-अनिश पाटील

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केलेल्या तपासानुसार दाऊद टोळीकडून मुंबई व इतर प्रमुख शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी हवालाच्या माध्यमातून विदेशातून पैसे पुरवले गेले. तसेच दाऊद टोळीने राजकीय नेते आणि व्यावसायिकांसह प्रतिष्ठित व्यक्तींवर हल्ले करून भारतात दहशत निर्माण करण्यासाठी एक विशेष गट तयार केला होता. या कट कारस्थानासाठी मुंबईतूनच पैसा गोळा करण्यात येत होता. त्यासाठी दाऊद टोळी खंडणी वसूल करत होती. तीन दशकांपूर्वी मुंबई व देश सोडून पळालेला कुख्यात दाऊद इब्राहिम व त्याचा हस्तक छोटा शकील आजही मुंबईत सक्रिय आहेत. पण यांचे मुंबईतील व्यवहार कोणामार्फत सुरू आहेत याविषयीचे विश्लेषण.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

दाऊद टोळीची अधोविश्वातील सुरुवात कशी झाली?

दक्षिण मुंबईतील पाखमोडिया स्ट्रीटवर राहणारा दाऊद इब्राहिम कासकर हाजी मस्तानसाठी काम करत होता. वडील पोलीस दलामध्ये असल्याचा धाक दाखवून दाऊद व्यापाऱ्यांकडून हप्तेवसुली करायचा. ४ डिसेंबर १९७४ रोजी त्याने साथीदारांच्या मदतीने कर्नाक बंदर येथे एका व्यापाऱ्याला पावणेचार लाखाला लुटले. त्यात तो पकडला गेला. चार वर्षांची शिक्षा झाली. उच्च न्यायालयाकडून पुढे त्याला जामीन मिळाला. त्यानंतर आलमजेब, जहांगीरखान, सय्यद बाटला, मोहंमद इक्याल, मोहमद काल्या या गुंडांमध्ये पैशाच्या वाटपावरून फूट पडली. दाऊद आणि आलमजेब एकमेकांच्या जिवावर उठले. त्याच काळात हाजी मस्तान व युसूफ पटेल पुन्हा एकत्र आले. दाऊद व त्याचा मोठा भाऊ शाबीर हे या दोघांसाठी काम करू लागले. सय्यद बाटला, आयुब खान, मेहबूब खान ऊर्फ आयूब लाला यांच्या तस्करीच्या व्यवसायात ते दोघे भाऊ धुडगूस घालू लागले. १ जुलै १९७७ रोजी तर दाऊद आणि शाबीरने या आयूब लालाचे चक्क अपहरण केले. याच टोळीयुद्धातून १२ फेब्रुवारी १९८१ रोजी प्रभादेवीतील पेट्रोलपंपाजवळ दाऊदचा भाऊ शाबीर याचा खून झाला. पुढे आमीरजादा या बड्या गुंडाला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आणि दाऊदचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर दोन वर्षांतरच दाऊदने मुंबईच नव्हे, तर अगदी दिल्ली, नेपाळपर्यंत आपले साम्राज्य पसरवले. दाऊदने बडा राजनच्या मदतीने पठाण टोळीच्या आमीरजाद्याचा खून करवला. पुढे दाऊद टोळीने १९८४मध्ये करीम लालाचा भाचा समदखान याचाही खून करवला. १९८५मध्ये पठाण टोळीचा आलमजेब पोलिस चकमकीत मारला गेला आणि मुंबईत अधोविश्वावर दाऊद टोळीची एक हाती सत्ता निर्माण झाली. त्यानंतर दाऊदने १९८६ मध्ये दुबई गाठली व तेथून सर्व टोळी हाताळू लागला. आता दाऊद पाकिस्तानात राहून त्याच्या कारवाया करत आहे.

एनआयएने आरोपपत्र दाखल केलेला आरिफ भाईजान कोण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रुट व आरिफ अबुबकर शेख ऊर्फ आरिफ भाईजान दाऊद टोळीचे मुंबईतील कामकाज सांभाळतात. आरिफ भाईजान हा पश्चिम उपनगरापासून अगदी विरारपर्यंतचे दाऊद टोळीचे कामकाज पाहत आहे. आरिफ हा छोटा शकीलची धाकटी बहीण फेहमिदा हिचा पती आहे. तिचे २०२० मध्ये निधन झाले. गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पंड्या यांच्या हत्येनंतर २००६ मध्ये आरिफसह इतर नऊ जणांना दुबईतून हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची रवानगी भारतात करण्यात आली. तेव्हापासून खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये आरिफ भाईजानचे नाव अधूनमधून संशयित म्हणून चर्चेत यायचे. मिरा रोड येथील जमिनीच्या वादातून व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी ऑक्टोबर महिन्यात आरिफ भाईजानला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनेही अटक केली होती.

