अफगाणिस्तानमध्ये सरकार बनवण्याच्या प्रयत्नामध्ये असणाऱ्या तालिबानने आपल्या सर्वोच्च नेत्याचं नाव निश्चित केलं आहे. मुल्ला मोहम्मद हसन अखुंडला देशाचा सर्वोच्च नेता म्हणजेच अफगाणिस्तानच्या पंतप्रधान पदी बसवलं आहे. नेता म्हणून अखुंड याची निवडही करण्यात आलीय. त्याचबरोबर दोन उपपंतप्रधानही नियुक्त करण्यात येणार असून मुल्ला बरादर आणि मुल्ला अब्दुस सलाम यांची या पदांवर वर्णी लागणार आहे. अफगाणिस्तानमधील प्रत्येक माहिती जागतिक स्तरावरील प्रसारमाध्यमांना देणारा जबीउल्लाह मुजाहिदीन हा अखुंडचा अधिकृत प्रवक्ता म्हणून काम करणार आहे. ‘द न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार मुल्ला अखुंडजादाने मोहम्मद हसन अखुंडचे नाव या पदासाठी सुचवलं आहे. अखुंडजादाने मोहम्मद हसन अखुंडला रईस-ए-जम्हूर, रईस-उल-वजारा म्हणून अफगाणिस्तानचा प्रमुख नेता या नावाने जाहीर करण्याचा प्रस्ताव मांडलाय. तालिबानला सहकार्य करणाऱ्या अनेक गटांच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यात आल्यानंतर अखुंडचं नाव निश्चित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा