मंगळवारी (१६ मे २०२३) कर्नाटक उच्च न्यायालयाने रमी हा खेळ जुगारामध्ये मोडत नाही, असा निकाल दिला. भारतात कौशल्याने खेळला जाणारा रमी हा खेळ मूलतः भारतीय नाही. कर्नाटक सरकारच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रमी खेळाच्या इतिहासाविषयी जाणून घेऊया…

कथा रमीच्या उत्पत्तीची

रमी हा पत्त्यांचा पारंपरिक खेळ आहे. भारतभरामध्ये रमी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने हौसेने खेळणारे बरेच लोक आहेत. रमी या खेळाची सुरूवात नेमकी कधी आणि कुठे झाली, हे सांगणारे विविध संदर्भ दिसतात. डेव्हिड पार्लेट यांच्या दे पेंग्विन बुक ऑफ कार्ड गेम्स (१९७८) या पुस्तकानुसार, मेक्सिकन काँक्विअन आणि चिनी महाजाँग या खेळात रमीची बीजे आहेत.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Arjun Erigaisi
व्यक्तिवेध : अर्जुन एरिगेसी
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Rohit Sharma Statement on Mohammed Siraj and Travis Head Fight in IND vs AUS 2nd Test
IND vs AUS: “मर्यादा ओलांडायला नको…”, रोहित शर्माने सिराज-हेडच्या वादात भारतीय गोलंदाजाची घेतली बाजू, सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य

‘द ब्रिज’ या क्रीडा संकेतस्थळाने रमीच्या उत्पत्तीसंदर्भात तीन सिद्धांत मांडले आहेत. त्यातील एक सिद्धांत रमी खेळाची निर्मिती चीनमध्ये झाली, असे सांगतो. चीनमध्ये खान्नू हा रमीशी साधर्म्य साधणारा पत्त्यांचा खेळ होता. तसेच चीनमध्ये हजारो वर्षांपासून माहजाँग हा पत्त्यांचा खेळ खेळला जात असे. माहजाँग हा खेळ रमीप्रमाणेच असल्याचे दिसते. पत्ते निवडण्याचे आणि पत्ते टाकण्याचे तंत्र समान आहे. दोन पेक्षा जास्त खेळाडू असल्यास पत्त्यांचे दोन संच आणि जोकरचा वापर या गोष्टी समान असल्याचे दिसून येते. तेव्हाचे पत्ते हे आताच्या प्रिंटेड पत्त्यांसारखे नव्हते. रंगीत आणि विशिष्ट चिन्हांकित कार्ड्स तेव्हा वापरली जात असत.

दुसऱ्या सिद्धांतानुसार मेक्सिकोमध्ये या खेळाचा उदय झाला. नंतर रमीचे लोण अमेरिकेमध्ये पोहोचले. अमेरिकेमध्ये या खेळाला काँक्विअन म्हटले जायचे. काँक्विअन खेळाप्रमाणेच व्हिस्की पोकर नावाचा पत्त्यांचा एक खेळ होता. हा खेळ रमीशी साधर्म्य साधणारा होता. त्यामुळे रमी खेळाच्या उत्पत्तीसंदर्भात अमेरिकेने हा खेळ अमेरिकन असल्याचा दावा केला होता. ‘व्हिस्की पोकर’ हा खेळ नंतर ‘रम पोकर’ आणि अंतिमतः रमी म्हणून ओळखण्यात येऊ लागला. ‘रम’ या मद्यावरून ‘रम पोकर’ आणि मग रमी हे नाव मिळाले आहे. या खेळाची निर्मिती मद्यपींसाठी झाली होती, असे अमेरिकेचे मत होते.

तिसऱ्या सिद्धांतानुसार रमीची सुरुवात स्पेनमध्ये झाली. १९व्या शतकात स्पॅनिश लोकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केल्यावर या खेळाचा अधिक प्रसार झाला. रमी शब्दाची एक व्युत्पत्ती सांगितली जाते ती म्हणजे हा शब्द ब्रिटिशांनी निर्माण केला आहे. ब्रिटानिका शब्दकोशानुसार ‘रम’ म्हणजे विषम असा होतो. या खेळात असणाऱ्या काही विषम नियमांवरून त्यांनी ‘रमी’ हे नाव दिले, असेही म्हटले जाते.

हेही वाचा : विश्लेषण : वादळांची नावे कशी ठरतात ? अमेरिकेने सागरी वादळांना का दिली महिलांची नावे ?

