‘The Satanic Verses’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक सलमान रश्दी यांच्यावर शुक्रवारी अमेरिकेत भ्याड हल्ला करण्यात आला. रश्दी न्यूयॉर्कच्या चौटाका इन्स्टिट्युटमध्ये लेक्चर घेण्यासाठी उपस्थित असताना एका इसमाने थेट स्टेजवर चढून त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यामध्ये रश्दी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात रश्दींना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असून या हल्ल्यामुळे त्यांचा एक डोळा निकामी होण्याची देखील शक्यता असल्याचं संगितलं जात आहे. वास्तविक रश्दी यांना याआधीही त्यांच्या सटॅनिक व्हर्सेस या पुस्तकासाठी धमक्या, फतवे आले आहेत. मात्र, पहिल्यांदाच त्यांच्यावर जीवघेणार हल्ला झाला आहे. या हल्ल्याची जगभरात चर्चा होत आहे. मात्र, या हल्ल्याच्या मागची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? त्यांच्यावर हल्ला का करण्यात आला? हा माथेफिरू हल्लेखोर नेमका आहे तरी कोण?

‘The Satanic Verses’ आणि वाद..

सलमान रश्दी यांनी जवळपास ३५ वर्षांपूर्वी अर्थात १९८८ मध्ये लिहून पूर्ण केलेल्या ‘द सटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झाला. तो वाद अजूनही शमण्याची चिन्ह नसून त्यातूनच त्यांच्यावर हल्ला झाल्याचा संशय पोलिसांना आहे. या पुस्तकावर इराणमध्ये १९८८ सालीच बंदी आणली गेली. रश्दींच्या या पुस्तकात ईश्वरनिंदा केल्याचा दावा करत इराणचे दिवंगत धार्मिक नेते अयातुल्लाह खोमेनी यांनी १९८९मध्ये म्हणजेच पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर वर्षभरात रश्दींविरोधात फतवा काढला. रश्दींची हत्या करणाऱ्या व्यक्तीला ३ दशलक्ष डॉलर्सचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
salman rushdi the satanic verses in india
The Satanic Verses: बंदीच्या चार दशकांनंतर सलमान रश्दींचं ‘दी सटॅनिक व्हर्सेस’ भारतात परतलं; १९८८ मध्ये जारी केले होते आदेश!
Sanjay shirsat marathi news
मंत्री संजय शिरसाट यांचा रोख अब्दुल सत्तारांवर
atrocities committed on name of religion in world are due to misconceptions says Sarsangchalak mohan bhagwat
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, “चुकीच्या समजुतीतून धर्माच्या नावाखाली अत्याचार…”

त्यानंतर अवघ्या ३ वर्षांत, म्हणजेत १९९१मध्ये, रश्दींच्या या पुस्तकाचा जपानी भाषेत अनुवाद करणाऱ्या हितोशी इगाराशी यांची जपानमध्ये चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. त्यापाठोपाठ पुस्तकाचे इटालियन भाषांतरकार इटोर कॅप्रिओलो यांच्यावर देखील मिलानमध्ये चाकूने हल्ला करण्यात आला होता. ऑक्टोबर १९९३मध्ये नॉर्वेमध्ये पुस्तक प्रकाशित करणारे विल्यम नेयगार्ड यांच्यावर देखील ओस्लोमध्ये गोळीबार झाला होता.

सलमान रश्दींवरचा फतवा!

१९९८मध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद खतामी यांनी रश्दींवर जारी करण्यात आलेल्या फतव्याला इराण सरकार समर्थन देत नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, हा फतवा अधिकृतरीत्या मागे घेण्यात आला नाही. काही वर्षांपूर्वीच इराणचे सध्याचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्लाह अली खामेनी यांनी तर जाहीरपणे म्हटलं होतं की रश्दींच्या हत्येसाठी जारी करण्यात आलेला फतवा एखाद्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीसारखा आहे. तो लक्ष्याचा भेद करेलच!

रश्दींवर हल्ला करणारा हादी मतर कोण आहे?

रश्दींवर हल्ला होताच न्यूयॉर्क पोलिसांनी तातडीने हालचाली करत हल्लेखोराला जेरबंद केलं. हादी मतर असं या हल्लेखोराचं नाव असून तो २४ वर्षांचा आहे. हादी मतर हा न्यू जर्सीचा रहिवासी आहे. एनबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सचा आढावा घेतल्यानंतर तो शिया कट्टरवादी विचारसरणी आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचा (IRGC) समर्थक आहे. आयआरजीसी ही इराणच्या इस्लामी व्यवस्थेचं संरक्षण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या इराणी लष्कराची हत्यारबंद शाखा आहे.

प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर जीवघेणा हल्ला; भर कार्यक्रमात चाकूने केले वार

एनबीसीच्या वृत्तानुसार, पोलिसांना मतरच्या मोबाईल फोनवर कासम सुलेमानीचं एक छायाचित्र सापडलं आहे. सुलेमानी हा आयआरजीसीचीच एक शाखा असलेल्या क्वाड फोर्सचा माजी प्रमुख होता. जानेवारी २०२०मध्ये सुलेमानीची अमेरिकी फौजांकडून बगदादमध्ये हत्या करण्यात आली होती.

हादी मतरनं रश्दींवर हल्ला का केला?

आता प्रश्न उरतो तो हादी मतरनं सलमान रश्दी यांच्यावर नेमका हल्ला का केला? खरंतर या हल्ला प्रकरणाचा तपास अमेरिकेची FBI आणि इतर तपास संस्था करत आहेत. यासंदर्भात त्यांनी अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही. हल्ला करण्यामागे मतरचा नेमका हेतू काय होता? याबाबत या तपास संस्था लवकरच अधिकृत निवेदन करण्याची शक्यता आहे. शिवाय मतर स्वत: इराणचा रहिवासी आहे किंवा नाही, याबाबत देखील खुलासा झालेला नाही. स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार हादी मतरकडे कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी इतर उपस्थितांप्रमाणेच अधिकृत पास होता.

हादी मतरच्या वयाचा विचार करता त्याचा जन्म सलमान रश्दी यांच्याविरोधात फतवा जारी करण्यात आल्यानंतर तब्बल दशकभरानंतर झाला आहे. अयातुल्लाह खोमेनी यांचं देखील त्याआधीच निधन झालं होतं. पण मतरच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या फोटोमुळे त्याचं आयआरजीसी कनेक्शन उघड होत आहे. त्यामुळे या फतव्यामुळेच त्यानं हे कृत्य केलं असावं, असा संशय व्यक्त होत आहे.

हे पुस्तक सलमान रश्दींनी ३५ वर्षांपूर्वी लिहिलं होतं. त्याच वर्षी त्यावर इराणमध्ये बंदी घातली गेली. मात्र, गेल्या ३५ वर्षांपासून ते वादात आहे. त्यासाठी सलमान रश्दींना मारण्यासाठी आत्तापर्यंत अनेकदा मोठमोठ्या रकमांची बक्षिसं देखील जाहीर करण्यात आली आहेत. परिणामी सलमान रश्दींना आत्तापर्यंत अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.

Story img Loader