प्रथमेश गोडबोले

यंदा विलंबाने सक्रिय झालेल्या मोसमी पावसामुळे राज्यात जलसंकट उभे ठाकले होते. मात्र, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात काही भाग वगळता सर्वदूर झालेल्या पावसामुळे अवघ्या काही दिवसांत जलचित्र पालटले आणि अनेक छोटी धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. धरणांमधील पाणीसाठा, पाणी मोजण्याची एकके, विसर्ग म्हणजे काय, तो का करावा लागतो, विसर्ग करण्याचा निर्णय कोण घेतो, पूरनियमन, विसर्ग करताना काय दक्षता घ्यावी लागते, याबाबतचा केलेला ऊहापोह.

leakage from main water pipeline schedule for water supply disrupts in bandra
मुख्य जलवाहिनीतून गळती; वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी विशेष वेळापत्रक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
kdmc steps to cut off water connection and electricity supply to 58 illegal buildings in dombivli
डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
Pune Water Supply, Water Resources Department,
पुण्याच्या पाण्याचे नियंत्रण जाणार जलसंपदा विभागाच्या ताब्यात? नक्की काय आहे कारण !
Increase in water supply to Thane Bhiwandi Mira Bhainder
दिड वर्षात ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदरला वाढीव पाणी; स्टेम प्राधिकरणाकडून पाणी उचल क्षमता वाढविण्याच्या कामास सुरूवात
Patkar plaza parking latest marathi news
डोंबिवलीत पालिकेचे पाटकर प्लाझा वाहनतळ सांडपाण्याने तुंबले

पाणीसाठा कसा मोजतात?

कमी प्रमाणात साठविलेले पाणी आपण लिटरमध्ये मोजतो. मात्र, वाहते पाणी मोजण्याची क्युसेक आणि क्युमेक अशी दोन एकके आहेत. एक फूट गुणिले एक फूट गुणिले एक फूट म्हणजे एक घनफूट पाणी. एक घनफूट म्हणजे २८.३१ लिटर पाणी. एक दशलक्ष घनफूट म्हणजे दहा लाख घनफूट. एक हजार दशलक्ष घनफूट म्हणजे एक टीएमसी पाणी. धरणामधून पाणी सोडताना म्हणजेच विसर्ग करताना ते क्युसेकमध्ये मोजले जाते. क्युव आणि सेकंद या दोन शब्दांनी क्युसेक हा शब्द तयार झाला आहे. क्युसेकमध्ये पाणी घनफुटात मोजले जाते. एक घनफूट प्रतिसेकंद याचा अर्थ क्युसेक होतो. समजा, धरणातून दोन हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. म्हणजेच दोन हजार गुणिले २८.३१ अशा पद्धतीने ५६ हजार ६२० लिटर पाणी प्रतिसेकंद नदीपात्रात सोडण्यात येते. क्युमेक एककात पाणी घनमीटरमध्ये मोजले जाते. एका सेकंदास एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. एक क्युमेक पाण्याचा विसर्ग म्हणजे एका सेकंदात एक हजार लिटर पाणी धरणातून बाहेर पडते.

विसर्ग म्हणजे काय? तो का करावा लागतो?

कोणत्याही धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून सर्व मार्गांनी धरणात जमा होणाऱ्या एकूण पाण्याला ‘येवा’ म्हटले जाते. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार ‘येवा’ निश्चित केला जातो. याआधारे धरण कधी आणि किती दिवसांत किंवा वेळेत भरले जाईल, याचा अंदाज बांधला जातो आणि त्यानुसार धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातो. संबंधित धरणातून पाण्याचा विसर्ग न केल्यास धरणाला धोका पोहोचू शकतो.

विश्लेषण: ‘रेडिओ कॉलर’ खरेच चित्त्यांना मारक ठरले का?

विसर्गाचे प्रारूप कसे ठरते?

