अमेरिकेच्या जगप्रसिद्ध तपास यंत्रणा असलेल्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय)च्या यादीत भारतीय व्यक्तीचा समावेश करण्यात आला आहे. गुजरातमधील या व्यक्तीवर मोठे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. एफबीआय ३४ वर्षीय भारतीय नागरिक भद्रेशकुमार चेतनभाई पटेलचा शोध घेत आहे. मूळचा गुजरात येथील भद्रेशकुमार पटेल याचा एफबीआयच्या ‘१० मोस्ट वॉंटेड फरार’ यादीत समावेश आहे. जवळपास एक वर्षापासून तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहे. कोण आहे भद्रेशकुमार पटेल? त्याच्यावर आरोप काय? एफबीआयच्या ‘१० मोस्ट वॉंटेड फरार’ यादीत त्याचे नाव कसे आले? त्याविषयी जाणून घेऊ.

एका सोशल मीडिया पोस्टमध्ये एफबीआयने म्हटले, “वॉंटेड आरोपी अत्यंत धोकादायक मानले जातात! ‘एफबीआय’ला दहा मोस्ट वाँटेड फरार व्यक्तींपैकी एका आरोपीचा शोध घेण्यात मदत करा. आपल्या पत्नीच्या हिंसक हत्येसाठी ३४ वर्षीय पटेल याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असल्यास, एफबीआयशी संपर्क साधा.” पटेलला पकडण्यासाठी कोणत्याही माहितीसाठी एबबीआय २,५०,००० डॉलर्स म्हणजेच दोन कोटी रुपये देऊ करत आहे. अमेरिकेच्या मेरीलँड राज्यातील न्यायालयाने त्याच्या विरोधात अटक वॉरंटदेखील काढले आहे.

Gujarat man on FBI 10 Most Wanted Fugitives list
Crime News : FBIच्या ‘१० मोस्ट वॉन्टेड’ यादीत गुजराती व्यक्तीचं नाव; माहिती देणाऱ्याला मिळणार ‘इतक्या’ डॉलर्सचं बक्षीस
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
mumbai police chief vivek phansalkar news in marathi
मुंबईतील वित्तीय, गुंतवणूक संस्थांची माहिती गोळा करा; मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे आदेश
pimpri chinchwad cyber crime loksatta news
सायबर क्राइम : महिन्याला दहा टक्के परतावा? उच्चशिक्षित तरुणाची ८० लाखांची अशी झाली फसवणूक…
cybercrime digital arrest scam
Digital Arrest Scam: ‘डिजिटल अरेस्ट’ स्कॅमद्वारे देशभरात हजारो कोटींची लूट करणाऱ्या मास्टरमाईंडला अटक
Torres
Torres Scam : टोरेस फसवणूकप्रकरणी आरोप असलेले सीए अभिषेक गुप्तांची न्यायालयात धाव; वकील म्हणाले, “युक्रेनिअन माफिया…”
anti narcotics squad arrest rajasthan youth in kharadi area for selling opium
अफू विक्री करणारा गजाआड; राजस्थानातील तरुणाकडून दोन लाखांची अफू जप्त

हेही वाचा : भारतात कच्च्या तेलाच्या किमती वाढणार? अमेरिकेच्या निर्बंधांमुळे रशियाशी तेलव्यवहार महागणार?

भद्रेशकुमार चेतनभाई पटेल कोण आहे आणि तो ‘एफबीआय’च्या मोस्ट वाँटेड यादीत का आहे?

१. भद्रेशकुमार चेतनभाई पटेल याचा जन्म गुजरात येथे झाला असून तो त्याची पत्नी पलक पटेलबरोबर अमेरिकेतील मेरीलँड येथील एका डोनटच्या दुकानात काम करत होता.

२. सर्वात शेवटी भद्रेशकुमार पटेल याला न्यू जर्सी येथील नेवार्कमध्ये पाहण्यात आले होते. भद्रेशकुमारवर पलकला कामावर असताना एका वस्तूने अनेक वेळा वार करून ठार मारल्याचा आरोप आहे.

फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय)च्या यादीत भारतीय व्यक्तीचा समावेश करण्यात आला आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

३. ही घटना त्यांच्या रात्रीच्या शिफ्टदरम्यान घडली. त्यावेळी दुकानात ग्राहकदेखील उपस्थित होते आणि दोघांनाही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये पाहण्यात आले. दृश्यातून गायब होण्यापूर्वी जोडपे स्वयंपाकघर क्षेत्राकडे जात असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे.

