न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात २६ नोव्हेंबरला दारुच्या नशेत असलेल्या एका प्रवाशाने विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये ७० वर्षीय वृद्ध महिलेवर लघुशंका केली. या प्रकरणाची दखल टाटा समुहाने घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर आता दिल्ली पोलिसांनी शनिवारी (७ जानेवारी) आरोपी शंकर मिश्राला (३४) बंगळुरू येथून अटक केली. त्यानंतर त्याला दिल्लीला आणलं गेलं. यानिमित्ताने हा आरोप शंकर मिश्रा कोण आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर शंकर मिश्रा कोण आहे? या प्रकरणात आतापर्यंत नेमक्या काय घडामोडी झाल्या? याचा हा आढावा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आरोपी शंकर मिश्रा अमेरिकेतील आर्थिक क्षेत्रातील दिग्गज कंपनी वेल्स फर्गो (Wells Fargo) या कंपनीत नोकरीला होता. या घटनाक्रमानंतर कंपनीने आरोपीला नोकरीवरून काढून टाकत निवेदन जारी केलं आहे. यात म्हटलं, “आमच्या कर्मचाऱ्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. आम्ही कर्मचाऱ्यांकडून उच्च व्यक्तिगत आणि व्यावसायिक वर्तणुकीची अपेक्षा करतो.”

शंकर मिश्रा कोण आहे?

शंकर मिश्रा वेल्स फर्गो या अमेरिकेतील कंपनीच्या भारतातील विभागाचा उपाध्यक्ष होता. तो मुंबईतील कार्यालयातून काम करत होता. तो मुंबईचाच रहिवासी आहे. त्याच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो कामगार नगरमध्ये राहतो आणि तेथे सुरज म्हणून ओळखला जातो. मागील दोन दशकांपासून तो तेथेच राहतो.

आरोपी शंकरचं लिंकइनवरही सुरज एम या नावाने अकाऊंट आहे. तो मुंबईतील एका खासगी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. नेहरू नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर मिश्राची याआधीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्याच्या शेजाऱ्यांनीही अशा कोणत्याही कृतीत शंकर मिश्रा सहभागी नसल्याचं सांगितलं. मिश्रा त्याची पत्नी, दोन वर्षाची मुलगी आणि पालकांबरोबर राहतो.

नेमकं प्रकरणं काय आणि आतापर्यंत काय घडलं?

२६ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये शंकर मिश्रा याने बिझनेस क्लासमधील एका महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती. यावेळी आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत होता. या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली. याशिवाय दिल्ली पोलिसांनी एअर इंडियाच्या त्या विमानातील पायलटसह आठ कर्मचाऱ्यांनाही चौकशीसाठी समन्स पाठवले. तसेच आरोपीच्या शोधासाठी बंगळुरू, मुंबई आणि दिल्लीला चार पथकं रवाना केली.

यानंतर एअर इंडियाच्या तक्रारीनुसार, दिल्ली पोलिसांनी बुधवारी (४ जानेवारी) भारतीय दंड संहिता कलम ३५४, २९४, ५०९, ५१० आणि एअर क्राफ्ट कायदा १९३७ च्या कलम २३ नुसार गुन्हा दाखल केला.

या प्रकरणात दिल्ली महिला आयोगानेही दिल्ली पोलीस, डीसीजीए आणि एअर इंडियाला नोटीस बजावली होती. तसेच या प्रकरणातील दोषींवर काय कारवाई केली याचा अहवाल मागितला.

हेही वाचा : विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका करणाऱ्या तरुणाला कंपनीचा दणका, केली मोठी कारवाई

घटनेनंतर आरोपी शंकर मिश्रा फरार होता. पोलिसांचं पथक आरोपीच्या कामगार नगरमधील घरीही गेलं. मात्र, आरोपीच्या कुटुंबाकडून तपासात सहकार्य मिळत नसल्याने मुंबई पोलिसांची मदत घेण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मिश्राच्या कुटुंबावर बारीक नजर ठेवली. तांत्रिक माहितीनुसार, आरोपी शंकर मिश्राचं शेवटचं लोकेशन बंगळुरू असल्याचं उघड झालं. यानंतर शनिवारी (७ जानेवारी) त्याला बंगळुरुमधून अटक करण्यात आली.

दरम्यान, एअर इंडियाने आरोपी शंकर मिश्राला प्रवास करण्यासाठी ३० दिवसांची बंदी घातली आहे.