इतिहास : जनता दलापासून वेगेळे झाल्यानंतर मुलायम सिंह यादव यांनी १९९२ मध्ये या पक्षाची स्थापना केली होती. ६ डिसेंबर १९९२ रोजी झालेल्या बाबरी मशीद पाडण्याच्या काही महिन्यांपूर्वी या पक्षाची स्थापना करण्यात आली होती. आरजेडीप्रमाणेच सपाच्या प्रमुख समर्थकांमध्ये मुस्लीम, यादव आणि काही इतर मागासवर्गीयांचा समावेश आहे. या पक्षाचे नेतृत्व सध्या मुलायम यांचे पुत्र अखिलेश यादव यांच्याकडे आहे.
कामगिरी : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सपाला त्यांनी लढवलेल्या ४९ पैकी केवळ पाच जागा जिंकता आल्या होत्या. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ८० जागा आहेत. २०२२ च्या राज्य विधानसभा निवडणुकीत पक्षाने ४०३ जागांपैकी ३४७ जागा लढवल्या आणि १११ जागा जिंकल्या.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय)

राज्य : तामिळनाडू, केरळ आणि मणिपूर
चिन्ह : मक्का आणि विळा
इतिहास : २६ डिसेंबर १९२५ रोजी आधुनिक काळातील कानपूरमध्ये सीपीआय पक्षाची स्थापना झाली. हा भारतातील सर्वात जुना कम्युनिस्ट पक्ष आहे. पक्षाची स्थापना एम.एन. रॉय, त्यांची पत्नी एव्हलिन ट्रेंट, अबानी मुखर्जी आणि एम. पी. टी. आचार्य यांनी केली होती.
कामगिरी : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने ४९ जागा लढवल्या आणि त्यापैकी फक्त दोन जागा जिंकल्या. उल्लेखनीय म्हणजे, सीपीआय केरळमधील सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट (एलडीएफ) सरकारचा भाग आहे. २०२१ च्या केरळ विधानसभा निवडणुकीत एलडीएफला १४० पैकी ९९ जागा मिळाल्या.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशन (सीपीआय(एमएल)एल)

राज्य : बिहार आणि झारखंड
चिन्ह : तीन तारे असलेला ध्वज
इतिहास : सीपीआय(एमएल)एलची स्थापना २२ एप्रिल १९६९ रोजी झाली. याच दिवशी रशियन क्रांतिकारक व्लादिमीर लेनिन यांची जयंती असते. १९६७ च्या नक्षलबारी उठावानंतर हा पक्ष स्थापन झाला.
कामगिरी : २०२० च्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत, सीपीआय(एमएल)एलने १२ जागा जिंकल्या. २०१९ च्या झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला फक्त एक जागा जिंकता आली. सीपीआय(एमएल)एलकडे सध्या एकही खासदार नाही.

जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (जेकेपीडीपी)

केंद्रशासित प्रदेश : जम्मू आणि काश्मीर
चिन्ह : शाई आणि पेन
इतिहास : पीडीपीची स्थापना १९९९ मध्ये मुफ्ती मोहम्मद सईद यांनी केली होती. २००२ मध्ये पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीर राज्यात ते सत्तेवर आले. सध्या मुफ्ती यांची कन्या मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकार आहे.
कामगिरी : पक्षाला मागील सार्वत्रिक निवडणुकीत सहा जागांपैकी एकही जागा जिंकता आली नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ८७ पैकी २८ जागा जिंकल्या होत्या.

जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (एनसी)

केंद्रशासित प्रदेश : जम्मू आणि काश्मीर, लडाख
चिन्ह : नांगर
इतिहास : नॅशनल कॉन्फरन्सची स्थापना १९३२ मध्ये झाली. पक्षाने काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याची आणि १९४७ मध्ये स्वाक्षरी केलेल्या मूळ प्रवेश कराराच्या अनुषंगाने स्वायत्त दर्जाच्या मागणीची भूमिका कायम ठेवली.
कामगिरी : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एनसीने सहा पैकी तीन जागा जिंकल्या. त्यानंतर राज्याची जम्मू आणि काश्मीर, लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनर्रचना करण्यात आली.

