इस्रायल आणि हमासचे युद्ध दोन आठवड्यांहून अधिक काळ सुरू आहे. इस्रायलचे सैनिक कडोनिकडीचा लढा देत आहेत. त्याचसंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामध्ये इस्रायलचे लोक अश्रफ नावाच्या एका बेड्वन सैनिकाप्रति कृतज्ञता व्यक्त करताना दिसत आहेत. इस्रायल हे ज्यू राष्ट्र आहे. ज्यू राष्ट्राच्या सैन्यामध्ये अरब लोकांचा समावेश कसा झाला ? बेड्वन सैनिक कोण आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
हमास आणि इस्रायल युद्धाने जगाला हादरवून सोडले आहे. या युद्धाला सामाजिक, आर्थिक, राजकीय कारणे आहेत. अरब-ज्यू यांचा संघर्ष ही इस्रायलच्या जन्माची एक बाजू आहे. सध्या सोशल मीडियावर इस्रायलमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात इस्रायलमधील लोक हमासविरुद्धच्या युद्धात लढल्याबद्दल अश्रफ नावाच्या एका अरब सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करत आहेत. अरब हे ज्यूंच्या विरोधात असताना, इस्रायलच्या सैन्यामध्ये ज्यूंचा समावेश कसा झाला, बेडूइन सैनिक कोण असतात हे जाणून घेतले पाहिजे.
हेही वाचा : ‘नमो भारत’ ठरणार भारतातील सर्वात वेगवान रेल्वे ? काय आहे आरआरटीएस प्रकल्प ?
७ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या इस्रायल-हमास युद्धामध्ये इस्रायलचे किमान चार बेड्वन सैनिक मृत झाले. बेडूइन हे भटके मुस्लीम-अरब लोक आहेत. हे दक्षिण इस्रायलच्या नेगेव वाळवंटात राहतात. यांचा कोणत्याही राष्ट्राशी विशेषत्वाने संबंध नसतो. पशुधनापासून मिळणारे उत्पन्न हेच त्यांच्या चरितार्थाचे साधन असते. दीड शतकांहून अधिक काळ ते सौदी अरेबिया आणि सिनाई दरम्यानच्या विविध भागांमध्ये ते पशुधनासह राहत असत.
इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) मध्ये बेड्वन सामील कसे झाले ?
पॅलेस्टाईनमध्ये ओटोमान राज्याच्या राजवटीच्या अखेरीस बेड्वन लोक स्थिरस्थावर होऊ लागले.त्यादरम्यानच्या काळात ज्यू लोक पॅलेस्टाईनमध्येच वास्तव्यास होते. बेड्वन लोकांना स्थायिक होण्यासाठी ज्यू लोकांनी मोठ्या प्रमाणावर साहाय्य केले. ज्यू लोकांनी आपल्या समूहाचे रक्षण करण्यासाठी बेड्वन लोकांचे लहान लहान गट नियुक्त केले. त्यांना प्रशिक्षित केले. १९४८-४९ च्या अरब आणि इस्रायली लोकांमध्ये झालेल्या युद्धादरम्यान बेड्वन लोकांनी ज्यू मिलिशिया आणि नव्याने स्थापन झालेल्या इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ)ला साहाय्य केले. यातील बरेच अरब लोक ज्यूंच्या बरोबरीने अरब लोकांविरुद्ध लढले.
१९५० च्या दशकात इस्रायलने बेडूइन लोकांना नागरिकत्व दिले. त्यांच्यासाठी खास नेगेव येथील वाळवंटी प्रदेशात वसाहती बांधण्यात आल्या. बेड्वन सैनिक आयडीएफमध्ये स्काउटिंग, ट्रॅकिंग विभागांकरिता कार्यरत होते. १९७०मध्ये आयडीएफच्या दक्षिणेकडील क्षेत्रात बेड्वन स्काउटिंग पथकाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर आयडीएफच्या इतर भागांमध्येही अशा प्रकारच्या पथकांची स्थापना करण्यात आली. १९८६ मध्ये वाळवंटी प्रदेश-स्काउटिंग पथक तयार करण्यात आले. हे पथक गाझा पट्टीजवळ तैनात करण्यात आले. २००३ मध्ये आयडीएफने सीमावर्ती भागांकरिता बेड्वनच्या अनेक तुकड्या तयार केल्या. विशेष शोध आणि बचाव पथकेही तयार केली. १९९३ मध्ये देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या १५४ बेडूइन सैनिकांचे स्मारक इस्रायलने गॅलीलीतील एका टेकडीवर बांधले. हे ब्रोकन हार्ट गार्डन नावाने प्रसिद्ध आहेत. ज्या सैनिकांच्या मृत्यूविषयी काही कळले नाही, त्यांच्या स्मरणार्थ ही गार्डन आहे.
बेडूइन आयडीएफमध्ये कसे प्रवेश घेतात ?
बेडूइन लोकांना आयडीएफचे प्रशिक्षण घ्यावे लागत नाही. इस्रायलमधील ज्यू लोकांसाठीच ते अनिवार्य आहे. आयडीएफमध्ये समाविष्ट होऊ इच्छिणारे बेडूइन हे सैन्य परंपरेच्या कुटुंबातीलच असतात. २०२१ मध्ये सुमारे ६०० बेडूइन सैनिक आयडीएफमध्ये समाविष्ट झाले. २०१४ मध्ये आयडीएफने केलेल्या फेसबुक पोस्टनुसार दरवर्षी सुमारे ४५० बेडूइन पुरुष आयडीएफमध्ये प्रवेश घेतात.
बेडूइन समूहासाठी इस्रायलने केलेले प्रयत्न
बेडूइन लोकांना इस्रायलच्या लोकांसह राहताना हिब्रू भाषा शिकावी लागली, ज्यूंची संस्कृतीसह जुळवून घ्यावे लागले. इस्रायलमध्ये २१ हजार बेड्वन लोक आहेत. यातील बहुतांश दक्षिणेकडील नेगेव वाळवंटात राहतात. २०२०मध्ये इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने इस्माईल खाल्दी हे पहिले बेडूइन राजदूत नियुक्त केले. इस्त्राईलमधील पहिली हाय-टेक कंपनी सॅडेल टेक्नॉलॉजीज ही बेडूइन असणाऱ्या इब्राहिम साना यांनी दोन भागीदारांसह स्थापन केली. नोव्हेंबर २०२२ मध्ये, इस्रायली सरकारने ऑपरेशन नेगेव्ह शील्ड सुरू केले. या कार्यक्रमादचे बेड्वन लोकांची शैक्षणिक प्रगती करणे, त्यांच्या पुढच्या पिढीला शिक्षित करणे, गुन्हेगारी किंवा भटक्या प्रवृत्तीपासून दूर करणे, हे उद्दिष्ट आहे. आयडीएफमधील अधिकारी मुलांना शिक्षित करण्यासाठी विविध बेडूइन समुदायातील शाळांना भेट देतात. त्यांना मार्गदर्शन करतात.
अशाप्रकारे इस्रायल हा ज्यूंचा देश असला तरी त्यातील बेड्वन अरबांचे स्थान महत्त्वपूर्ण आहेत.