भारतीय नौदलातील ९ निवृत्त अधिकाऱ्यांना कतारच्या न्यायालयाने थेट मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली असून भारतानेदेखील या निर्णयावर आक्षेप व्यक्त केला आहे. या अधिकाऱ्यांना नेमके अटक का करण्यात आले? तसेच त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा का सुनावण्यात आली? हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र भारतीय लष्करात सेवा देऊन निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना थेट मृत्युदंडाची शिक्षा मिळाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मृत्युदंडाची शिक्षा मिळालेले नौदलातील हे आठ अधिकारी कोण आहेत? हे जाणून घेऊ या…

भारतीय नौदलातील आठ माजी अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा का ठोठावण्यात आली, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र हेरगिरीच्या आरोपात न्यायालयाने हा निकाल दिल्याचे म्हटले जात आहे. हे वृत्त देशभरात पसरल्यानंतर भारतीय परराष्ट्र खात्याने प्रतिक्रिया दिली. “मृत्युदंडाची शिक्षा ऐकून आम्हाला धक्का बसला आहे. आम्ही उपलब्ध सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध घेत आहोत,” असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

Sharad Ponkshe present on the platform of MNS meeting in Thane news
शिंदेचे स्टार प्रचारक शरद पोंक्षे मनसेच्या व्यासपीठावर
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
ajit ranade resigned
गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांचा राजीनामा
Shubman Gill Overtakes Cheteshwar Pujara
Shubman Gill : शुबमन गिलने चेतेश्वर पुजाराला मागे टाकत केली खास कामगिरी, रोहित शर्माच्या स्पेशल क्लबमध्ये झाला सामील
Anil Deshmukh
मनसुख हिरेनच्या हत्येची कल्पना फडणवीसांना होती! अनिल देशमुख यांचे प्रत्युत्तर
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Shrikant Eknath Shinde candid speech regarding Kalyan Gramin decision
कल्याण ग्रामीणचा निर्णय वरिष्ठांचा ! खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती
ex bjp mla prabhudas bhilawekar in melghat assembly constituency
मेळघाटात भाजपमध्‍ये बंडखोरी…. माजी आमदाराची रिंगणात उडी….

मृत्यूदंडाची शिक्षा मिळालेले नौदलाचे निवृत्त अधिकारी कोण आहेत?

कॅप्टन नवतेज गिल (निवृत्त)

कॅप्टन गिल हे मूळचे चंदिगडचे आहेत. त्यांचे वडील लष्करात अधिकारी होते. गिल यांना राष्ट्रपती सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये (डीएसएससी) सेवा दिलेली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत आयएनएस विक्रांतवर तैनात असताना मोलाची कामगिरी केली होती. ते या विमानवाहू जहाजावर नेव्हिगेटिंग ऑफिसर होते. १९७१ सालच्या भारत-पाक युद्धादरम्यान आयएएनस प्रबलच्या सहाय्याने कराची बंदरावर बॉम्बफेक करण्यात आली होती. या जहाजाचेही त्यांनी नेतृत्व केलेले आहे.

कमांडर सुगुनाकर पाकला (निवृत्त)

कमांडर सुगुनाकर पाकला हे कोरुकोंडा सैनिकी शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. ते नौदलात इंजिनिअरिंग ऑफिसर होते. त्यांना नौदलातील कमांडर ईन चिफ यांच्याकडून विशेष पुरस्कार मिळालेला आहे. नौदलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडमध्ये काही काळासाठी काम केले होते.

कॅप्टन सौरभ वशिष्ठ (निवृत्त)

कॅप्टन सौरभ वशिष्ठ हे नौदलात इंजिनिअरिंग ऑफिसर होते. त्यांना कमांडर ईन चिफ यांच्याकडून चांगल्या कामगिरीसाठी दोन वेळा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी डीएसएससी, वेलिंग्टन तसेच सिकंदराबाद येथील कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट येथून लष्करविषयक शिक्षण घेतलेले आहे. दक्षिणेकडील नेव्हल कमांडचे ते कमांडर रेफिट ऑफिसर होते. त्यांनी आयएनएस मगर, आयएनएस कुलिश, आयएनएस खंजर या लढाऊ जहाजांवर कर्तव्य बजावलेले आहे. तसेच भारतीय तटरक्षक दलाच्या संग्राम या जहाजारवरही त्यांनी सेवा दिलेली आहे. ते मुळचे देहरादूनचे आहेत.

कमांडर पूर्णेंदू तिवारी (निवृत्त)

कमांडर पूर्णेंदू तिवारी हे नेव्हिकेशन स्पेशालिस्ट आहेत. ते आयएनएस मगर या लढाऊ जहाजाचे कमांडर होते. यासह नौदलाच्या इस्टर्न फ्लिटमध्ये त्यांनी नेव्हिगेटिंग ऑफिसर म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. त्यांनी राजपूत क्लास डिस्ट्रॉयरवरही कर्तव्य बजावलेले आहे. नौदलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सिंगापूर येथे नौदलाच्या जवानांना प्रशिक्षण देलेले आहे. त्यानंतर ते कतारमध्ये गेले होते. प्रवासी भारतीय सन्मान पुरस्काराने सन्मानित झालेले ते पहिले लष्करी अधिकारी आहेत. २०१९ साली तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. अटक होण्यापूर्वी ते कतारच्या नौदलातील जवानांना प्रशिक्षण देत होते.

कॅप्टन बीके वर्मा (निवृत्त)

कॅप्टन बीके वर्मा हे नेव्हिगेशन स्पेशालिस्ट आहेत. त्यांनी गोदावरी क्लास शीपवर आपली सेवा दिलेली आहे. स्टाफ कॉलेजच्या अभ्यासक्रमात ते पहिले आले होते. बीके वर्मा यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नीदेखील लष्कराशी संबंधित आहेत.

कमांडर अमित नागपाल (निवृत्त)

कमांडर अमित नागपाल हे नौदलात कम्यूनिकेशन स्पेशालिस्ट होते.

कमांडर एसके गुप्ता (निवृत्त)

कमांडर एसके गुप्ता हे नौदलात अधिकारी होते. गनरीमध्ये त्यांना विशेष प्राविण्य होते.

राजेश

राजेश हे नौदलात नाविक होते. राजेश हे एकमेव नॉन-कमिशन्ड ऑफिसर आहेत, ज्यांना कतारने मृत्युदंडाची शिक्षा दिलेली आहे.