Gujarat Election 2022: गेल्या वर्षी पंजाब विधानसभा निवडणुकांच्या वेळी आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीसाठी जाहीर केल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. तिथे केजरीवाल यांनी लोकांकडून मतदान घेऊन मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडला होता. विशेष म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला मोडीत काढत आपनं भाजपाला धूळ चारली आणि भगवंत मान पंजाबचे मुख्यमंत्री झाले. तसाच काहीसा आश्चर्याचा धक्का यंदाही अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या मतदारांसोबतच राजकीय वर्तुळालाही दिला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं तगडं आव्हान पेलण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी इसूदनभाई गढवी यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे भगवंत मान यांच्याप्रमाणेच इसूदनभाई गढवीही ‘डार्क हॉर्स’ ठरणार का? अशी चर्चा गुजरातच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

कसं ठरलं इसूदनभाई गढवींचं नाव?

गुजरातमध्येही केजरीवाल यांनी पंजाबप्रमाणेच लोकांकडून मुख्यमंत्री निवडीचं आवाहन केलं होतं. मोबाईल मेसेज, व्हॉट्सअॅप, व्हॉइस मेल आणि इमेल अशा सर्व माध्यमातून आपकडून नागरिकांना कोण मुख्यमंत्री हवेत? यासंदर्भात मत देण्याचं आवाहन केलं होतं. या सर्वेक्षणात जवळपास १६ लाख नागरिकांनी मतदान केल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. यापैकी ७३ टक्के नागरिकांनी गढवी मुख्यमंत्री म्हणून हवेत, असं मत दिल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा केजरीवाल यांनी केल्यानंतर इसूदनभाई गढवी यांनी स्टेजवरून खाली उतरून त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले.

Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Shivajinagar Constituency BJP Vs Congress Rebellion in Congress Congress nominated Dutta Bahirat against BJP MLA Siddharth Shirole Pune
शिवाजीनगरमध्ये ‘सांगली पॅटर्न?’
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात

कधी होणार आहेत गुजरातमध्ये निवडणुकाय़

गेल्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. त्याचवेळी गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होणं अपेक्षित होतं. मात्र, तेव्हा तारखा जाहीर न झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अखेर आता आयोगानं तारखा जाहीर केल्या असून येत्या १ आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यांमध्ये गुजरातमध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकांचा निकाल ८ डिसेंबर रोजी लागणार आहे.

विश्लेषण: इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर बेनझीर भुट्टोंच्या सभेची चर्चा का होतेय? पाकिस्तानातील संघर्ष आणखी चिघळणार?

पत्रकारितेचं शिक्षण ते दूरदर्शनमधील नोकरी

इसूदनभाई गढवी यांचा जन्मह गुजरातच्या द्वारका जिल्ह्यातील पिपलिया गावात झाला. १० जानेवारी १९८२ रोजी जन्मलेल्या गढवींना ४०व्या वर्षी आपकडून मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी मिळाली आहे. त्यांचा हा प्रवास आधी पत्रकारिता, नंतर चॅनल हेड आणि राजकीय पदार्पणाच्या दुसऱ्याच वर्षी मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी असा झाला आहे. ओबीसी समाजातून आलेल्या गढवी यांनी गुजरात विद्यापीठातून २००५ साली त्यांची पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली.

दूरदर्शनपासून त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर २००७ साली त्यांनी इटीव्ही गुजरातीसाठी पत्रकारिता सुरू केली. २०१५ साली गढवींनी व्हीटीव्ही या गुजराती वृत्तवाहिनीवर अँकर म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. या काळात ते वाहिनीचे स्टार अँकर झाले. गुजरातमध्ये या वाहिनीच्या माध्यमातून ते जनमाणसात पोहोचले. २०२१ साली त्यांनी वाहिनीचे संपादक म्हणून राजीनामा दिला आणि आम आदमी पक्षात प्रवेश करून राजकीय विश्वात पदार्पण केलं.

१५० कोटींचा घोटाळा आणि वृत्तांकन!

ईटीव्ही गुजरातीमध्ये काम करताना गढवींनी गुजरातच्या डांग आणि कापराडा जिल्ह्यातील अवैध जंगलतोडीच्या घोटाळ्यावर केलेल्या वृत्तांकनाची जोरदार चर्चा झाली होती. तब्बल १५० कोटींच्या या घोटाळ्यावर त्यांनी केलेल्या सविस्तर वृत्तांकनामुळे हा घोटाळा उजेडात आला. यानंतर गुजरात सरकारने या प्रकरणी कारवाई केली. शेतकऱ्यांच्या समस्यांवर काम करताना त्यांनी केलेल्या वृत्तांकनामुळे ग्रामीण भागातून त्यांना चांगला पाठिंबा मिळू लागला आहे.

तिन्ही पक्षांकडून आल्या होत्या ऑफर्स!

इसूदनभाई गढवींनी २०२१मध्ये भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी अशा तिन्ही पक्षांकडून पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, असा दावा केला आहे. “मला लोकांसाठी काम करायचं होतं. त्यामुळे मी पत्रकारिता सोडली. भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी अशा तिन्ही पक्षांकडून मला पक्षप्रवेशासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. पण नंतर एक दिवस अरविंद केजरीवाल यांनी मला भेटायला बोलवलं. लोकांसाठी काम करायला मिळेल म्हणून मी आपमध्ये प्रवेश केला. आपमध्ये मी जे काम करतोय, त्यामध्ये मी समाधानी आहे. पक्षात कोणतेही मतभेद नाहीत”, असं गढवींनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं.

विश्लेषण: मोरबी ‘झुलता पूल’ दुर्घटना म्हणजे ‘Act of God’? नेमका दावा काय? नियमात काय सांगितलंय?

‘आप’साठी पहिलं पाऊल!

इसूदनभाई गढवींच्या रुपात आम आदमी पक्षाला गुजरातमध्ये आल्यानंतर पहिली प्रभावशाली व्यक्ती गुजरातमध्ये मिळाली. गुजरातमधील भाजपाच्या २७ वर्षांच्या सत्तेला आव्हान देऊन त्यांना सत्तेतून पायउतार करण्याचं कठीण आव्हान आपसमोर आहे. त्यामुळे गढवींचाही निवडणुकीचा रस्ता कठीण असेल. मात्र, पंजाबप्रमाणेच गुजरातमध्येही प्रस्थापितांना धक्का देण्यात आप यशस्वी होणार की भाजपा आपला बालेकिल्ला राखणार? यावर आता राजकीय विश्लेषकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.