भारतात जन्मलेल्या इतिहासकार शैलजा पाईक यांना प्रतिष्ठित मॅकआर्थर फेलोशिप मिळाली आहे. ही फेलोशिप ‘जीनियस ग्रँट’ म्हणूनही ओळखली जाते. ही फेलोशिप मिळवणाऱ्या त्या पहिल्या दलित विद्वान ठरल्या आहेत. आधुनिक भारतातील दलित समाजाचा अभ्यास, लिंगभेद आणि लैंगिकता यांसारख्या विषयावर केलेल्या कामासाठी त्या ओळखल्या जातात. त्या ५० वर्षीय भारतीय- अमेरिकन प्राध्यापक असून त्यांच्या सध्या सुरू असलेल्या संशोधनासाठी त्यांना अंदाजे ८००,००० डॉलर्स (सुमारे ६७ लाख) मिळणार आहेत.

मॅकआर्थर जीनियस ग्रँट हा एक अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार आहे. हा पुरस्कार दरवर्षी विविध क्षेत्रांतील व्यक्तींना दिला जातो. शैक्षणिक, विज्ञान, कला आणि विविध चळवळींमध्ये सहभागी असलेल्या असामान्य यश संपादन करणाऱ्या किंवा तशी शक्यता असणाऱ्या व्यक्तींनाच तो दिला जातो. पाईक आपल्या संशोधनातून दलित महिलांच्या अनुभवांना केंद्रस्थानी ठेवून जातीय भेदभावाचे स्वरूप आणि अस्पृश्यतेला चालना देणाऱ्या गोष्टी स्पष्ट करतात, असे फेलोशिप जाहीर करताना फाऊंडेशनने म्हटले आहे. शैलजा पाईक यांचा पुण्यातील येरवडा झोपडपट्टीतून सिनसिनाटी विद्यापीठात प्रतिष्ठित प्राध्यापक होण्यापर्यंतचा प्रवास प्रेरणादायक आहे. त्याच प्रेरणादायी प्रवासाचा घेतलेला हा आढावा.

Mithun Chakraborty, Dadasaheb Phalke Award,
डिस्को डान्सर…
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
rajbhasha kirti puraskar to rajbhasha kirti puraskar
महाबँकेला राजभाषेचा सर्वोच्च ‘कीर्ती पुरस्कार’
cosmos bank get best cooperative bank award
कॉसमॉस बँकेला सर्वोत्कृष्ट सहकारी बँकेचा पुरस्कार
Dadasaheb Phalke Award
Dadasaheb Phalke Award : दादासाहेब फाळके पुरस्काराची परंपरा कधी सुरु झाली? काय असतं पुरस्काराचं स्वरुप? कोण कोण आहेत मानकरी?
Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award News in Marathi
Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award : मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, सिनेसृष्टीतील योगदानाबाबत गौरव
farmers create chaos in krishi awards ceremony
कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात गोंधळ; फेटे उडवून शेतकऱ्यांकडून निषेध
Yb chavan centre declared awards on the name of Namdeo Dhondo Mahanor
मुंबई : कविवर्य ना.धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर

शिक्षण आणि रोजगार – झोपडपट्टीतून सुटण्यासाठी जादूची कांडी

एका रेडिओ मुलाखतीत शैलजा पाईक यांनी पुण्यातील येरवडा झोपडपट्टीत त्यांचे बालपण कसे गेले याबद्दल सांगितले आहे. शैलजा या येरवड्यात त्यांच्या तीन बहिणींबरोबर २०-बाय-२० फुटांच्या एका लहानशा खोलीत राहात होत्या. त्यांचे वडील देवोराम पाईक हे कुटुंबाचे एकमेव कमावते होते. ते दिवसभर वेटर आणि रेस्टॉरंट क्लीनर म्हणून कठोर परिश्रम करत असत, तर रात्री त्यांचे शिक्षण सुरू ठेवत. ते रात्रशाळेत जात आणि दिवसा काम करत असत. त्यांनी लग्न / धार्मिक कार्यक्रमांसाठी मंडप बांधून देण्याचे काम केले आणि त्याचवेळेस कार्यक्रमांदरम्यान [रेकॉर्डेड] संगीत वाजवण्याची कलाही आत्मसात केली होती. कठोर मेहनत घेऊन त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि कृषी विज्ञानात (Agricultural Sciences) पदवी संपादन केली, अशी पदवी मिळवणारे गावातील ते पहिले दलित होते,” असे शैलजा यांनी यूसी न्यूजच्या मुलाखतीत सांगितले.