जलसंपदा विभागाकडून पुराच्या अनुषंगाने नियोजन करण्यात येते. त्यामध्ये गेल्या ३०-४० वर्षांत नदीला आलेल्या पुराचा अभ्यास केला जातो. प्रत्येक १५ दिवसाला किती पाणी आले, याचे गणितीय प्रारूप तयार केले जाते. गेल्या ४० वर्षांत १ ते १५ जून या कालावधीत किती पाऊस पडला आणि किती पूर आला, याची ४० वर्षांची सरासरी काढली जाते. त्यानंतर १६ ते ३० जून अशा प्रकारे १५ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच जून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत दर १५ दिवसांचे गणितीय प्रारूप तयार केले जाते. यावरून या पंधरवड्यामध्ये धरणात किती पाणी येऊ शकते, याचा अंदाज येऊ शकतो. १५ ऑक्टोबरला सर्व धरणे १०० टक्के भरलेली हवीत, असे जलसंपदाचे नियोजन असते. या नियोजनाचा प्रारंभबिंदू १ जून तर शेवटचा बिंदू १५ ऑक्टोबर आहे. या तीन-साडेतीन महिन्यांच्या नियोजनात धरणदेखील १०० टक्के भरले पाहिजे आणि पूर नियमन (पुरामुळे कमीतकमी हानी झाली पाहिजे) अशा पद्धतीने व्यवस्थापन करावे लागते.

विसर्गाचे प्रमाण कसे ठरते?

राज्यातील प्रत्येक धरणात प्रत्येक दिवशी किती पाणी ठेवायचे, त्यापेक्षा जास्त पाणी आल्यास ते सोडून द्यायचे, असे नियोजन केलेले असते. प्रत्येक धरणाची स्थिती वेगळी असते. गेल्या ४० वर्षांत संबंधित धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस, धरणात आलेले पाणी यावरून धरणातील विसर्गाचे प्रमाण ठरविण्यात येते.

पाणी सोडण्याचा निर्णय कोण घेते?

धरण सुरक्षा संघटनेने धरणे सुरक्षा नियमावली तयार केली आहे. त्यामध्ये संबंधित धरणाच्या गेल्या ४० वर्षांतील ठोकताळ्यानुसार पाणी सोडण्याचे वेळापत्रक तयार करण्याचे अधिकार मुख्य अभियंत्यांना देण्यात आले आहेत. हे वेळापत्रक एकदा मंजूर केल्यानंतर संबंधित धरणाचा कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सहायक अभियंता हे वेळापत्रकाची अंमलबजावणी करतात. एकूण खोऱ्याची जबाबदारी मात्र मुख्य अभियंत्याकडे असते.

नाना पटोलेंनी विधानसभेत उल्लेख केलेली माधव गाडगीळ समिती काय आहे? पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी काय शिफारशी केल्या? जाणून घ्या

पूरनियमन कसे केले जाते?

१५ ऑक्टोबरला धरण १०० टक्के भरते किंवा भरावे असे नियोजन असते. १ ते १५ ऑक्टोबरचा गेल्या ४० वर्षांचा पाऊस पडल्याचा आणि पावसाचे किती पाणी धरणात आल्याचा विदा जलसंपदा विभागाकडे आहे. त्यानुसार १ ते १५ जूनमध्ये किती पाणीसाठा धरणांमध्ये ठेवायला पाहिजे. त्यानंतरचे १५ दिवस किती पाणीसाठा ठेवायचा याचा ठोकताळा जलसंपदा विभागाकडून बांधण्यात येतो. त्यानुसार चालू तारखेला संबंधित धरणात किती पाणीसाठा असायला हवा, याचा अंदाज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना असतो. म्हणजेच या ठोकताळ्यानुसार संबंधित धरणात चालू तारखेला ७० टक्के पाणीसाठा होता, तर सध्या येणाऱ्या पावसाचे प्रमाण जास्त असल्यास संबंधित धरण १०० टक्के भरू न देता ७० टक्के भरल्यानंतर त्यातून विसर्ग सुरू केला जातो. कारण आजच्या तारखेचा विचार केल्यास १५ ऑक्टोबरपर्यंत या धरणात आणखी पाऊस होणार आहे. त्यामुळे हे ३० टक्के पाणीसाठा ‘फ्लड पॉकेट’ म्हणून ठेवला जातो. कारण आगामी साडेतीन महिन्यांत धरणात येणारे पाणी धरणात साठवायचे आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जातो. अन्यथा आताच धरण १०० टक्के भरू दिल्यास पुढील साडेतीन महिन्यांत येणारे सर्व पाणी खाली सोडून द्यावे लागेल आणि पूरनियमन होणार नाही.

prathamesh.godbole@expressindia.com

Story img Loader