द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके)

राज्य : तामिळनाडू, पुडुचेरी
चिन्ह : दोन पर्वतांमधून उगवणारा सूर्य
इतिहास : १९४९ मध्ये डीएमके पक्षाची स्थापना झाली. इव्हीआर पेरियार रामास्वामी यांच्या नेतृत्वाखालील द्रविडर कळघमपासून वेगळे झाल्यानंतर हा पक्ष स्थापन झाला. पक्षाचे नेतृत्व सीएन अन्नादुराई यांनी केले. त्यांनी १९६९ मध्ये त्यांच्या मृत्यूपर्यंत पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम केले. एम करुणानिधी यांनी १९६९ ते २०१८ पर्यंत पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केले. करुणानिधी यांनी पाचवेळा मुख्यमंत्रीपद भूषवल्याने पक्षाला एक विशिष्ट दर्जा प्राप्त झाला. आज पक्षाचे नेतृत्व त्यांचे पुत्र एमके स्टॅलिन करत आहेत.
कामगिरी : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत डीएमकेने राज्यातील ३९ पैकी २४ जागा स्वबळावर जिंकल्या होत्या. त्यांच्या मित्रपक्षांसह त्यांनी तामिळनाडूमध्ये ३९ पैकी ३८ जागा जिंकल्या. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीतही यश मिळवल्याने या पक्षाची सध्या राज्यातही सत्ता आहे. पुद्दुचेरीमध्ये हा प्रमुख विरोधी पक्ष आहे.

इंडियन युनियन मुस्लीम लीग (आययूएमएल)

राज्य : केरळ
चिन्ह : शिडी
इतिहास : आययूएमएलची स्थापना १९४८ मध्ये पूर्वीच्या मद्रास (आज चेन्नई) मध्ये झाली. फाळणीच्या एका वर्षानंतर ऑल इंडिया मुस्लीम लीगचे विघटन झाले. हा पक्ष १९६९ पासून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचा एक भाग आहे.
कामगिरी : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आययूएमएलकडे राज्यातील २० पैकी तीन खासदार होते. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट आघाडीला राज्यात जवळपास क्लीन स्वीप करण्यात मदत झाली. पक्षाचा एक राज्यसभा खासदारही आहे. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत आययूएमएलने राज्यातील १४० जागांपैकी १५ जागा जिंकल्या.

झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम)

राज्य : झारखंड
चिन्ह : धनुष्य आणि बाण
इतिहास : अविभाजित बिहारमधील झारखंडच्या स्वातंत्र्य चळवळीनंतर १९५० मध्ये जेएमएम पक्षाची स्थापना झाली. आदिवासींची विशिष्ट ओळख आणि संबंधित जिल्ह्यांतील त्यांचे शोषण थांबवणे ही पक्ष स्थापन करण्याची प्रमुख कारणे होती. कुर्मी नेते बिनोद बिहारी महतो यांच्या नेतृत्वाखालील शिवाजी समाज, शिबू सोरेन यांच्या नेतृत्वाखालील संथालांचा एक गट आणि मार्क्सवादी संघटना यांनी मिळून हा पक्ष स्थापन केला.
कामगिरी : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जेएमएमने राज्यातील १४ जागांपैकी एक जागा जिंकली. पक्ष सध्या राज्यात सत्तेत आहे, पक्षाकडे ८१ पैकी ३० जागा आहेत. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले हेमंत सोरेन यांना २०२४ मध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष (आरएलपी)

राज्य : राजस्थान
चिन्ह : बाटली
इतिहास : २०१८ मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकीपूर्वी अपक्ष आमदार हनुमान बेनिवाल यांनी पक्षाची स्थापना केली. सुरुवातीला त्यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएशी युती केली. मात्र, २०२४ मध्ये ते इंडिया आघाडीबरोबर आले. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये असताना त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला होता, ज्यात तीन शेती सुधारणा कायदे आणि अग्निवीर योजना यांचा समावेश होता. पक्षाला जाट समाजाचा पाठिंबा आहे.
कामगिरी : २०१८ मध्ये पक्षाने राज्य विधानसभेत तीन जागा जिंकल्या. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षाशी युती केली आणि एकच जागा जिंकली. २०१९ मध्ये त्यांनी नागौर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला.

ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक (एआयएफबी)

राज्य : पश्चिम बंगाल
चिन्ह : सिंह
इतिहास : सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा एक गट म्हणून १९३९ साली एआयएफबीची सुरुवात झाली. हा गट १९५१ मध्ये स्वातंत्र्यानंतर एक राजकीय पक्ष म्हणून स्थापन झाला.
कामगिरी : सीपीआय(एम) च्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीचा सदस्य असणार्‍या एआयएफबीच्या मतांचा वाटा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ०.०५ टक्के इतका कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पक्षाची उपस्थिती सध्या पश्चिम बंगालमधील काही पंचायतींपुरती मर्यादित आहे.

केरळ काँग्रेस (केईसी (एम))

राज्य : केरळ
चिन्ह : दोन पाने
इतिहास : केरळ काँग्रेसची स्थापना १९७९ मध्ये झाली, तेव्हापासून या पक्षात अनेकदा फूट पडली. दिवंगत के. एम. मणी यांनी पक्षाची स्थापना केली होती. मध्य त्रावणकोरच्या प्रदेशात कोट्टायम, इडुक्की आणि पठाणमथिट्टा जिल्ह्यांच्या आसपासच्या ख्रिश्चन मतदारांमध्ये त्यांचा प्रभाव होता.
कामगिरी : पक्षाकडे सध्या राज्यसभेत एक खासदार आणि लोकसभेत एक खासदार आहे. खासदार जोस के. मणी हे जो केएम मणी यांचे पुत्र आहेत. या पक्षाने २०२१ मध्ये विधानसभेच्या पाच जागा जिंकल्या. केरळ काँग्रेस पक्ष सत्ताधारी डाव्या आघाडीचा भाग आहे.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)

राज्य : राष्ट्रीय पक्ष
चिन्ह : हातोडा आणि विळा
इतिहास : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या विभाजनातून १९६४ आली सीपीआय(एम) पक्षाची स्थापना झाली होती. पश्चिम बंगाल, केरळ आणि त्रिपुरा यांसारख्या राज्यांमध्ये या पक्षाने ३४ वर्षे सरकारचे नेतृत्व केले होते. सीपीआय(एम) ने १९७७ पासून डाव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांच्या युती असलेल्या डाव्या आघाडीचे नेतृत्व केले आहे.
कामगिरी : सीपीआय(एम)ने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तीन जागा जिंकल्या, तर सध्या राज्यसभेत त्यांचे पाच सदस्य आहेत. २०११ मध्ये पश्चिम बंगालमध्ये टीएमसी सत्तेवर आल्याने त्यांचा प्रभाव कमी झाला.

क्रांतिकारी समाजवादी पक्ष (भारत)

राज्य : केरळ, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल
चिन्ह : कुदळ
इतिहास : केरळमध्ये १९७९-८० मध्ये पक्ष स्थापनेच्या वेळी डाव्या लोकशाही आघाडीचा संस्थापक सदस्य होता. २०१४ मध्ये, सीपीआय(एम) आणि सीपीआयच्या जागा वाटपाचा निषेध करण्यासाठी क्रांतिकारी समाजवादी पक्षाने डाव्या आघाडीशी संबंध तोडले.
कामगिरी : एन. के. प्रेमचंद्रन सध्या केरळमधील कोल्लममधून खासदार आहेत. त्यांचा पक्ष राज्यातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडीचा भाग आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना एकही जागा मिळाली नाही.

विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी)

राज्य : बिहार
चिन्ह : पर्स
इतिहास : मुकेश सहानी यांनी व्हीआयपी पक्षाची स्थापना केली होती. मुकेश सहानी पूर्वी बॉलीवूड चित्रपटांसाठी सेट डिझाईन करायचे. सहानी मागासवर्गीय (ईबीसी) नेते आहेत, ते स्वतःला ‘मल्लाहचा मुलगा’ म्हणतात.
कामगिरी : बिहारमध्ये २०२० च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने चार जागा जिंकल्या.

