अमेरिकेतले भारतीय वंशाचे अमेरिकी व्यावसायिक आणि मास्टरकार्डचे माजी प्रमुख अजय बंगा यांना वर्ल्ड बँकेच्या प्रमुख पदासाठी ज्यो बायडेन यांनी नामनिर्देशित केलं आहे. राष्ट्रपती बायडेन यांनी गुरूवारी या नॉमिनेशनची घोषणा केली आहे. व्हाइट हाऊसमधून ज्यो बायडेन यांनी एक वक्तव्य केलं त्यामध्ये त्यांनी अजय बंगा यांचं नाव वर्ल्ड बँकेच्या प्रमुख पदासाठी नामनिर्देशित केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्यो बायडेन यांनी हे पाऊल अशावेळी हे पाऊल उचललं आहे जेव्हा अमेरिका वर्ल्ड बँकेवर जलवायू परिवर्तामुळे येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी निर्णय घ्यावा म्हणून दबाव टाकते आहे. अजय बंगा यांनी क्रेडिट कार्डसाठी प्रसिद्ध असलेली कंपनी मास्टरकार्ड या कंपनीचं दहा वर्षांहून अधिक काळ नेतृत्व केलं आहे. सध्या अजय बंगा हे अमेरिकेतल्या खासगी इक्विटी कंपनीत व्हॉईस चेअरमन या पदावर काम करत आहेत.

अनेक जाणकारांचं हे म्हणणं आहे की बंगा यांच्याकडे जो अनुभव आहे त्यामुळे बँक आणि प्रायव्हेट सेक्टर मिळून जलवायू परिवर्तनशी संबंधित प्रकरण सोडवण्यास मदत होऊ शकते. वर्ल्ड बँकेचं नवं संचालक मंडळ मे महिन्यात निवडलं जाणार आहे. त्यावेळी वर्ल्ड बँकेचे प्रमुख म्हणून अजय बंगा यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. बुधवारी बँकेने हे सांगितलं की या पदासाठी मुलाखती झाल्या असून त्यापैकी तीन उमेदवारांना शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यासंबंधीची घोषणा होऊ शकते.

कोण आहेत अजय बंगा?

अमेरिकेची नागरिकता घेतलेले अजय बंगा यांचा जन्म भारतात झाला होता. त्यांनी भारतातूनच मोठं होण्याचं स्वप्न पाहिलं. त्यांचे वडील लष्करात अधिकारी म्हणून काम करत होते. मास्टरकार्ड ही कंपनी जॉईन करण्याआधी नेस्ले आणि सिटी ग्रुपमध्येही अजय बंगा काम करत होते. २०२१ मध्ये मास्टरकार्ड या कंपनीतून निवृत्ती घेतली त्यानंतर खासगी इक्विटी फर्म जनरल अटलांटिक जॉईन केली. या कंपनीत ते व्हॉईस चेअरमन या पदावर काम करत आहेत. जनरल अटलांटिक कंपनीत ३.५ अरब डॉलरच्या क्लायमेट फंडच्या अॅडव्हायजरी बोर्डातही अजय बंगा आहेत. अजय बंगा पार्टनरशिप फॉर सेंट्रल अमेरिकेसाठी सह अध्यक्ष म्हणून व्हाईट हाऊससोबतही काम केलं होतं. सेंट्रल अमेरिकेत प्रायव्हेट सेक्टर गुंतवणूक वाढवण्यासाठी अजय बंगा काम करत आहेत.

अजय बंगांसमोर काय आव्हानं आहेत?

अजय बंगा यांची निवड जर वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले तर वर्ल्ड बँकेत ते कशा प्रकारचे बदल करतात हे पाहणं महत्त्वाचं असणा आहे. जो वर्ल्ड बँकेचा पुढचा प्रमुख असेल त्याच्यासमोर कमी उत्पन्न असलेल्या देशांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणं हेदेखील त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान असणार आहे. आर्थिक साधनसंपत्ती, जलवायू परिवर्तन, आंतरराष्ट्रीय संघर्ष आणि महामारीसारख्या जोखिमांशी झुंजण्याचीही आव्हानं असणार आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is ajay banga nominated by us president joe biden to head world bank scj
Show comments