ॲम सायनाइड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थायलंडच्या पहिल्या महिला सीरियल किलरला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. बुधवारी थायलंडच्या न्यायालयाने सररत रंगसीवुथापोर्न हिला १५ पीडितांच्या प्रकरणांपैकी एका प्रकरणात दोषी आढळली. त्यानंतर तिला पूर्वनियोजित हत्येसाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिच्यावर १५ लोकांना विष दिल्याचा आरोप आहे, त्यापैकी फक्त एकाचे प्राण वाचू शकले आहेत. निकालानुसार, सररतने एप्रिल २०२३ मध्ये एका सहलीदरम्यान ३२ वर्षीय सिरीपोर्न खानवॉन्ग याला सायनाइड दिले. हे दोघे एका धार्मिक समारंभासाठी रत्चाबुरी प्रांतात गेले होते. थाई पब्लिक ब्रॉडकास्टर पीबीएसच्या म्हणण्यानुसार, सररतने जाणीवपूर्वक सिरीपोर्नला विष दिले, ज्याचा नदीत कोसळून मृत्यू झाला. याच घटनेनंतर पोलीस त्या महिलेपर्यंत पोहोचले आणि तपासाला सुरुवात झाली. तिच्यावर इतर १४ जणांच्या हत्यांचाही आरोप आहे; ज्याचा तपास सुरू आहे. नेमके प्रकरण काय? कोण आहे ॲम सायनाइड? हत्या करण्यामागील तिचा हेतू काय? त्याविषयी जाणून घेऊ..

ॲम सायनाइड कोण आहे?

सररत रंगसीवुथापोर्न हिला ॲम सायनाइड म्हणूनही ओळखले जाते. या महिलेवर सायनाइडच्या हत्येपूर्वी तिच्या पीडितांची हजारो डॉलर्सची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की, सररत २०१५ च्या सायनाइड विषबाधा प्रकरणांशी संबंधित आहे. तिच्या जुगाराच्या व्यसनासाठी तिने कथितपणे तिच्या पीडितांकडून पैसे घेतले होते. तिने तिच्या मित्रांची हत्या करण्यापूर्वी ३,००,००० बाहट इतकी रक्कम आणि दागिन्यांसह मोबाईल फोन व त्यांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी केली होती, असे वृत्त ‘एएफपी’ने दिले होते. तिच्या अटकेनंतर उपराष्ट्रीय पोलीस प्रमुख सुरचाते हकपर्न म्हणाले, “तिने तिच्या ओळखीच्या लोकांकडे पैसे मागितले. कारण- तिच्यावर बऱ्याच क्रेडिट कार्डांचे कर्ज आहे. त्यांनी तिच्याकडे त्यांचे पैसे परत मागण्यास सुरुवात केल्याने तिने त्यांची हत्या करण्यास सुरुवात केली.” सररतने कथितरीत्या १५ मित्रांना औषधी कॅप्सूलद्वारे विष दिले, त्यापैकी केवळ एक जणच बचावू शकला, असे पोलिसांनी सांगितले. तिला १४ अतिरिक्त खटल्यांचा सामना करावा लागतो आहे आणि तिच्यावर आतापर्यंत एकूण ८० गुन्हेगारी आरोप आहेत.

life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
ghatkopar billboard collapse case, High Court,
घाटकोपर फलक दुर्घटना : आरोपी भावेश भिंडेचा जामीन रद्द करा, सत्र न्यायालयाच्या आदेशाला सरकारचे उच्च न्यायालयात आव्हान
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत
school girl and her brother molested by minors who threatened to kill her
जिवे मारण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य, अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल
fox death Mumbai, Third fox death, fox ,
मुंबई : रेबीजमुळे आणखी एका कोल्ह्याचा मृत्यू, तीन महिन्यांतील कोल्ह्याच्या मृत्यूची तिसरी घटना
सररत रंगसीवुथापोर्न हिला ॲम सायनाइड म्हणूनही ओळखले जाते. (छायाचित्र-पाकिस्तानी इनडेक्स/एक्स)

हेही वाचा : लग्न सोहळ्यांमुळे होणार सहा लाख कोटींची उलाढाल; भारतीय अर्थव्यवस्थेला कशी मिळणार चालना?

न्यायालयाने काय सांगितले?

