केंद्राने मंगळवारी डॉ. व्ही. नारायणन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) चे नवीन अध्यक्ष आणि अवकाश विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती केली. ते १४ जानेवारी रोजी संघटनेचे विद्यमान प्रमुख एस. सोमनाथ यांच्याकडून पदभार स्वीकारतील. मंगळवारी एका अधिसूचनेत, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सांगितले की, नारायणन यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय, कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या अधिकृत आदेशात म्हटले आहे, “मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने व्ही. नारायणन यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर वालियामाला हे अंतराळ विभागाचे सचिव आणि स्पेस कमिशनचे अध्यक्ष म्हणून १४ जानेवारी २०२५ पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत आपल्या पदावर कार्यरत असतील. कोण आहेत व्ही. नारायणन? त्यांची इस्रोच्या मोहिमांमधील भूमिका काय? त्याविषयी जाणून घेऊ.

कोण आहेत व्ही. नारायणन?

डॉ. व्ही. नारायणन हे एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आहेत, ज्यांना रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शनमध्ये जवळपास चार दशकांचा अनुभव आहे. त्यांनी १९८४ मध्ये इस्रोमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि विविध पदे हाताळली. सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्हीएसएससी) येथे साउंडिंग रॉकेट्स आणि ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉंच व्हेईकल (एएसएलव्ही) आणि पोलर सॅटेलाइट लॉंच व्हेईकल (पीएसएलव्ही) च्या सॉलिड प्रोपल्शन एरियामध्ये काम केले. २०१८ मध्ये त्यांची लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर (एलपीएससी) चे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, जे इस्रोच्या प्रमुख केंद्रांपैकी एक आहे. त्याचे मुख्यालय तिरुअनंतपुरममधील वलियामाला येथे आहे. या सेंटरमध्ये केंद्र प्रक्षेपण वाहनांसाठी द्रव, सेमी-क्रायोजेनिक प्रोपल्शन टप्पे, उपग्रहांसाठी रासायनिक आणि इलेक्ट्रिक प्रोपल्शन प्रणाली, प्रक्षेपण वाहनांसाठी नियंत्रण प्रणाली आणि अंतराळ प्रणालींच्या आरोग्य निरीक्षणासाठी ट्रान्सड्यूसर विकसित केले जाते.

Resignation letter of a junior engineer of the construction department Dharavishiv news
अभियंता आहे, गुलाम नाही! बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याचे राजीनामापत्र
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
कोण आहेत प्रताप सरनाईक; मुख्यमंत्र्यांनी शिवसेना शिंदे गटाचे पंख छाटले का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : मुख्यमंत्र्यांची शिंदे गटावर कुरघोडी? कोण आहेत प्रताप सरनाईक?
ugc decides to extend deadline for selection of professors principals vice chancellors pune news
प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू निवड मसुद्यावर किती हरकती-सूचना? २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा यूजीसीचा निर्णय
Meeting of Sindhudurg District Planning Board and Narayan Rane sawantwadi news
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा
kinjarapu ram mohan naidu pune marathi news
Air Taxi: ‘एअर टॅक्सी’ची २०२६ मध्ये चाचणी, केंद्रीय नागरी हवाईमंत्री नायडू यांची माहिती
Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
कोल्हापूर विमानतळाची भूसंपादन प्रक्रिया रखडली; सतेज पाटील, लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

हेही वाचा : मुलं जन्माला घालण्यासाठी ‘या’ देशात विद्यार्थ्यांना का दिले जात आहेत पैसे? नेमका हा प्रकार काय?

ते प्रोग्राम मॅनेजमेंट कौन्सिल स्पेस ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम्स (पीएमसी-एसटीएस) चे अध्यक्षदेखील आहेत. ही परिषद सर्व लॉंच वाहन प्रकल्प आणि कार्यक्रमांमध्ये निर्णय घेते. डॉ. नारायणन हे भारताच्या नियोजित मानवी अंतराळ उड्डाण मोहीम गगनयानसाठी राष्ट्रीय स्तरावरील मानवी रेटेड प्रमाणन मंडळाचे (एचआरसीबी) प्रमुख आहेत.

व्ही. नारायणन यांचे योगदान

डॉ. नारायणन यांनी ॲब्लेटिव्ह नोझल सिस्टीम, कंपोझिट मोटर केसेस आणि कंपोझिट इग्निटर केसेसच्या प्रक्रिया नियोजन, प्रक्रिया नियंत्रण करण्यात योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, एलपीएससीने इस्रोच्या विविध मोहिमांसाठी १८३ लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स आणि कंट्रोल पॉवर प्लांट्स वितरित केले. GSLV Mk III च्या C25 क्रायोजेनिक प्रकल्पासाठी प्रकल्प संचालक म्हणून त्यांची भूमिका ही डॉ. नारायणन यांच्या उल्लेखनीय कामगिरींपैकी एक होती. त्यांच्या नेतृत्वात C25 स्टेज GSLV Mk III वाहनाचा एक महत्त्वाचा भाग यशस्वीरित्या विकसित झाला.

