केंब्रिज विद्यापीठाच्या ऐतिहासिक केंब्रिज युनियन सोसायटीच्या अध्यक्षपदी एका ब्रिटिश-भारतीय विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे, जी जगातील सर्वांत जुनी आणि प्रसिद्ध संस्थांपैकी एक मानली जाते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत, अनुष्का काळे १२६ मते मिळवून पुढील २०२५ टर्मसाठी बिनविरोध निवडून आल्या. या भूमिकेसाठी त्यांची निवड ही समाजातील विविधता आणि समावेशासाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड मानली जात आहे. कोण आहे अनुष्का काळे? ऐतिहासिक केंब्रिज युनियन सोसायटी काय आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण आहेत अनुष्का काळे?

अनुष्का काळे (वय २०) सध्या केंब्रिज विद्यापीठातील सिडनी ससेक्स कॉलेजमध्ये इंग्रजी साहित्याचा अभ्यास करीत आहेत. प्रतिष्ठित भूमिका घेणाऱ्या काही दक्षिण आशियाई हेरिटेज महिला सदस्यांपैकी त्या एक आहेत. “२०२५ साठी केंब्रिज युनियन सोसायटीच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे आणि सदस्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे,” असे त्या त्यांच्या निवडीनंतर म्हणाल्या. अनुष्का काळे युनिव्हर्सिटीमधील सांस्कृतिक संस्थांसह सहयोगावर लक्ष केंद्रित करताना युनियनमध्ये विविधता आणि सुलभता वाढवण्याचा प्रयत्न करते, जसे की इंडिया सोसायटी.

“माझ्या कार्यकाळात कॅम्पसमधील सांस्कृतिक गटांशी मजबूत संबंध वाढवून, आंतरराष्ट्रीय व्याख्यात्यांची व्याख्याने आणि जागतिक स्तरावरील वादविवाद / चर्चा आयोजित करण्याची आमची परंपरा सुरू ठेवण्याची माझी योजना आहे,” असे त्या म्हणाल्या. “या कार्यक्रमांसाठी मी तिकीट दर कमी करून, हे कार्यक्रम अधिक सुलभ करण्यासदेखील उत्सुक आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना युनियनच्या क्रियाकलापांमध्ये सहभागी होणे सोपे होईल.”

हेही वाचा : रशियाने भारताला सुपूर्द केली क्षेपणास्त्राने सुसज्ज युद्धनौका; ‘आयएनएस तुशील’ काय आहे? भारतासाठी याचे महत्त्व काय?

केंब्रिज युनियन सोसायटी काय आहे?

केंब्रिज युनियन सोसायटीची स्थापना १८१५ मध्ये झाली. ही सोसायटी व्याख्यान आणि बौद्धिक वादविवाद आयोजित करण्यासाठी प्रयत्नरत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाप्रमाणेच केंब्रिज युनियनमध्येही सर्व देशांतील प्रभावशाली व्यक्तींना सूत्रसंचालक म्हणून बोलावण्याची परंपरा आहे. अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स, कादंबरीकार रॉबर्ट हॅरिस व कोब्रा बीअरचे संस्थापक लॉर्ड करण बिलिमोरिया हे युनियनचे सदस्य राहिले आहेत. या युनियनने कल्पना आणि संवादासाठी अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट व रोनाल्ड रेगन, ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल, मार्गारेट थॅचर व जॉन मेजर यांसारख्या प्रभावशाली व्यक्ती आणि स्टिफन हॉकिंग, बिल गेट्स व दलाई लामा यांसारखे नामवंत शास्त्रज्ञ व कार्यकर्त्यांना सूत्रसंचालक केले आहे. काळे यांचे नवे नेतृत्व एका निर्णायक वेळी आले आहे. कारण- युनियन सध्या आर्थिक दबावांना तोंड देत आहे. त्यात युनियनच्या ग्रेड २ वारसा इमारतीच्या वाढलेल्या देखभाल खर्चाचा मुद्दा समाविष्ट आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is anoushka kale british indian elected president of historic cambridge union rac