SEBI barred Nasiruddin Ansari of Baap तथाकथित ‘फिन्फ्लूएन्सर्स’ – इंटरनेट इन्फ्लूएन्सर (प्रभावक) जे सामान्य गुंतवणूकदारांना आर्थिक सल्ला आणि शिफारसी देतात, यांना लगाम घालण्याचे प्रयत्न सुरू ठेवत, बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने बुधवारी (२५ ऑक्टोबर राजी)  ‘बाप ऑफ चार्ट’ या मोहम्मद नसिरुद्दीन अन्सारी, यांच्या मालकीच्या फर्मवर बंदी घातली, ही फर्म सिक्युरिटीज मार्केटमध्ये खरेदी, विक्री किंवा व्यवहार करण्यासाठी ओळखली जाते. 

सिक्युरिटीज मार्केटशी संबंधित शैक्षणिक प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने, अन्सारी हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे गुंतवणूकदारांना हमी परताव्याचे आश्वासन देऊन शेअर्सबद्दल शिफारसी देत ​​होते. सेबीने अन्सारी यांना १७.२ कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्याचे आदेश दिले, जे त्यांनी “गुंतवणूकदारांची दिशाभूल करून, त्यांना प्रभावित करून मिळविले होते.

Cryptic Pregnancy
गरोदर आहोत हे महिलांना कळतच नाही? काय आहे ‘क्रिप्टिक प्रेग्नन्सी’? याची इतकी चर्चा का?
asthma new treatment
अस्थम्याच्या रुग्णांसाठी मोठी बातमी; गेमचेंजर ट्रीटमेंटचा शोध, ५०…
Chewing Gum Waste
Chewing Gum Waste: च्युइंगम ठरतंय पर्यावरणासाठी घातक!; चघळलेल्या च्युइंगमचं नंतर काय होतं?
Retired officers senior citizens targeted for digital arrest How to protect from cyber bullies
निवृत्त अधिकारी, ज्येष्ठ नागरिक ‘डिजिटल अरेस्ट’चे नवे लक्ष्य? सायबर भामट्यांपासून बचाव कसा करावा? 
What is the reason for the high rate of health insurance denials
आरोग्य विमा नाकारला का जातोय? अंशतः अथवा पूर्णतः दावे नाकारण्याचे प्रमाण ९५ टक्के का? 
Record production of most food grains expected in Kharip
खरिपातील बहुतेक अन्नधान्याच्या विक्रमी उत्पादनाचा अंदाज… पण यामुळे महागाई आटोक्यात येईल का?
Why is the One Nation One Subscription scheme costing so much
विश्लेषण: ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’साठी इतका खर्च का?
vishnu gupta ajmer darga
अजमेर दर्गा शिवमंदिराच्या जागेवर असल्याचा हिंदू सेनेच्या प्रमुखांचा दावा, कोण आहेत विष्णू गुप्ता?

कोण आहेत मोहम्मद नसिरुद्दीन अन्सारी?

बाप ऑफ चार्ट (BoC) फर्मचे अन्सारी हे एकमेव मालक आहेत. त्यांनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्टॉक मार्केट तज्ज्ञ म्हणून स्वत:ची जाहिरात केली आणि गुंतवणूकदार/ ग्राहकांना त्यांनी ऑफर केलेल्या विविध “शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी” नावनोंदणी करण्यासाठी आमंत्रित केले. त्याने केलेल्या शिफारशींनुसार गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगल्या व निश्चित परताव्याची किंवा नफा देण्याची हमी त्याने दिली होती.  

आणखी वाचा: ‘भटक्या कुत्र्यांमुळे मुंबईत पेटली दंगल, इंग्रजांची झाली होती उपासमार’!

अन्सारी नक्की काम कसे करत होते?

