पृथ्वीच्या उदरात अशा अनेक गोष्टी आहेत; ज्यांची मानवाला कल्पना नाही. उत्खनन करताना प्राण्यांचे सांगाडे, पुरातन वस्तू आढळल्याचे आपण ऐकलेले आहे. मात्र, फ्रान्सच्या वैज्ञानिकांना संपूर्ण जगासाठी महत्त्वाच्या ठरू शकणाऱ्या गोष्टी भूगर्भात आढळल्या आहेत. या शोधामुळे समस्त जगाचे लक्ष फ्रान्सकडे वळले आहे. फ्रान्सच्या वैज्ञानिकांना जे आढळले आहे, त्याला ‘व्हाइट हायड्रोजन’ म्हटले जाते. याच पार्श्वभूमीवर व्हाइट हायड्रोजन म्हणजे नेमके काय आहे? त्यामुळे मानवाला नेमका काय फायदा होणार? व्हाइट हायड्रोजनचा शोध नेमका कसा लागला? या सर्व बाबी जाणून घेऊ या…

मिथेनचे मूल्यांकन करताना आढळला व्हाइट हायड्रोजन

फ्रान्सच्या दोन शास्त्रज्ञांनी भूगर्भात व्हाइट हायड्रोजन असल्याचा शोध लावला आहे. खरे म्हणजे ते ईशान्य फ्रान्समध्ये जीवाश्म इंधनाच्या शोधात खोदकाम करीत होते. मात्र, खोदकाम करताना त्या भागात त्यांना व्हाइट हायड्रोजनचा साठा असल्याचे आढळले. मिळालेल्या माहितीनुसार जगात आतापर्यंत आढळलेल्या व्हाइट हायड्रोजन साठ्यांच्या तुलनेत या ठिकाणी सर्वाधिक व्हाइट हायड्रोजन आहे. हे प्रमाण ६ ते २५० दशलक्ष मेट्रिक टन असण्याची शक्यता आहे.

Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली
pune wagholi accidents loksatta news
पुण्यात ‘या’ रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास, प्रवाशांसाठी का ठरतोय जीवघेणा?
Daily petrol diesel price on 23 December
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात ‘इतक्या’ रुपयांनी वाढले पेट्रोल-डिझेलचे दर! पाहा तुमच्या शहरांत काय सुरु आहे इंधनाची किंमत
Palm oil shortage will lead to increase in edible oil prices
पामतेलाच्या तुटवड्यामुळे खाद्यतेलाची दरवाढ होणार?

व्हाइट हायड्रोजन हे नाव कसे पडले?

व्हाइट हायड्रोजन हा भूगर्भात असतो. त्याला ‘गोल्ड’, ‘नॅचरल’, ‘जिओलॉजिओ’ हायड्रोजन, असेही म्हटले जाते. व्हाइट हायड्रोजनच्या उत्पादनादरम्यान प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या कोणत्याही हरित वायूचे उत्सर्जन होत नाही. त्यामुळे या हायड्रोजनला ‘व्हाइट हायड्रोजन’ म्हटले जाते.

आणखी वाचा-त्रिपुरा-बांगलादेश रेल्वे प्रकल्पामुळे कोणते लाभ होणार? बांगलादेशमधून जाणाऱ्या प्रकल्पासाठी भारताने निधी का दिला?

अनेक देशांत आढळला व्हाइट हायड्रोजनचा साठा

पृथ्वीतलावर हायड्रोजन या घटकाचे प्रमाण सर्वाधिक आहे. असे असले तरी हा घटक वेगवेगळ्या घटकांसोबत संमिश्र स्वरूपात आढळतो. माली येथे २०१८ साली खोदकाम करताना व्हाइट हायड्रोजनचा मोठा साठा आढळला होता. त्यानंतर व्हाइट हायड्रोजन हा संशोधकांत कायमच चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. आतापर्यंत जगभरात अमेरिका, ओमान, माली, पूर्व युरोप, रशिया, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स अशा अनेक देशांत व्हाइट हायड्रोजनचा साठा आढळलेला आहे.

फ्रान्समधील व्हाइट हायड्रोजनचा शोध कसा लागला?

फ्रान्सच्या लोरेन या भागातील खाणक्षेत्रात मिथेनचे प्रमाण किती आहे, याचा अभ्यास करण्यात येत होता. जॅक पिरोनॉन व फिलिप दे डोनाटो या दोन शास्त्त्रज्ञांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र यावेळी जसजसे खोदकाम करण्यात आले, तसतसे या भागात व्हाइट हायड्रोजन असल्याचे या शास्त्रज्ञांच्या निदर्शनास येऊ लागले. विशेष म्हणजे भूगर्भात साधारण ११०० ते २५० मीटर खोल खोदकाम केल्यानंतर व्हाइट हायड्रोजनचे प्रमाण १४ ते २० टक्क्यांपर्यंत असल्याचे या शास्त्रज्ञांना आढळले. या शोधानंतर संपूर्ण जगाचे लक्ष फ्रान्सने वेधले आहे. कारण- सध्या अस्तित्वात असलेल्या व्हाइट हायड्रोजनच्या साठ्यांपैकी फ्रान्समध्ये आढळलेला हा साठा सर्वाधिक आहे. याच कारणामुळे हा शोध ऊर्जा क्षेत्राच्या दृष्टीने फार महत्त्वाचा मानला जात आहे.

आणखी वाचा-विश्लेषण : आयडीबीआय बँकेकडून मुंबई मेट्रो वनला दिवाळखोरी प्रकरणात कोर्टात खेचण्याचे कारण काय?

हायड्रोजनचे वेगवेगळे प्रकार

याआधी एवढ्या मोठ्या प्रमाणात हायड्रोजनची निर्मिती फक्त प्रयोगशाळेतच करता येऊ शकते, असे शास्त्रज्ञांना वाटायचे. मात्र, फान्समध्ये लागलेल्या शोधानंतर कोणतीही ऊर्जा खर्च न करता, नैसर्गिकरीत्या हायड्रोजनची निर्मिती होऊ शकते, असे शास्त्रांना आता उमजले आहे. इलेक्ट्रोलायसिसच्या मदतीने प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ करड्या आणि हरित हायड्रोजनची निर्मिती करू शकतात. हायड्रोजनचे राखाडी, तपकिरी, निळा, हरित हायड्रोजन असे वेगवेगळे प्रकार आहेत.

व्हाइट हायड्रोजनला खजिना का म्हटले जात आहे?

व्हाइट हायड्रोन हा हरित ऊर्जास्रोत आहे. म्हणजेच कोणत्याही हरित वायूचे उत्सर्जन न करता तो ऊर्जानिर्मिती करू शकतो. ग्रीन हायड्रोजनच्या तुलनेत व्हाइट हायड्रोजन अधिक किफायतशीर आहे. ग्रीन हायड्रोजनची किंमत प्रतिकिलो सहा डॉलर आहे; तर व्हाइट हायड्रोजनची किंमत प्रतिकिलो साधारण एक डॉलर पडते. व्हाइट हायड्रोजनचा मानवाला खूप उपयोग होऊ शकतो. सध्या हायड्रोजनच्या मदतीने ऊर्जानिर्मिती केली जाते. त्यासाठी काही ठिकाणी हरित ऊर्जा प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी हायड्रोजनचा शोध घेण्यासाठी भूगर्भात खोदकाम केले जात आहे. अमेरिकेतील कोलोममा व ऑस्ट्रेलियातील गोल्ड हायड्रोजन यांसारख्या संस्था हे काम करीत आहेत. दक्षिण ऑस्ट्रेलियातील यॉर्क द्वीपकल्पात हायड्रोजनचा साठा आढळला होता. त्यानंतर या भागात इतर ठिकाणी हायड्रोजनचा शोध घेण्याची मोहीम राबवली जात आहे.

आणखी वाचा-विश्लेषण : उद्ध्वस्त, विदीर्ण गाझात तेथील आरोग्य खाते काम कसे करते? जखमींची, बळींची संख्या कशी मोजते?

ऊर्जानिर्मिती केल्यास प्रदूषण होत नाही

सौर आणि वायू उर्जेच्या तुलनेत व्हाइट हायड्रोजनच्या माध्यमातून अधिक हरित ऊर्जा मिळवता येते. कारण- ऊर्जानिर्मितीदरम्यान व्हाइट हायड्रोजनमधील हायड्रोजनचे ज्वलन झाल्यानंतर फक्त पाणी तयार होते. व्हाइट हायड्रोजनच्या ज्वलनामुळे प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या कोणत्याही घटकाचे उत्सर्जन होत नाही. व्हाइट हायड्रोजनचा पोलादनिर्मिती, शिपिंग, विमान वाहतूक अशा अनेक क्षेत्रांत हरित ऊर्जास्रोत म्हणून वापर करता येतो.

फ्रान्समध्ये आढळळेल्या या व्हाइट हायड्रोजनचा वापर ऊर्जानिर्मितीसाठी करता येऊ शकतो. तसे झाल्यास फ्रान्ससह अनेक देशांना ऊर्जा पुरवली जाऊ शकते. सध्या जगभरात ऊर्जेचे संकट निर्माण झालेले आहे. असे असताना फ्रान्समध्ये आढळलेला हा व्हाइट हायड्रोजनरूपी खजिना जगासाठी वरदान ठरू शकतो.

Story img Loader