इस्रायलने गुरुवारी संयुक्त राष्ट्र संघटना शांतता सेनेच्या म्हणजेच यूएन पीस कीपिंग फोर्सच्या पोस्टवरही हल्ला केला. या हल्ल्यात दोन सैनिक जखमी झाले. संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेचा भाग म्हणून इस्रायल-लेबनॉन सीमेवर ब्ल्यू लाइन तयार करण्यात आली आहे, जिथे संयुक्त राष्ट्राचे सैनिक तैनात आहेत. मुख्य म्हणजे यात भारतीयांचाही समावेश आहे. पश्चिम आशियातील काही भागांतील बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीबद्दल भारतानेही चिंता व्यक्त केली आहे. गुरुवारी इस्रायली टँकने समूहाच्या एका निरीक्षण टॉवरवर गोळीबार केल्यानंतर या हल्ल्यात दोन सैनिक जखमी झाले, असे संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हा हल्ला नक्की का करण्यात आला? काय आहे यूएन पीस कीपिंग फोर्स? ते जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इस्रायलचे असे सांगणे होते की, हिजबुल संयुक्त राष्ट्राच्या पोस्टच्या आडून इस्रायलवर हल्ला करीत आहे. ही पोस्ट लेबनॉनमधून हलविण्याची विनंती इस्रायलकडून करण्यात आली होती. . मात्र, संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याने ही विनंती नाकारली. इस्रायल आणि लेबनॉन सीमेवर दोन प्रकारचे संयुक्त राष्ट्र संघटनेचे शांतता सैनिक तैनात आहेत. एक म्हणजे ‘युनायटेड नेशन इंटरिम फोर्स इन लेबनॉन’ (UNIFIL) आणि दुसरे म्हणजे ‘युनायटेड नेशन्स डिसंगेजमेंट ऑब्झर्व्हर फोर्स’. ‘यूएन’ने १९७८ पासून दक्षिणेकडील लेबनॉनमध्ये ‘युनायटेड नेशन्स डिसंगेजमेंट ऑब्झर्व्हर फोर्स’ म्हणून ओळखले जाणारे शांतीरक्षक दल तैनात केले आहे. त्याचे कार्य मुख्यत्वे निरीक्षणात्मक आहे.

हेही वाचा : ७,००० कोटींचे ड्रग्ज रॅकेट पोलिसांनी कसे उद्ध्वस्त केले? दिल्लीसह मुंबईत ७५० किलोहून अधिक अमली पदार्थ आले कुठून?

‘UNIFIL’चे ध्येय काय आहे?

लेबनॉनमधील ‘युनायटेड नेशन इंटरिम फोर्स’ ही लेबनॉन आणि इस्रायलच्या सीमेवर होणारे उल्लंघन रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या ५० देशांमधील १० हजारांहून अधिक नागरी आणि लष्करी कर्मचाऱ्यांची आंतरराष्ट्रीय संस्था आहे. १२१ किलोमीटर भागात तैनात असलेल्या या पट्ट्याला ब्ल्यू लाइन, असे म्हणतात. २००६ च्या संयुक्त राष्ट्राच्या ठरावामध्ये “त्याच्या कार्यक्षेत्राचा वापर कोणत्याही प्रकारच्या प्रतिकूल क्रियाकलापांसाठी केला जाणार नाही,” असे नमूद करण्यात आले आहे. ‘यूएन’ या क्षेत्रात कोणतीही शस्त्रे किंवा लढाऊ विमानांचा प्रवेश नाकारते. परंतु गेल्या दशकात, अमेरिका आणि इस्रायलने असा युक्तिवाद केला आहे की, हिजबुलने त्या प्रदेशात रॉकेटचा साठा गोळा केला असून, अनेकदा गोळीबारही केला आहे. ‘UNIFIL’ने सीमावर्ती क्षेत्रात होणारे उल्लंघन रोखणे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला उल्लंघनाची तक्रार करणे अपेक्षित आहे. संयुक्त राष्ट्राचे सैनिक सशस्त्र असले तरी सामान्यतः त्यांना केवळ तेव्हाच बळाचा वापर करण्यास परवानगी दिली जाते जेव्हा त्यांची सुरक्षा किंवा नागरिकांची सुरक्षा तत्काळ धोक्यात आलेली असते.

आता नक्की काय घडत आहे?

गेल्या आठवड्यात दक्षिणी लेबनॉनमध्ये केलेल्या आक्रमणादरम्यान इस्रायली सैन्याने ‘UNIFIL’ तळांपैकी एकाजवळ आपला तळ ठोकला, असे यूएन अधिकाऱ्यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या प्रवक्त्याने सांगितले की, इस्रायली सैन्य त्या ठिकाणांहून हिजबुलच्या स्थानांवर गोळीबार करीत आहे; ज्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सैनिकांना धोका वाढला आहे. ते म्हणाले की, इस्रायली सैन्याने संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याला स्थलांतर करण्यास सांगितले होते; परंतु त्यांनी तसे करण्यास नकार दिला होता.

हेही वाचा : मृत अविवाहित मुलाचे वीर्य पालकांच्या स्वाधीन करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश; नेमके प्रकरण काय?

संयुक्त राष्ट्रांच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले करून इस्रायल आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करीत आहे. मात्र, हिजबुलनेही दक्षिण लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या स्थानांच्या जवळून उत्तर देताना इस्रायलमध्ये रॉकेट सोडल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी ‘UNIFIL’ने सांगितले की, इस्रायली सैन्याने लेबनॉनमधील नकोरा येथील फोर्सच्या मुख्यालयातील निरीक्षण टॉवरवर हल्ला केला. तसेच, संयुक्त राष्ट्राचे सैनिक आश्रय घेत असलेल्या जवळच्या तळावरील बंकरच्या प्रवेशद्वारावरदेखील हल्ला करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who are the un peacekeepers at lebanons border with israel rac