सलीम फ्रुट कोण आहे?

दक्षिण व मध्य मुंबईतील दाऊद टोळीचे कामकाज सलीम फ्रूट हाताळत असल्याचे बोलले जाते. सलीमचा फळ विक्रीचा कौटुंबिक व्यवसाय होता. त्यामुळे सलीम फ्रुट नावाने त्याला ओळखले जाते. त्यालाही २००६मध्ये यूएईमधून हद्दपार करण्यात आले होते. छोटा शकीलसह त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्याप्रकरणी मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो २०१०पर्यंत तुरुंगात होता. नुकतीच, ऑक्टोबर महिन्यात व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी त्यालाही गुन्हे शाखेने अटक केली होती.

एनआयएने काय कारवाई केली?

एनआयएने अलीकडेच आरिफ अबुबकर शेख ऊर्फ आरिफ भाईजान, शब्बीर अबुबकर शेख आणि मोहम्मद सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रूट या तिघांना दहशतवादासाठी वित्त पुठवठा केल्याप्रकरणी प्रकरणात अटक केली होती. याप्रकरणी सत्र न्यायालयात दाऊद टोळीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. आरोपपत्रात गुन्ह्यांत सहभागी आरोपी दाऊद इब्राहिम, छोटा शकील यांच्यासह अटक आरोपी आरिफ अबुबकर शेख ऊर्फ आरिफ भाईजान, शब्बीर अबुबकर शेख आणि मोहम्मद सलीम कुरेशी ऊर्फ सलीम फ्रूट यांच्या नावांचा समावेश आहे. एनआयएने यावर्षी फेब्रुवारीमध्ये दाऊद इब्राहिम व त्याच्या साथीदारांविरुद्ध नव्याने गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू ठेवला. त्यातून दाऊद टोळीच्या गंभीर कृत्यांची माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) तसेच मोक्का कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. आरोपपत्रानुसार, देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्यासाठी, मुंबई व अन्य शहरांत हल्ले करून सामान्य लोकांमध्ये दहशत माजवण्यासाठी अटक आरोपींना विदेशात लपून बसलेल्या कुख्यात दाऊद इब्राहिमने हवालाच्या माध्यमातून पैसे पुरवले. तसेच दाऊद टोळीने विविध प्रकारची बेकायदेशीर कृत्ये करून गुन्हेगारी कारवाया घडवून आणण्याचा कट रचला. अटक आरोपींनी दाऊद इब्राहिम व छोटा शकीलच्या नावाने जिवे मारण्याच्या धमक्या देत खंडणी उकळली. या माध्यमातून दहशतवादी कारवायांसाठी पैसे गोळा केले. तसेच दाऊद इब्राहिमच्या फायद्यासाठी देशातील श्रीमंत लोकांना धमकावण्यात आले, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

सलीम फ्रुट व आरिफ भाईजान हे कसे उदयाला आले?

दाऊद इब्राहिमने देश सोडल्यानंतर त्याची बहीण हसिना पारकर मुंबईतील दाऊद टोळीचे सत्ताकेंद्र झाली. व्यावसायिक वादातील मध्यस्थीतून अनेकांना धमकावल्याचे तिच्यावर आरोप झाले होते. मात्र २०१४मध्ये तिच्या मृत्यूनंतर तिची जागा छोटा शकीलचे नातेवाईक आरिफ भाईजान व सलीम फ्रुट यांनी घेतली. त्यासाठी दोघेही छोटा शकीलच्या नावाचा वापर करत असून मध्यस्थीतून धमकावल्याच्या प्रकरणातही त्यांचे नाव यापूर्वीही आले आहे. पण दाऊद टोळीच्या भीतीने अनेकांनी तक्रार केली नाही. आता एनआयएने दोघांनाही अटक केल्यानंतर अनेक तक्रारदारांनी पुढे येऊन दोघांविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.

Story img Loader