पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सला (आयएसआय) नवीन प्रमुख मिळाला आहे. लेफ्टनंट जनरल मुहम्मद असीम मलिक यांची पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मलिक यांच्या नियुक्तीची घोषणा पाकिस्तानी राज्य प्रसारक ‘पीटीव्ही न्यूज’ने त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावर केली. मलिक ३० सप्टेंबर रोजी ‘आयएसआय’चा कार्यभार स्वीकारणार आहेत. २०२१ पासून या पदावर असलेले लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम यांची नियुक्ती माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केली होती. माजी आयएसआय प्रमुख फैज हमीद यांच्या अटकेच्या एका महिन्यानंतर मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोण आहेत मुहम्मद असीम मलिक? हे पद किती महत्त्वाचे आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

मुहम्मद असीम मलिक कोण आहेत?

मलिक सध्या रावळपिंडी येथील जनरल मुख्यालयात ॲडज्युटंट जनरल म्हणून कार्यरत आहेत. या पदावर असणारी व्यक्ती पाकिस्तानी लष्कराचे प्रशासकीय कामकाज पाहते. ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांना लेफ्टनंट जनरल पदावर बढती देण्यात आली होती. मलिक यांनी अमेरिकेतील फोर्ट लीव्हनवर्थ आणि ब्रिटनमधील रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीजमधून पदवी प्राप्त केली आहे. त्यांना ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ पुरस्कारदेखील मिळाला आहे. हा पुरस्कार पाकिस्तानी मिलिटरी अकादमीमधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याला दिला जातो. त्यांनी वझिरीस्तानमधील इन्फंट्री ब्रिगेड आणि बलुचिस्तानमधील इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्व केले आहे. त्यांनी नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी (एनडीयू) मध्ये मुख्य प्रशिक्षक तसेच कमांड अँड स्टाफ कॉलेज क्वेटा येथे प्रशिक्षक म्हणूनही काम केले.

what is quad grouping
QUAD संघटना नेमकी काय आहे? भारतासाठी या संघटनेचे महत्त्व काय?
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
Discussion between Prime Minister Narendra Modi and US President Joe Biden during the Quad summit
मोदी, बायडेन द्विपक्षीय चर्चा; हिंदप्रशांत सागरी प्रदेशासह जागतिक आणि प्रादेशिक मुद्दे उपस्थित
mehbooba mufti pdp likely to be kingmaker in jammu and kashmir for government formation
जम्मू-काश्मिरात मेहबुबांची ‘पीडीपी’ किंगमेकर?
Pervez Musharraf land acqasition
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती मुशर्रफ यांच्या भारतातील वडिलोपार्जित जमिनीचा लिलाव; शत्रू संपत्ती कायदा काय आहे?
pakistani army chief asim munir
Kargil War : २५ वर्षांनंतर पाकिस्तान सैन्याने मान्य केली कारगिल युद्धातील भूमिका; लष्करप्रमुख असीम मुनीर म्हणाले, “आमच्या सैनिकांनी…”
pm modi pakistan visit
नेहरू ते मोदी; कोणकोणत्या पंतप्रधानांनी पाकिस्तानला भेट दिली? तेव्हा नक्की काय घडले? पंतप्रधान मोदी पाकिस्तानचे निमंत्रण स्वीकारतील का?
kevan parekh apple cfo
अ‍ॅपलचे नवे ‘सीएफओ’ भारतीय वंशाचे; कोण आहेत केवन पारेख?

हेही वाचा : चार दिवसांत १४ लाख लाडवांची विक्री; जनावरांच्या चरबीचा वाद तरीही भाविकांकडून लाडूखरेदी; कारण काय?

हे पद महत्त्वाचे का आहे?