शैक्षणिक पार्श्वभूमी

तामिळ माध्यम शाळांमध्ये शिक्षण घेतलेल्या डॉ. नारायणन यांनी क्रायोजेनिक अभियांत्रिकीमध्ये एमटेक आणि आयआयटी खडगपूरमधून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पीएचडी पूर्ण केली. एमटेक पदवीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्यांना रौप्य पदकदेखील मिळाले. चेन्नईच्या सत्यबामा विद्यापीठातून त्यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ऑनररी पदवी मिळाली. ‘एलपीएससी’च्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवनियुक्त इस्रो प्रमुखांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. डॉ. नारायणन यांना रॉकेट आणि संबंधित तंत्रज्ञानासाठी एएसआय पुरस्कार आणि ॲस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया (एएसआय) कडून सुवर्ण पदक मिळाले आहे. त्यांनी हाय एनर्जी मटेरियल सोसायटी ऑफ इंडियाज टीम अवॉर्ड व्यतिरिक्त उत्कृष्ट कामगिरीसाठी परफॉर्मन्स एक्सलन्स अवॉर्ड आणि टीम एक्सलन्स अवॉर्डसह अनेक इस्रो पुरस्कार प्राप्त केले आहेत.

एस. सोमनाथ यांच्या कार्यकाळातील यशस्वी मोहिमा

एस. सोमनाथ यांनी जानेवारी २०२२ मध्ये इस्रोचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी चांद्रयान-३ या तिसऱ्या भारतीय चंद्र संशोधन प्रकल्पाचे नेतृत्व केले. या मोहिमेच्या यशामुळे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवणारे पहिले राष्ट्र ठरले. चीन, अमेरिका आणि माजी सोव्हिएत युनियनच्या पाठोपाठ चंद्रावर सॉफ्ट लँडिंग मिळवणाऱ्या काही राष्ट्रांमध्ये भारताचे नाव जोडले गेले. त्यांच्या नेतृत्वाखाली अंतराळ संस्थेने मार्स ऑर्बिटर मिशन (मंगलयान) यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.

हेही वाचा : ‘HMPV’मुळे लहान मुलांना होऊ शकतो गंभीर आजार? तज्ज्ञ काय सांगतात? भारतातील स्थिती काय?

इस्रोचे नवीन ‘स्पेडेक्स मिशन’

भारताच्या स्पेस एजन्सीने अलीकडेच स्पेडेक्स लाँच केले, जे स्थानिक पातळीवर तयार केलेले स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान ‘गगनयान’ आणि ‘चांद्रयान ४’सारख्या भविष्यातील मोठ्या प्रकल्पांसाठी आवश्यक आहे. प्रत्येकी सुमारे २२० किलो वजनाचे SDX01 आणि SDX02 हे दोन लहान एकसारखे कृत्रिम उपग्रह ४७० किलोमीटर वर्तुळाकार कक्षेत प्रक्षेपित केले गेले आहेत. त्यापैकी एक चेझर असेल आणि एक टार्गेट सॅटेलाइट असेल. एकदा उपग्रह अभिप्रेत कक्षेत गेल्यानंतर प्रक्षेपण वाहन त्यांच्यादरम्यान एक वेग प्रदान करेल, ज्यामुळे उपग्रह एकमेकांपासून दूर जाऊ शकतील.

एका दिवसात उपग्रहांमध्ये १० ते २० किलोमीटरचे अंतर तयार होईल, ज्याला डिस्टंट एन्काऊंटर म्हणतात. चेझर लक्ष्यापर्यंत पोहोचल्यानंतर हळूहळू दोन उपग्रहांमधील अंतर कमी करण्यास सुरुवात करेल. पाच किलोमीटर, १.५ किलोमीटर, ५०० मीटर, २२५ मीटर, १५ मीटर, तीन मीटर आणि शेवटी लक्ष्य उपग्रहासह सामील होईल. डॉकिंग होत असताना, प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी व्हिडीओ कॅमेरा यंत्रणा वापरली जाईल. डॉकिंग पूर्ण झाल्यावर उपग्रह आपापसांत विद्युत शक्ती हस्तांतरित करतील. या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवून भारत इतर देशांच्या यादीत सामील होईल. सध्या अमेरिका, रशिया आणि चीन या देशांकडे स्पेस डॉकिंग कौशल्य आहे. अंतराळ संस्था ९ जानेवारी रोजी उपग्रह कक्षेत डॉक करणार आहे.

Story img Loader