४. भद्रेशकुमार पटेल याच्यावर फर्स्ट-डिग्री खून, सेकंड-डिग्री खून, फर्स्ट-डिग्री हल्ला, सेकंड-डिग्री हल्ला आणि इजा करण्याच्या उद्देशाने धोकादायक शस्त्र बाळगल्याचा आरोप आहे.

५. २० एप्रिल २०२४ रोजी मेरीलँडमध्ये फेडरल अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर पटेल याच्यावर खटला टाळण्यासाठी बेकायदा उड्डाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

६. २०१७ च्या ‘एफबीआय’ प्रेस रिलीजनुसार, पटेल आणि त्याची पत्नी त्यांच्या एका नातेवाईकाच्या मालकीच्या डोनटच्या दुकानात रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत होते.

७. पटेल यानी १२ एप्रिल २०१५ ला मध्यरात्री २ ते २.१५ या वेळेत दुकानाच्या मागील खोलीत २१ वर्षांच्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप तपासकर्त्यांनी केला आहे. त्याने तिच्यावर अनेक वेळा वार केले आणि मागील दरवाजातून पळ काढला, असे आरोप भद्रेशकुमारवर आहेत.

८.’एफबीआय’ने इशारा दिला आहे,पटेल अत्यंत धोकादायक आहे. त्याला पकडण्यासाठी जागतिक तपास यंत्रणा अनेक प्रयत्न करत आहे.

९. हत्येनंतर दुकानात प्रवेश करणाऱ्या ग्राहकाला त्याची ऑर्डर घेण्यास कोणी प्रतिसाद न दिल्याने त्याला संशय आला. त्यांनी एका पोलिस अधिकाऱ्याला सूचना दिली, ज्यांना नंतर पलकचा मृतदेह सापडला.

१०. पटेल हा आंतरराष्ट्रीय उड्डाण करत असून, तो इतरांसाठी धोकादायक असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांनी ‘एफबीआय’ची मदत मागितली. हत्येच्या काही दिवसांनंतर, पटेलसाठी फेडरल अटक वॉरंट जारी करण्यात आले, त्याच्यावर खटला टाळण्यासाठी बेकायदा उड्डाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला.

भद्रेशकुमार चेतनभाई पटेल आहे कुठे?

एफबीआयच्या म्हणण्यानुसार, तपासकर्त्यांचा असा विश्वास आहे की, पलकला भारतात परत यायचे होते, कारण त्यांचा व्हिसा घटनेच्या एक महिना आधी संपला होता, परंतु तिच्या पतीने या कल्पनेला विरोध केला. एफबीआयच्या बाल्टिमोर विभागातील विशेष एजंट जोनाथन शॅफर म्हणाले, “सर्वोत्तम अंदाज असा आहे की त्याला तिला सोडायचे नव्हते.”

“तिला सोडून भारतात परत आल्याने आपली बदनामी होईल असे त्याला वाटू लागले होते.” पटेल हा अमेरिकेत दूरच्या नातेवाईकांकडे राहत असावा किंवा तो कॅनडाला पळून गेला असावा, असा संशय तपासकर्त्यांना आहे. तो कॅनडामार्गे भारतात परतला असल्याचेही शॅफरने २०१७ च्या प्रेस रिलीजमध्ये जोडले.

हेही वाचा : तालिबानचं भारताशी सख्य का वाढतंय?

सुरुवातीला, एफबीआयने पटेलच्या अटकेपर्यंतच्या माहितीसाठी एक लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते. परंतु, एफबीआयच्या ‘टेन मोस्ट वॉंटेड फरार’ यादीत त्याचा समावेश झाल्यानंतर बक्षीस २,५०,००० डॉलर्स पर्यंत वाढविण्यात आले आहे. विशेष एजंट गॉर्डन बी जॉन्सन यांनी स्पष्ट केले की, पटेल यानी अत्यंत हिंसक गुन्हे केल्यामुळे त्यांना एफबीआयच्या टॉप टेन यादीत स्थान देण्यात आले आहे.” आमच्या तपासकर्त्यांचे चालू असलेले प्रयत्न, लोकांच्या सहकार्याने भद्रेशकुमार पटेलला पकडले जाईल. आम्ही कधीही विसरणार नाही आणि जोपर्यंत तो सापडला जात नाही, पकडला जात नाही आणि पीडितेला न्याय मिळवून दिला जात नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे ते पुढे म्हणाले.

Story img Loader