न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले की, सररतने तिची मैत्रीण सिरीपोर्नला कोसळताना पाहिले; मात्र सररतने तिची मदत करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. त्याऐवजी ती तिच्या कारकडे परतली आणि सिरीपोर्नची बॅग, मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन घटनास्थळावरून पळ काढला, असे वृत्त ‘द बँकॉक’ पोस्टने दिले आहे. सिरीपोर्नच्या रक्तात, पोटात व यकृतामध्ये पोटॅशियम सायनाइडची घातक पातळी आढळून आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, माई क्लॉन्ग नदीवर जाण्यापूर्वी सररतच्या कारमध्ये सिरीपोर्नला विष देण्यात आले होते. सररतच्या बँक खात्यांमध्ये जानेवारी २०२० ते मे २०२३ या कालावधीत एकूण ९५ दशलक्ष बहाटचे व्यवहार नोंदवले गेले आहेत, जे ऑनलाइन जुगार नेटवर्कद्वारे वापरल्या जाणाऱ्या खात्यांशी जोडलेले असल्याचे पुराव्यांवरून दिसून आले आहे.

२०२१ आणि २०२२ मध्ये जुगार खेळल्याने तिला मोठे नुकसान झाले आणि ती कर्जबाजारी झाली, असेही न्यायालयाला आढळले. पोलिसांनी सांगितले की, तिने सर्वांत शेवटी सिरीपोर्नची हत्या केली. सररतचा पूर्व पती विथुन रंगसिवुथापोर्न, रत्चाबुरी येथील माजी पोलिस ठाण्याचा प्रमुख व तिचा वकील थानिचा एक्सुवान्नावत यांना सिरीपोर्नची बॅग लपविण्यास मदत केल्याबद्दल दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. उपयुक्त साक्ष दिल्याबद्दल विथुन याची शिक्षा कमी करून एक वर्ष चार महिने करण्यात आली. पुढे न्यायालयाने सररत, विथुन व थानिचा यांना सिरीपोर्नच्या कुटुंबाला २.३४ दशलक्ष बहाट भरपाई देण्याचे आदेश दिले. तिघांनीही आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. या निकालावर प्रतिक्रिया देताना, सिरीपोर्नची आई टोंगपिन कियाचनासिरी म्हणाली, “मला माझ्या मुलीला सांगायचे आहे की, मला तिची खूप आठवण येते आणि आज तिला न्याय मिळाला आहे.” सररतने सर्व आरोपांमध्ये दोषी नसल्याचे सांगितले. बहुतेक प्रकरणांमध्ये कथितरीत्या विष अन्नामध्ये मिसळले गेले होते आणि एका प्रकरणात गोळीद्वारे विष देण्यात आले होते, असे तिचे म्हणणे आहे.

सररतला २५ एप्रिल २०२३ रोजी अटक करण्यात आली आणि केंद्रीय महिला सुधारक संस्थेत ताब्यात घेण्यात आले. तिच्या अटकेच्या वेळी ती गरोदर होती; परंतु पोलिसांनी त्यांचा तपास पूर्ण केला, त्या वेळेस जून २०२३ मध्ये तिच्या गर्भधारणेच्या पाचव्या किंवा सहाव्या महिन्यात तिचा गर्भपात झाला. या प्रकरणामुळे थायलंडमधील नागरिकांना धक्का बसला आहे आणि या महिलेची तुलना चार्ल्स शोभराजसारख्या कुप्रसिद्ध सीरियल किलरशी तुलना केली जात आहे; ज्याने १९७० च्या दशकात थायलंड आणि इतर देशांमध्ये विष देऊन लोकांच्या हत्या केल्या होत्या. अमेरिकेतील बेल्ले गनेस यासारख्या सीरियल पॉयझनर्सने १९०० ते १९०८ दरम्यान आर्सेनिकद्वारे ४२ लोकांना ठार केले. तसेच, एमी आर्चर-गिलिगन याने १९१० ते १९१६ दरम्यान त्याच विषाचा वापर करून, किमान २० लोकांची हत्या केली होती.

हेही वाचा : तुम्ही ‘Demisexual’ आहात का? या नवीन लैंगिक ओळखीची इतकी चर्चा का?

सायनाइडचा थायलंडमध्ये होणारा वापर

विशेष म्हणजे सायनाइड शरीरातील पेशींना ऑक्सिजनपासून वंचित ठेवते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये चक्कर येणे, श्वास लागणे व उलट्या होणे यांसारख्या लक्षणांचा समावेश होतो. गंभीर प्रकरणांमध्ये फुप्फुसाचे नुकसान, कोमा आणि काही सेकंदांत मृत्यूही होऊ शकतो. अगदी लहान डोसदेखील अत्यंत विषारी असतात. थायलंडमध्ये सायनाइडचा वापर काटेकोरपणे नियंत्रित केला जातो आणि अनधिकृतपणे ताब्यात घेतल्यास दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

Story img Loader