मंगळवारी एका वादग्रस्त नेपाळी आध्यात्मिक गुरूला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. या गुरूला ‘बुद्ध बॉय’ म्हणून ओळखले जाते. तर त्याच्या कॅम्पमधून दोन पुरुष आणि दोन महिला बेपत्ता होण्यातही त्यांचा सहभाग असल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे. या गुरूचे वय ३३ वर्षे असून गेल्या अनेक वर्षांपासून तो फरार होता. त्याला काठमांडूच्या उपनगरातून अटक करण्यात आली आहे.

‘बुद्ध बॉय’ कोण आहे?

या प्रसिद्ध गुरूचे नाव राम बहादुर बोमजोन असे असून ही व्यक्ती भक्तांमध्ये “बुद्ध बॉय” म्हणूनही ओळखली जाते, अनेक नेपाळी लोक त्याला सिद्धार्थ गौतमाचा पुनर्जन्म मानतात, नेपाळमधील लोकांच्या धारणेनुसार गौतमबुद्धांचा जन्म सुमारे २,६०० वर्षांपूर्वी नेपाळमध्ये झाला होता. राम बहादुर बोमजोन हा २००५ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये झळकला, त्याच्या अनुयायांनी नमूद केल्याप्रमाणे काही महिने पाणी, अन्न किंवा झोप न घेता गतिहीन ध्यान करू शकतात. रॉयटर्सने दिलेल्या माहिती नुसार त्याला ध्यान मग्न पाहण्यासाठी एक लाखाहून अधिक लोकं आग्नेय नेपाळच्या घनदाट जंगलात जमा झाले होते. GQ मासिकाने दिलेल्या माहितीनुसार, त्याला दोनदा विषारी साप चावल्याचे सांगितले जाते, त्यावेळी त्याने कोणतेही औषध घेतले नाही, केवळ ध्यानाद्वारे स्वतःवर उपचार केले. अशी भाविकांची श्रद्धा असली तरी संशयितांच्या म्हणण्यानुसार ध्यानाच्या कालखंडात त्याला रात्री पडद्यामागे खायला दिले जात होते. ‘एएफपी’ नुसार, वयाच्या १६ व्या वर्षी, पूर्व नेपाळच्या वाळवंटात फिरण्यासाठी बोमजोन नऊ महिने नाहीसे झाले, आणि त्यांच्या सुरक्षित परतीसाठी प्रार्थना करणाऱ्या बौद्ध भिक्षूंनी चोवीस तास जागरण केले होते. सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार, यानंतर सुमारे दोन वर्षांनंतर बोमजोनने स्वतःचा प्रचार करण्यास सुरुवात केली, त्याच्या पहिल्या प्रवचनाला अंदाजे ३,००० श्रोते उपस्थित होते. त्याने आणि त्याच्या समर्थकांनी त्यांच्या लोकप्रियतेचा वापर करून नेपाळभोवती त्याच्या शिकवणींना समर्पित असणाऱ्या आश्रमांचे जाळे उभारले.

husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Akola Sessions Court sentenced family to death citing Mahabharata High Court disagreed
‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
Nagpur Bench of Bombay High Court held Even with consent of minor wife physical intercourse is part of rape
अल्पवयीन पत्नीसोबत सहमतीतून शारीरिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालय म्हणाले, ‘पीडितेच्या इच्छेविरोधात…’
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल

अधिक वाचा: लक्षद्वीपच्या मुस्लिमांनी जपलंय वेगळेपण, अजूनही करतात मातृवंशीय परंपरेचं अनुसरण

बोमजोनला अटक आणि आरोप

या कथित गुरूचे अनेक श्रद्धाळू अनुयायी आहेत, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्यावर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर तो पोलिसांपासून लपून बसला होता. बोमजोनला मंगळवारी रात्री नेपाळची राजधानी काठमांडूच्या उपनगरातील बुधानीलकंठा येथील त्याच्या घरातून अटक करण्यात आली, असे पोलीस प्रवक्ते कुबेर कडायत यांनी AFP ला सांगितले. “आमच्या टीमने त्याला अटक केली तेव्हा तो घराच्या खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता,” असे केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CIB) ने एका निवेदनात म्हटले आहे. राजधानीच्या दक्षिणेस असलेल्या सरलाही येथील एका आश्रमात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. AFP नुसार, पोलिसांनी सांगितले की त्याला ३० दशलक्ष नेपाळी रुपये (सुमारे सव्वादोन लाख अमेरिकन डॉलर्स) आणि विदेशी चलनच्या (बावीस हजार ५०० अमेरिकन डॉलर्स) रोख रकमेसह पकडण्यात आले आहे.

आरोप नेमका काय?

२०१० साली त्याच्यावर हल्ल्याच्या डझनभर तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात त्याने पीडितांना मारहाण केली होती. ध्यान विचलित केल्यामुळे, असे केले असे कारण आरोपाचे खंडण करताना त्याने सांगितले होते. यानंतर एका १८ वर्षीय साध्वीने या कथित गुरूवर २०१८ साली एका मठात बलात्कार केल्याचा आरोप केला होता. ANI नुसार, आरोपपत्रात म्हटल्याप्रमाणे ४ ऑगस्ट २०१६ रोजी सरलाहीच्या पाथरकोट भागातील आश्रमात ही घटना घडली. अल्पवयीन मुलीने (त्यावेळी वय १५ वर्षे) सांगितले की, इतरांना सांगू नकोस, अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही त्याने त्यावेळेस दिली. त्यामुळे या घटनेची वाच्चता तिने कोठेही केली नाही. मात्र अलीकडेच तक्रार दाखल केल्यानंतर लगेचच, त्याच्या एका आश्रमातून चार भक्त बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबियांनी दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध आणखी एक तपास सुरू केला.

अधिक वाचा: मालदीवने भारताचा दुस्वास करण्यामागे ‘चिनी कनेक्शन’? पंतप्रधान मोदींची लक्षद्वीप भेट, समाज माध्यमांवर अवमानकारक, टीका!

जून २०२० मध्ये, CIB, बागमती प्रांतीय पोलीस आणि कावरे, सिंधुपालचौक आणि सरलाही येथील जिल्हा पोलीस कार्यालयांच्या संयुक्त पथकाने सिंधुलीच्या पायरी येथील त्याच्या आश्रमावर छापा टाकला, परंतु त्यात तो सापडला नाही. २०१७ साला पासून बेपत्ता असलेल्या चौघांचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही, असे सीआयबीचे दिनेश आचार्य यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले, “जोपर्यंत बेपत्ता लोक कोणत्या परिस्थितीत आहेत हे आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्ही त्याला खून म्हणणार नाही.” सीआयबीचे प्रवक्ते नवराज अधिकारी सांगतात, ‘बोमजोन याला सरलाही जिल्हा न्यायालयात पाठवले जाईल, या न्यायालयाने त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
दरम्यान, बोमजोनशी संबंधित असलेल्या बोधी श्रवण धर्म संघाने अलीकडेच एका स्थानिक वेबसाइटने केलेले नवीन आरोप निराधार असल्याचा दावा केला आहे. तर Setopati.com ने बोमजोन यांच्या आश्रमांमधील बेपत्ता तसे, लैंगिक अत्याचार आणि हिंसाचाराच्या कथित प्रकरणांचे तपशीलवार अहवाल प्रकाशित केले आहेत.