काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (८ फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर मागासवर्गीय नसून ते सर्वसाधारण प्रवर्गात येत असल्याचा दावा केला होता. ”पंतप्रधान मोदी हे जन्माने ओबीसी नसून, ते तेली समाजाचे आहेत. या समाजाचा समावेश भाजपाने वर्ष २००० मध्ये ओबीसींच्या यादीत केला होता, असे ते म्हणाले. दरम्यान, राहुल गांधींच्या विधानानंतर आता गुजरातमधील तेली समाज नेमका कोण आहे? याविषयी देशभर चर्चा सुरू झाली आहे.

गुजरातमध्ये तेली समाजाला ‘ओबीसी दर्जा’

पंतप्रधान मोदी हे मोधघांची समाजाचं प्रतिनिधित्व करतात. ही तेली समाजातीलच एक उपजात आहे. गुजरातमधील हा समाज प्रामुख्याने खाद्यतेलाचा व्यापार करतो. गुजरातमधील १०४ जातींचा समावेश असलेल्या ओबीसींच्या यादीत २३ व्या क्रमांकावर घांची मुस्लीम, तेली, मोध-घांची, तेली साहू आणि तेली राठोड या समाजांचा समावेश आहे. घांची मुस्लीम समजाचा समावेश या यादीत १९९९ साली करण्यात आला होता; तर तेली, मोध घांची, तेली साहू, तेली राठोड या समाजाचा समावेश ४ एप्रिल २००० रोजी करण्यात आला, तर पंतप्रधान मोदी हे ७ ऑक्टोबर २००१ रोजी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Panvel issue of commuters loot of passengers Panvel,
पनवेल : प्रवाशांच्या समस्यांचा मुद्दा प्रचारातून गायब, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट, असुरक्षित प्रवासाबाबत सर्वपक्षीय नेते गप्पच
yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
maharashtra assembly election 2024 maha vikas aghadi vs mahayuti battle in konkan region
विश्लेषण : कोकणात लोकसभेतील यशाची पुनरावृत्ती महायुती दाखवणार का? महाविकास आघाडीला संधी किती?
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत
maharashtra assembly election 2024 rohit pawar s reply to mahesh landge in bhosari assembly constituency
पिंपरी : धमक्या देऊ नका, आम्ही राजकारणात गोट्या खेळण्यास आलो नाहीत; रोहित पवार यांचे महेश लांडगे यांना प्रत्युत्तर

हेही वाचा – विश्लेषण : मोदी सरकारने लोकसभेत सादर केलेल्या श्वेतपत्रिकेत नेमकं काय आहे? वाचा सविस्तर…

गुजरातबाहेरील तेली समाज

तेली समाज हा केवळ गुजरातमध्ये नसून गुजरातच्या बाहेरही वास्तव्यास आहे. पूर्व उत्तर प्रदेशमध्ये हा समाज गुप्ता आडनावाने ओळखला जातो, तर काही लोक मोदी हे आडनावदेखील वापरतात. बिहारमधील ओबीसींच्या यादीत ५६ व्या क्रमांकावर तेली समाज आहे, तर राजस्थानमधील ओबीसींच्या यादीत ५१ व्या क्रमांकावर तेली समाज आहे. शैक्षणिक आणि नोकऱ्यांसाठी महत्त्वाचे असलेल्या ओबीसींच्या या यादींमध्ये मोदी नावाचा कोणताही समाज किंवा जात नाही.

खरं तर अनेक लोक मोदी हे आडनाव वापरतात. ते कोणत्याही समाज किंवा जातीला सुचित करत नाहीत. गुजरातमध्ये मोदी आडनाव हिंदू, मुस्लीम आणि पारसी लोक वापरतात. याशिवाय बनिया, खरवास (पोरबंदरमधील मच्छीमार) आणि लोहणा समाजामध्येही मोदी आडनावाचा वापर केला जातो. याशिवाय गुजरातमध्ये मोधवानिक समाजही मोठ्या प्रमाणात राहतो. हा समाज मोधेश्वरी देवीची पूजा करतो. या देवीचे मंदिर मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा सूर्य मंदिराजवळ आहे. गुजरातमध्ये साधारण १० लाख मोधवानिक समजाचे लोक राहतात.

मोदी हे आडनाव हरियाणातील अग्रवाल समाजातील मारवाडी लोकांमध्येही मोठ्या प्रमाणात वापरले जाते. हा समाज पूर्वी हिसारमध्ये वास्तव्यास होता. मात्र, कालांतराने ते हरियाणातील महेंद्रगड आणि राजस्थानमधील झुंझुनू आणि सीकर या जिल्ह्यांमध्येही स्थायिक झाले.

आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांचे आजोबा, राय बहादूर गुजर मल मोदी हे महेंद्रगडमधून मेरठजवळील एका गावात स्थायिक झाले. पुढे या गावाचे नाव मोदीनगर असे ठेवण्यात आले. हिरे व्यापारी नीरव मोदी हे गुजरातच्या जामनगर येथील असून, ते परंपरागतपणे हिऱ्यांच्या व्यापारात असलेल्या समाजातून येतात, तर टाटा स्टीलचे माजी अध्यक्ष रुसी मोदी आणि अभिनेते सोहराब मोदी पारसी आहेत.

हेही वाचा – युक्रेनच्या लष्करप्रमुखांनी राजीनामा का दिला? अध्यक्षांबरोबर मतभेदांचा परिणाम? की युद्ध रेंगाळल्याचा फटका?

विशेष म्हणजे गेल्यावर्षी राहुल गांधी यांच्या विधानामुळे मोदी हे आडनाव प्रचंड चर्चेत होते. त्यासाठी राहुल गांधी यांना मानहानीच्या आरोपाखाली दोन वर्षांची शिक्षादेखील सुनावण्यात आली होती. नीरव मोदी आणि ललित मोदींचा उल्लेख करत सर्व चोरांचे आडनाव मोदीच का? असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला होता. यामुळे गुजरातचे भाजपा आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. “राहुल गांधी यांनी मोदी आडनाव असलेल्या १३ कोटी लोकांना चोर म्हणत त्यांचा अपमान केल्याचा आरोप पूर्णेश मोदी यांनी केला होता.”