अधिक वाचा: Video: संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते…

त्यांची आई फक्त सहावी शिकलेली असली तरी मुलांमध्ये शैक्षणिक महत्त्वाकांक्षा वाढवण्यामध्ये तिची महत्त्वपूर्ण भूमिका होती. “तिने घरातल्या कामांमध्ये आपले संपूर्ण लक्ष दिले, जेणेकरून मी आणि माझ्या बहिणींना आमच्या शिक्षणावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे शक्य होईल,” असे पाईक यांनी एनपीआरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. त्यांचा निर्धार पक्का असला तरी आजुबाजूची परिस्थिती पोषक नव्हती. पाईक यांनी त्यांच्या आजूबाजूच्या कठोर वास्तवाचे वर्णन केले आहे, त्यांच्या घरात नियमित पाणीपुरवठा किंवा खाजगी शौचालयही नव्हते. “मी कचर्‍यात आणि घाणीत वाढले, गल्लीमध्ये डुक्करं फिरायची,” असे त्या म्हणाल्या. त्यांना आठवते की, त्यांना सार्वजनिक नळावरून डोक्यावर पाण्याचे जड भांडे वाहून आणावे लागायचे. उच्चवर्णीय लोकांकडे वेगळ्या कपांमधून चहा पिणे किंवा त्यांच्याशी बोलताना मातीच्या जमिनीवर बसणे याचा अनुभवही त्यांनी घेतला. झोपडपट्टीतून बाहेर पडण्यासाठी शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवावी लागली, तेच चांगले आयुष्य मिळवण्याची गुरुकिल्ली होती, असे शैलजा पाईक यांनी ठामपणे सांगितले.

१९९६ साली पाईक यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळाली. तिथे त्यांनी इतिहासात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला त्यांनी आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. नंतर, फोर्ड फाउंडेशनच्या अनुदानाच्या मदतीने त्यांनी यूकेमधील वॉरिक विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली आणि आता त्या सिनसिनाटी (Cincinnati) विद्यापीठात इतिहासाचे अध्यापन करतात.

पाईक यांचे कार्य

पाईक यांनी खुलेपणाने सांगितले की, बालपण त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करणारे होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या कार्याद्वारे दलितांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पहिले पुस्तक, ‘Dalit Women’s Education in Modern India: Double Discrimination’, २०१४ साली प्रकाशित झाले. त्यांनी महाराष्ट्रातील दलित महिलांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर त्यात लक्ष केंद्रित केले आहे. त्या सांगतात, “दलित असल्यामुळे आणि त्यातही त्या महिला असल्याने दुहेरी भेदभाव सहन करावा लागला. त्यामुळे ती त्यांच्यासाठी एक महत्त्वाची प्रेरणा ठरली. पाईक यांचे दुसरे पुस्तक, ‘The Vulgarity of Caste: Dalits, Sexuality, and Humanity in Modern India’, हे स्टॅनफर्ड प्रेसने प्रकाशित केले आहे. या पुस्तकात महाराष्ट्रातील तमाशा कलाकारांच्या जीवनाचे विश्लेषण केले आहे.

तमाशा हे महाराष्ट्रातील दलितांनी शतकानुशतके प्रामुख्याने प्रचलित ठेवलेले लोकप्रिय आणि ठणठणीत लोकनाट्य आहे असंही त्या सांगतात. शैलजा पाईक यांनी त्यांच्या पुस्तकांव्यतिरिक्त साऊथ एशियन स्टडीज, जेंडर अॅण्ड हिस्ट्री, आणि इंडियन जर्नल ऑफ जेंडर स्टडीज सारख्या अग्रगण्य जर्नल्समध्येही योगदान दिले आहे. त्यांच्या कारकिर्दीत पाईक यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. मॅकआर्थर ग्रँट व्यतिरिक्त, त्यांना Frederick Burkhardt Fellowship, स्टॅनफोर्ड ह्युमॅनिटीज सेंटर फेलोशिप आणि लूस फाऊंडेशन फेलोशिप्सही मिळाल्या आहेत. २०२३ साली, त्यांना त्यांच्या द व्हल्गॅरिटी ऑफ कास्ट यासाठी जॉन रिचर्डस् पुरस्कार आणि आनंदा केंटिश कुमारस्वामी पुरस्कारही मिळाला.

पाईक यांचे भविष्यातील नियोजन काय आहे?

पाईक या मॅकआर्थर फेलोशिपच्या निधीचा वापर दलितांचे जीवन आणि जातिव्यवस्थेवर अधिक संशोधन आणि लेखन करण्यासाठी करणार आहेत. “हा निधी मला माझे संशोधन आणि लेखन सुरू ठेवण्यास मदत करेल, त्यामुळे इतरांना शिक्षण देणे आणि दलितांचे जीवन व जातिव्यवस्था यांचे दस्तऐवजीकरण तयार करणे शक्य होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. The MacArthur Fellowship is a ‘no-strings-attached’ grant that is paid over five years to individuals whose work addresses crucial gaps in knowledge. मॅकआर्थर फेलोशिपच्या निधीचा वापर करण्याचे स्वातंत्र्य फेलोला असते तर फेलोची निवड बाह्य नामनिर्देशित व्यक्तींमार्फत केली जाते. सध्या पाईक समकालीन दलित महिलांच्या घेतलेल्या मुलाखती आणि फील्डवर्कवर आधारित एक नवीन पुस्तक लिहीत आहेत. त्यांचे संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण दलित इतिहासलेखनाचे औपचारिक दस्तऐवजीकरण फारसे झालेले नाही आणि मुख्य प्रवाहातील भारतीय विद्यापीठांमध्ये हे संशोधन अद्याप अपूर्ण आहे. फेलोशिपने भारावलेल्या पाईक म्हणाल्या, “माझ्या आयुष्यात मला कधीही ‘जीनियस’ म्हटले गेले नाही… पण जेव्हा मी विचार करते की मी येथे कसे पोहोचले त्यावेळेस लक्षात येते की, त्यामागे एक खडतर प्रवास आहे. म्हणूनच हा पुरस्कार मी कृतज्ञतेने स्वीकारणार आहे.