आयएसआय महासंचालक हे पद सामान्यतः सेवारत लष्करी अधिकार्‍याला दिले जाते. हे पद देशांतर्गत राजकारण, लष्करी आणि परराष्ट्र संबंधांसाठी पाकिस्तानमधील सर्वात शक्तिशाली पदांपैकी एक आहे. आयएसआय प्रमुखांना तांत्रिकदृष्ट्या पंतप्रधानांना प्रत्येक बाबीचा अहवाल द्यावा लागतो. त्यांचे नियंत्रण पाकिस्तानचे लष्करप्रमुख करतात. ‘डॉन’च्या वृत्तानुसार, आयएसआय प्रमुखाची नियुक्ती करण्याची पद्धत पाकिस्तानच्या घटनेत किंवा लष्करी कायद्यात नमूद केलेली नाही. त्याऐवजी अंतिम निर्णय घेणाऱ्या पंतप्रधानांना लष्करप्रमुख नावांची शिफारस करतात. इमरान खान यांनी आरोप केला आहे की, सध्याचे आयएसआय प्रमुख अंजुम यांचा वापर त्यांना लक्ष्य करण्यासाठी केला जात आहे. अंजुम यांनी सप्टेंबर १९८८ पासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

आयएसआय प्रमुख अंजुम (छायाचित्र-एमएनए फहीम खान/एक्स)

डिसेंबर २०२० मध्ये कराची कॉर्प्स कमांडर होण्यापूर्वी त्यांनी कराचीमध्ये कुर्रम एजन्सीमध्ये एका ब्रिगेडचे नेतृत्व केले, बलुचिस्तानमधील फ्रंटियर कॉर्प्स (उत्तर) चे नेतृत्व केले आणि क्वेटा येथील कमांड अँड स्टाफ कॉलेजचे कमांडंट म्हणून काम केले. ‘आयएसआय’चे माजी प्रमुख फैज हमीद यांच्या अटकेनंतर तपासाने एक वेगळे वळण घेतले. त्याच्या एकाच महिन्यानंतर नवीन आयएसआय प्रमुखाची नियुक्ती झाली आहे, चकवालमध्ये सापडलेल्या आयफोनमुळे फैज हमीद आणि इम्रान खान यांच्यातील संबंधांविषयी अनेक गोष्टी उघड झाल्या; ज्यानंतर फैज हमीद यांना अटक करण्यात आली होती.

१२ ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या लष्कराने जाहीर केले की, जनरल हमीद यांना डिसेंबर २०२२ मध्ये सेवानिवृत्तीनंतर लष्करी कायद्याच्या उल्लंघनाच्या अनेक घटनांमुळे अटक करण्यात आली आहे. लष्कराने पुढे सांगितले की, “फील्ड जनरल कोर्ट मार्शलची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि लेफ्टनंट जनरल (निवृत्त) फैज हमीद यांना लष्करी ताब्यात घेण्यात आले आहे.” पाकिस्तानी लष्कराने स्पष्ट केले की, माजी आयएसआय प्रमुखाविरुद्धची कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात २०२३ मध्ये टॉप सिटी नावाच्या जमीन विकास कंपनीने याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाकडून चौकशीची मागणी करण्यात आली होती, असे ‘जिओ न्यूज’च्या वृत्तात सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : ऑस्करसाठी चित्रपटांची निवड नेमकी कशी होते? ‘FFI’ काय आहे?

कंपनीने आरोप केला आहे की, हमीद आणि त्यांच्या भावाने अनेक मालमत्तांची मालकी मिळवली होती आणि कंपनीच्या मालकाला धमकावलेही होते. अनेक वरिष्ठ न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात असा आरोपही केला आहे की, खानविरुद्ध खटले निकाली काढण्यासाठी आयएसआय एजंट त्यांच्यावर दबाव आणत आहेत. स्थानिक माध्यमांमध्ये हे पत्र प्रसिद्ध झाले. न्यायाधीशांवर दबाव आणणे किंवा राजकारणातील कोणतीही भूमिका नाकारणाऱ्या पाकिस्तानच्या लष्कराने १९५८ पासून तीन दशकांहून अधिक काळ पाकिस्तानवर राज्य केले आणि देशातील प्रमुख राज्यकारभारावर नियंत्रण ठेवले आहे.