SEBI ला आढळले की अन्सारी यू ट्यूब (YouTube), एक्स (X) (पूर्वीचे Twitter), इन्स्टाग्राम (Instagram), व्हॉटस अ‍ॅप (WhatsApp) आणि टेलिग्राम (Telegram) या सारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर BoC द्वारे शेअर्सच्या शिफारसी करत खरेदी/ विक्री सेवा प्रदान करत होते. गुगल प्ले आणि अ‍ॅपल स्टोअरवर उपलब्ध असलेल्या अ‍ॅप्स तसेच वेबसाईटद्वारे, बंच मायक्रोटेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (बंच) च्या माध्यमातून त्यांनी गुंतवणूकदारांना त्यांच्या ‘शैक्षणिक अभ्यासक्रमा’साठी नोंदणी करण्यास सांगितले होते.

अन्सारी शेअर मार्केटशी संबंधित १९ अभ्यासक्रम चालवत होते, ज्यात गुंतवणूकदारांना परतावा देण्याचे आश्वासन देणारे चार अभ्यासक्रम होते, असे सेबीने सांगितले. बंच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या चॅट फंक्शनॅलिटीद्वारे माहिती/ दस्तावेज/ सामग्री सामायिक करणार्‍या आणि रिअल टाइममध्ये संवाद साधणार्‍या ‘शिक्षका’शी जोडलेले विद्यार्थी सेबीला आढळले. अन्सारी यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांच्या/ ग्राहकांच्या खाजगी गटांमध्ये खरेदी/ विक्रीच्या शिफारशी दिल्याचेही तपासात आढळून आले.

गुंतवणूकदारांकडून गोळा केलेली रक्कम अन्सारी, BoC, Golden Syndicate Ventures Pvt Ltd (एक कंपनी ज्यामध्ये अन्सारी महत्त्वपूर्ण भागधारक आहे) आणि पी राहुल राव (गोल्डन सिंडिकेट व्हेंचर्सचे दुसरे महत्त्वपूर्ण भागधारक) यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आली. SEBI ने गोल्डन सिंडिकेट व्हेंचर्सच्या इतर चार संचालकांची नावे दिली: आसिफ इक्बाल वानी, तबरेझ अब्दुल्ला, मनशा अब्दुल्ला आणि वामशी जाधव, ज्यांचा देखील अनोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार क्रियाकलापांमध्ये सहभाग होता. या चार व्यक्तींच्या खात्यातही पैसे जमा झाले, असे नियामकाने सांगितले.

बाप ऑफ चार्टचे किती सदस्य आहेत?

अन्सारी (@Baapofchart) यांच्या YouTube चॅनेलचे ४.४३ लाखांहून अधिक सदस्य आहेत आणि ७ कोटींहून अधिक व्ह्यूज आहेत. ते बाप ऑफ चार्ट ऑप्शन हेजिंग नावाचा टेलीग्राम ग्रुप/ चॅनेलदेखील चालवतात. ज्याचे सुमारे ५३ upej सदस्य आहेत. ‘baapofchart’ च्या इन्स्टाग्राम (Instagram) विद्यमान X-एक्स खात्यांचे अनुक्रमे ५९ हजार आणि ७८ हजार फॉलोअर्स आहेत, असे सेबीने म्हटले आहे. तर त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅनलचे १३ हजारपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

ऑक्टोबर २०२३ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत अन्सारी सदस्यांना खरेदी/ विक्रीच्या शिफारशी देत ​​राहिले, असे सेबीने म्हटले आहे. ऑनलाइन शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासोबतच, अन्सारी यांनी गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज मार्केटबद्दल शिक्षित करण्यासाठी विविध शहरांमध्ये प्रत्यक्ष कार्यशाळाही आयोजित केल्या.

नसिरुद्दीन अन्सारी यांनी किती पैसे कमवले?

सेबीच्या तपासणीत अन्सारीने बंचच्या प्लॅटफॉर्मवर आणि मोबाइल अॅप्सवर सूचीबद्ध अभ्यासक्रम/ कार्यशाळांमधून १३ कोटी ७८ लाख रुपये गोळा केले. “संपूर्ण रक्कम फसव्या आणि नोंदणीकृत नसलेल्या गुंतवणूक सल्लागार क्रियाकलापांमधून प्राप्त शुल्क म्हणून गणली जाते,” असे SEBI ने सांगितले. याव्यतिरिक्त, कोटक महिंद्रा बँकेतील अन्सारी आणि BoC च्या खात्यांशी जोडलेल्या दोन UPI ​​आयडींद्वारे ३.४२ कोटी रुपये गोळा करण्यात आले. यूपीआय आयडी वेबसाइट आणि सोशल मीडिया हॅण्डलवर प्रसिद्ध करण्यात आले होते, असे नियामकाने सांगितले.

सेबीने याबाबत म्हटले आहे की, “संबंधित नोटीस बजावण्यात आलेल्या कंपनीने जानेवारी २०२१ ते जुलै २०२३ या कालावधीत ग्राहक/ गुंतवणूकदारांना दिशाभूल करणारी / खोटी माहिती देऊन अभ्यासक्रम / कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी गळ घालत ग्राहकांना त्यांच्या अतिनिकटवर्तीय गटांमध्ये सहभागी करून व्यवहार करण्यास प्रवृत्त केले आणि त्या मार्फत १७.२ कोटी रुपये गोळा केले आहेत.”

आणखी वाचा: Killers of the Flower Moon: रूपेरी पडद्यावर आलेले ‘अमेरिकन- इंडियन्स’च्या हत्याकांडामागचे गूढ आहे तरी काय?

सेबीने कोणते अंतरिम आदेश दिले?

शैक्षणिक स्वरूपाचा कार्यक्रम असल्याचे सांगत आपण सेबीने मान्यता दिलेले अधिकृत सल्लागार असल्याचा आभास निर्माण करत  अन्सारी/ BoC ने ग्राहकांची दिशाभूल करत पैसे गोळा केले. अन्सारी/BoC द्वारे जारी केलेल्या YouTube वरील ट्रेलर व्हिडीओजमधील थिएट्रिक्स आणि शोमॅनशिपचा उद्देश परताव्याचा भ्रम निर्माण करून ग्राहकांकडून पैसे उकळणे हाच होता, असे सेबीने अंतरिम आदेश जारी करताना म्हटले आहे. प्राथमिकदृष्ट्या या सगळ्याच्या मुळाशी, फसव्या कृती आहेत. अन्सारी व त्याच्या कंपनीने ग्राहकांना भूलवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले, अतिप्रचंड खोट्या नफ्याचे आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेवत ग्राहकांनी व्यवहार केले. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या हिताचे आणि शेअर बाजारातील व्यवहारांच्या विश्वासार्हतेच्या रक्षणासाठी, सेबीने अन्सारी आणि इतरांना ‘बाप ऑफ चार्ट’ किंवा इतरांना गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करणे किंवा गुंतवणुक सल्लागार म्हणून काम करण्यापासून रोखणारे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे अन्सारी, राहुल राव आणि गोल्डन सिंडिकेट व्हेंचर्सना रोखे खरेदी, विक्री किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे व्यवहार करण्यापासून रोखण्यात आले आहे आणि १५ दिवसांच्या आत शेड्युल्ड कमर्शियल बँकेच्या एस्क्रो खात्यात १७.२ कोटी रुपये जमा करण्यास सांगितले आहे.

गुंतवणूकदारांनी यातून काय शिकावे?

ऑनलाइन गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेताना ते सेबीने मान्यता दिलेले अधिकृत सल्लागार आहेत का, हे  गुंतवणूकदारांनी तपासून घ्यावे. त्यानंतरच त्यांच्यावर विश्वास ठेवून व्यवहार करावेत, असे आवाहन सेबीने केले आहे. सेबीकडून नोंदणीचे प्रमाणपत्र घेतलेल्या सल्लागारांशीच व्यवहार करावा. गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, SEBI ने गुंतवणूक सल्लागारांची नोंदणी, त्यांची शैक्षणिक पात्रता आणि आचारसंहिता यासाठी विशिष्ट अटी घातल्या आहेत. सध्या सेबकडे १३१३ अधिकृत- नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.