अमेरिकेकडून त्यांच्या भारतीय राजदूताची नेमणूक कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर अमेरिकेच्या भारतातील राजदूतपदी एरिक गार्सेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी गार्सेट्टी लॉस एंजेलिस शहराचे महापौर होते. साधारण अडीच वर्षांपूर्वी गार्सेट्टी यांच्या नावाची भारतीय राजदूतपदासाठी घोषणा करण्यात आली होती. मात्र आता प्रत्यक्ष त्यांना राजदूतपदी नेमण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर एरिक गार्सेट्टी कोण आहेत? तसेच त्यांच्या राजकीय कारकीर्दीविषयी जाणून घेऊ या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महापौरपदाचा कार्यकाळ अनेक प्रकरणांमुळे चर्चेत राहिला
एरिक गार्सेट्टी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. साधारण पाच वर्षांपूर्वी अमेरिकेच्या राजकारणात त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते. डेमोक्रॅटिक पक्षातील ते एक महत्त्वाचे नेते म्हणून उदयास येत होते. मात्र मागील नऊ वर्षे त्यांचा महापौरपदाचा कार्यकाळ अनेक प्रकरणांमुळे चर्चेत राहिला. मागील आठवड्यात अमेरिकेच्या संसदेत गार्सेट्टी यांची राजदूतपदी नेमणूक करावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांची भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली.
हेही वाचा >> विश्लेषण: महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतून भारताला कोणाकडून किती अपेक्षा?
एरिक गार्सेट्टी यांचा परिचय
एरिक गार्सेट्टी यांच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार ते उच्चशिक्षित आहेत. या माहितीनुसार गार्सेट्टी सॅन फरनँडो व्हॅलीमध्ये वाढले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून बीए आणि एमएचे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी ऑक्स्फर्ड आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथूनही शिक्षण घेतले. अमेरिकन नेव्ही रिझर्व्हमध्ये त्यांनी १२ वर्षे नोकरी केली. गार्सेट्टी पियानोवादक आहेत. तसेच त्यांना फोटोग्राफीचीही आवड आहे. त्यांच्या पत्नीचे नाव एमी एलेन असून त्यांना एक मुलगी आहे.
गार्सेट्टी यांची अनेकवेळा प्रशंसा आणि टीकेची झोड
२०१३ साली एरिक गार्सेट्टी यांची लॉस एंजेलिस शहराच्या महापौरपदी निवड झाली. त्यांनी २०२२ पर्यंत हे पद सांभाळले. त्यांचा महापौरपदाचा कार्यकाळ अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. या काळात त्यांच्यावर अनेक आरोप झाले. मात्र काही चांगल्या निर्णयांमुळे त्यांची प्रशंसाही करण्यात आली. २०२८ साली होणारी ऑलिम्पिक स्पर्धा लॉस एंजेलिसमध्ये आयोजित केली जाणार आहे. याचे श्रेय गार्सेट्टी यांचेच आहे.
हेही वाचा >> विश्लेषण : मॅकमोहन रेषेमधील चीनच्या घुसखोरीबाबत अमेरिकेचा भारताला पाठिंबा; काय आहे मॅकमोहन रेषा?
जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्याप्रकरणामुळे रोष
महापौरपदी असताना गार्सेट्टी यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. त्यांनी किमान १५ डॉलर्स वेतनाचा निर्णय घेतला. तसेच शहराची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठीही महत्त्वाचे निर्णय घेतले. करोना महासाथीच्या काळात लोक भयभीत झालेले असताना त्यांनी शहरातील नागरिकांना धीर दिला. ते या काळात सातत्याने नागरिकांच्या संपर्कात होते. हीच बाब येथील नागरिकांना दिलासादायक वाटत होती. मात्र जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्या प्रकरणामुळे त्यांच्यावर संपूर्ण अमेरिकेतून टीका करण्यात आली. पोलिसांची पाठराखण केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. सिटी काउन्सिलवर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेही त्यांची प्रतिमा काळवंडली.
गार्सेट्टी यांच्या रिक जेकब या साहाय्यकावर लैंगिक गैरवर्तनचा आरोप करण्यात आला. या साहाय्यकाला पाठीशी घातल्याचाही आरोप गार्सेट्टी यांच्यावर करण्यात आला. हे प्रकरण पुढे चांगलेच गाजले होते.
हेही वाचा >> विश्लेषण : पॅरिसमध्ये हजारो टन कचरा रस्त्यावर पडून, नेमकं कारण का? फ्रान्समध्ये काय घडतंय?
रिक जाकोब प्रकरण नेमके काय आहे?
गार्सेट्टी यांचे अंगरक्षक आणि पोलीस अधिकारी मॅथ्यू गार्झा यांनी गार्सेट्टी यांचे साहाय्यक रिक जेकब यांच्याविरोधात २०२० साली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. जेकब यांनी मला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला. तसेच माझ्यावर लैंगिक शेरेबाजी केली, असा आरोप गार्झा यांनी केला होता. या प्रकरणाची लॉस एंजेलिसमध्ये चांगलीच चर्चा झाली होती. या आरोपानंतर जेकब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच गार्सेट्टी यांच्यावरही टीका करण्यात आली. मात्र मला या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नाही, असे तेव्हा गार्सेट्टी यांनी सांगितले होते. तर दुसरीकडे गार्सेट्टी यांना या प्रकरणाची संपूर्ण कल्पना आहे. मात्र त्यांना याबाबत कोणतीही कारवाई करायची नाही, असा आरोप तेव्हा विरोधकांकडून करण्यात आला होता.
…म्हणून मंत्रिपदाची संधी हुकली
एरिक गार्सेट्टी हे जो बायडेन यांच्या जवळचे सहकारी आहेत. निवडणुकीदरम्यान गार्सेट्टी यांनी बायडेन यांच्यासाठी काम केलेले आहे. याच कारणामुळे गार्सेट्टी यांना बायडेन यांच्याकडून मंत्रिमंडळात संधी दिली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र त्यांच्यावरील आरोप आणि जेकब प्रकरणामुळे त्यांची मंत्रिपदाची संधी हुकली. मंत्रिपदाची संधी मिळालेली नसली तरी मागील वर्षाच्या जानेवारी माहिन्यातच अमेरिकेच्या परराष्ट्रसंबंध समितीने भारतातील अमेरिकेच्या राजदूतपदासाठी त्यांच्या नावाला मंजुरी दिली होती. मात्र रिब्लिकन पक्षाचे सिनेटर चॉक ग्रासली यांनी जेकब प्रकरणाचा उल्लेख करत याला विरोध केला होता.
हेही वाचा >> विश्लेषण : परदेशी वकील आता भारतात प्रॅक्टीस करू शकणार, पण न्यायालयाबाहेर; याबाबत नेमके कोणते बदल झाले?
जेव्हा सिनेटद्वारे एखाद्या व्यक्तीच्या नियुक्तीला विरोध केला जातो, तेव्हा त्याच व्यक्तीची पुन्हा नियुक्ती करणे कठीण होऊन बसते. रिपब्लिकन पक्षाच्या इतर नेत्यांनीही गार्सेट्टी यांच्या नावाला विरोध केला होता. मात्र अखेर अधिकृतपणे गार्सेट्टी यांची भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.