भारतीय पत्ते

क्रीडा अभ्यासिका आणि संशोधिका सरला चोप्रा यांनी गंजिफांवर संशोधन केले. त्यांच्या संशोधनानुसार गंजिफा हा एक प्राचीन भारतीय पत्त्यांचा खेळ आहे. हा खेळ रंगीत आणि चिन्हांकित पत्त्यांसह खेळला जातो. गंजिफा हे नाव ‘गंजिफेह’ या पर्शियन नावावरून आले आहे, ज्याचा अर्थच पत्ते खेळणं असा होतो. गंजिफा खेळाच्या उत्पत्तीवरून वाद आहेत. हा खेळ मोठ्या प्रमाणात अरब देशांमध्ये, तसेच चीनमध्ये खेळला जात असे, अशी नोंद आहे. १६ व्या शतकात पर्शियनांबरोबर हा खेळ भारतात आला, असे म्हटले जाते. त्यानंतर मुघल काळात तो खूप लोकप्रिय झाला. नंतर मात्र या खेळाची घसरण झाली आणि आज तो विस्मृतीत गेला आहे. गंजिफा हा खेळ एके काळी भारतातील म्हैसूर, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर खेळला जात होता.

हेही वाचा : विश्लेषण : भारतीय निवडणूक पद्धतीवर श्रीलंकेचा प्रभाव ? जाणून घ्या निवडणूक चिन्हांचा रंजक इतिहास

भारतीय पद्धतीच्या पत्त्यांची रचना

गंजिफाचे पत्ते विविध पद्धतीने तयार केले जात असत. राजघराण्यांसाठी हस्तिदंतांपासून पत्ते केले जात. तर सामान्यांसाठी लाकूड, कागद किंवा ताडाची पाने यांपासून पत्ते केले जात. हा खेळ भारतात आला तेव्हा गोलाकार आणि आयताकृती आकाराचे पत्ते उपलब्ध होते. आता गंजिफाचे पत्ते गोलाकृती असतात, ते वगळता बाकी सर्व खेळांमध्ये आयताकृती पत्त्यांचाच वापर होताना दिसतो. या पत्त्यांचे संच ९६ ते ६०० पत्ते असणारे होते. हे पत्ते किलवर, इस्पिक, बदाम आणि चौकट एवढ्यापुरते मर्यादित नव्हते. हिंदू राजे, धर्मग्रंथ, मुघल काळातील काही चिन्हे, शुभ चिन्हे यांचा समावेश या पत्त्यांवर असे. पत्ते हे केवळ खेळापुरते मर्यादित न राहता त्यांना त्यांना सांस्कृतिक स्वरूप दिले गेले.

हेही वाचा : विश्लेषण : दुसऱ्या महायुद्धातील भारत आणि ‘कोका कोला’चे स्थान

रमी आणि जुगार

मुळात रमी हा पत्त्यांचा एक खेळ आहे. रमीचे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकीकरण करण्यात आले. ऑनलाईन प्लॅटफॉर्म्समुळे आणि बक्षिसांच्या आमिषांमुळे रमी खेळाला प्रसिद्धीचे वलय प्राप्त झाले. बक्षीस किंवा एखाद्या गोष्टीचे आमिष दाखवून खेळणे हे जुगार खेळण्यासारखे असते, या नियमानुसार रमी हा जुगार आहे असा दावा करण्यात आला. परंतु, कर्नाटक न्यायालयाने रमी हा जुगार नसल्याचे सांगितले. रमी हा खेळ ऑनलाईन किंवा ऑफलाईन खेळता येतो. रमी खेळण्यासाठी बक्षीस किंवा कोणत्याही प्रलोभनाची गरज नसते. त्यामुळे रमी हा जुगार आहे, असे म्हणता येत नाही, असे कर्नाटक न्यायालयाने सांगितले. न्यायमूर्ती कुमार म्हणाले की,’सट्टा’ आणि ‘अटी’ लावून खेळले जाणारे खेळ हे सर्वच जुगार नसतात. भादंवि कलम २ (१७) नुसार कौशल्यपूर्ण असणारे खेळ हे जुगार, सट्टेबाजी या प्रकारात मोडत नाहीत.

आज ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या रमी खेळालासुद्धा २००-३०० वर्षांचा इतिहास असून हा मनोरंजन आणि कौशल्यांना चालना देणारा खेळ, ठरला आहे.

Story img Loader