विदुथलाई चिरुथाईगल काची (व्हीसीके)

राज्य : तामिळनाडू आणि इतर दक्षिणेकडील राज्ये
चिन्ह : मुक्त चिन्ह, भांडे
इतिहास : थोलकप्पियन थिरुमावलावन यांना थोल म्हणून ओळखले जाते. थिरुमावलावन यांनी दलित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून पक्षाची स्थापना केली. त्यांची सध्या सत्ताधारी द्रमुकशी युती आहे.
कामगिरी : २०२१ च्या तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने चार जागा जिंकल्या. थोल. थिरुमावलावन हे चिदंबरम येथील खासदारही आहेत.

मारूमालारची द्रविड मुनेत्र कळघम (एमडीएमके)

राज्य : तामिळनाडू
इतिहास : एमडीएमकेचे नेतृत्व ज्येष्ठ तामिळ राष्ट्रवादी नेते वायको करतात. १९९० च्या उत्तरार्धात त्यांनी पक्षाची स्थापना केली. वायको यांनी यापूर्वी १९७८ ते १९९६ दरम्यान १८ वर्षे राज्यसभेचे खासदार म्हणून काम केले आहे.
कामगिरी : वायको २०१९ मध्ये राज्यसभेवर पुन्हा निवडून आले.

केरळ काँग्रेस (जोसेफ)

राज्य : केरळ
चिन्ह : ऑटोरिक्षा
इतिहास : केरळ काँग्रेस (जोसेफ) पक्षाची स्थापना १९७९ मध्ये पी. जे. जोसेफ आणि त्यांच्या समर्थकांनी केरळ काँग्रेसपासून विभक्त झाल्यानंतर केली. हा पक्ष प्रामुख्याने मध्य केरळमध्ये सक्रिय आहे. या पक्षाला सीरियन ख्रिश्चन आणि नायर समुदायाचा पाठिंबा आहे.
कामगिरी : केरळ काँग्रेसला लोकसभेत एकही जागा नाही, तर केरळ विधानसभेच्या दोन जागा आहेत.

आसाम राष्ट्रीय परिषद (एजेपी)

राज्य : आसाम
चिन्ह : जहाज
इतिहास : ऑल आसाम स्टुडंट्स युनियन (एएएसयू) आणि आसाम जटीयाताबाडी युबा छत्र कौन्सिल (एजेवायएसीपी) या दोन विद्यार्थी राजकीय संघटनांच्या विलीनीकरणाच्या रूपात आणि सीएए विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये एजेपीची स्थापना झाली.
कामगिरी : पक्षाने २०२१ च्या विधानसभा निवडणुका अखिल गोगोई यांच्या नेतृत्वाखालील रायजोर दलाशी युती करून लढल्या आणि एकही जागा जिंकली नाही.

हेही वाचा : इंडिया आघडीने संसदेत विरोधी बाकावर बसणे का निवडले? विरोधकांचं पुढचं पाऊल काय असेल?

कोंगुनाडू मक्कल देसिया काची (केएमडीके)

राज्य : तामिळनाडू
चिन्ह : हिरव्या, पिवळ्या आणि लाल पट्ट्यांसह दोन ध्वज
इतिहास: केएमडीकेची स्थापना ईआर ईस्वरन यांनी २०१३ मध्ये केली. पश्चिमेकडील जिल्ह्यांमधील आणि तामिळनाडूच्या कोंगुनाडू प्रदेशात या पक्षाला पाठिंबा आहे.
कामगिरी: पक्षाचे सध्या विधानसभेत तीन आमदार आणि लोकसभेत एक खासदार आहे. हा पक्ष डीएमकेच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडीचा एक भाग आहे. राज्य विधानसभेत सध्या पक्षाचे नेते एमएच जवाहिरुल्ला यांच्यासह दोन आमदार आहेत.

Story img Loader