शेरॉन राज हत्या प्रकरण केरळच्या अलीकडील इतिहासातील सर्वांत धक्कादायक आणि उच्च-प्रोफाइल खटल्यांपैकी एक होते. या प्रकरणात केरळच्या तिरुवनंतपुरमच्या जिल्हा न्यायालयाने ग्रीष्मा एसएसला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. २४ वर्षीय महिलेला तिचा २३ वर्षीय प्रियकर शेरॉन राज याची त्याच्या आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष मिसळून हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. न्यायालयाने गेल्या आठवड्यात निर्णय दिला की, तिच्या गुन्ह्याची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे ग्रीष्मा केरळच्या इतिहासात फाशीची शिक्षा भोगणारी सर्वांत तरुण महिला ठरली आहे. पण ग्रीष्मा एसएस कोण आहे? तिने असे घृणास्पद कृत्य कोणत्या कारणामुळे केले? न्यायालयाने काय निर्णय दिला? त्याविषयी जाणून घेऊ.

नेमके प्रकरण काय?

ही घटना १४ ऑक्टोबर २०२२ ची आहे, जेव्हा शेरॉन त्याची प्रेयसी ग्रीष्मा हिला तिच्या घरी भेटायला गेला होता. फिर्यादीनुसार, कन्याकुमारीची रहिवासी असलेली ग्रीष्मा आणि तिरुवनंतपुरममधील परसाला येथील रहिवासी असलेला शेरॉन यांचे २०२१ पासून प्रेमसंबंध होते. त्यावेळी ती इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी घेत होती; तर शेरॉन बी.एस्सी. रेडिओलॉजीच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. मार्च २०२२ मध्ये ग्रीष्माच्या कुटुंबाने तिचे लग्न तमिळनाडूमधील लष्करी अधिकाऱ्याशी ठरवले; मात्र तिने शेरॉनबरोबरचे नाते सुरू ठेवण्यास सहमती दर्शवली. लग्नाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली, तसतशी ग्रीष्माची चिंता वाढत गेली की, शेरॉन त्यांचे नाते तिच्या होणाऱ्या नवऱ्याला सांगेल. परिणामांच्या भीतीने तिने तिचे काका निर्मलकुमारन नायर यांच्याबरोबर शेरॉनची हत्या करण्याचा कट रचला.

Saif Ali Khan attacker hid in garden of actors building
सैफवर हल्ला केल्यावर दोन तास त्याच इमारतीत होता आरोपी, पोलिसांनी दिली माहिती; म्हणाले, “त्याने त्याच्या भावाला…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
mba jobs difficult loksatta news
विश्लेषण : एमबीएधारकांना नोकऱ्या मिळणे अवघड का? हार्वर्डच्या पदवीनंतरही उत्तम नोकरीची हमी नाही?
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं; दोघांच्या कुटुंबियांनी दिली मान्यता
Donald Trump Oath Ceremony Updates in Marathi| Donald Trump taking the presidential oath 2025
Donald Trump Oath Ceremony: आता अमेरिकेत तृतीयपंथींना मान्यता नाही, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; सर्व अर्जांवर फक्त स्त्री व पुरुष एवढेच पर्याय!
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा : महाकुंभ मेळ्यातील आयआयटी बाबा अभय सिंहची जुना आखाड्यातून हकालपट्टी; कारण काय?

शेरॉनला मारण्याचे अनेक प्रयत्न

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, ग्रीष्माने कथितरीत्या वेदनाशामक औषधांच्या परिणामांबाबत ऑनलाइन संशोधन केले आणि शेरॉनला विष देण्याचे अनेक प्रयत्न केले. तपासकर्त्यांनी उघड केले की, तिने त्याच्या पाण्यात आणि फळांच्या ज्यूसमध्ये अनेकदा विषारी औषध मिसळले; परंतु हे प्रयत्न इच्छित परिणाम मिळविण्यात अयशस्वी ठरले. यशस्वी होण्याच्या निर्धाराने ग्रीष्माने अनेक प्रयत्न केले; मात्र तरीही शेरॉन वाचत आला. अयशस्वी प्रयत्नांमुळे निराश झालेल्या ग्रीष्माने तीव्र पदार्थ वापरण्याचा निर्णय घेतला.

१४ ऑक्टोबर २०२२ रोजी तिच्या नियोजित लग्नाच्या सुमारे एक महिना आधी ग्रीष्माने शेरॉनला तिच्या घरी बोलावले आणि त्याला एक औषधी आयुर्वेदिक पेय दिले. तिने दिलेल्या मिश्रणात विष मिसळल्याची माहिती शेरॉनला नव्हती. आयुर्वेदिक पेये नैसर्गिकरीत्या कडू असल्याने, शेरॉनला त्यात काही असामान्य घटक आहे हे लक्षात आले नाही. परंतु, ग्रीष्माच्या घरून निघाल्यानंतर लगेचच त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि त्या रात्री त्याला तीव्र उलट्या झाल्या. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु दुसऱ्या दिवशी त्याची प्रकृती अधिकच बिघडली.

तिरुवनंतपुरमच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना ११ दिवसांनंतर शेरॉनचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूपूर्वी शेरॉनने एका मित्राला सांगितले की, ग्रीष्माने त्याची फसवणूक केली आहे आणि तिने त्याला विष दिल्याचा संशय आहे. त्याच्या मृत्यूनंतर शेरॉनच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी ग्रीष्माला अटक करण्यात आली. तिच्या आई आणि काकांनाही गुन्ह्याला प्रोत्साहन आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले. कलम ३६४ (हत्येच्या उद्देशाने अपहरण), कलम ३२८ (विष देऊन दुखापत करणे), कलम ३०२ (हत्या), कलम २०१ (पुरावा मिटवणे), कलम २०३ (खोटी माहिती देणे) व कलम ३४ (गुन्हेगारी कृत्ये) यांसह अनेक कलमांखाली तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तिला जवळपास वर्षभरानंतर म्हणजे सप्टेंबर २०२३ मध्ये जामीन मिळाला होता.

न्यायालयाने काय निर्णय दिला?

नेयट्टिनकारा अतिरिक्त सत्र न्यायालयाने ग्रीष्माला खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवले आणि तिचे वय लक्षात घेता, तिच्या गुन्ह्याची तीव्रता जास्त असल्याचे न्यायालयाने म्हटले. खटल्यादरम्यान बचाव पक्षाने दया दाखविण्याची मागणी केली होती आणि असा युक्तिवाद केला होता की, ग्रीष्मा एक उत्तम शैक्षणिक रेकॉर्ड असलेली तरुणी आहे आणि ती सुधारणेच्या संधीस पात्र आहे. त्यांनी दावा केला की, तिने आधीच बदलाची चिन्हे दर्शविली आहेत. परंतु, ग्रीष्माने भावनिक फसवणूक करीत, शेरॉनचा विश्वासघात केला असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

“लैंगिक जवळीकीच्या बहाण्याने शेरॉनला बोलावून घेणे आणि त्यानंतर गुन्हा करणे या कृतीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. गुन्हेगारी कृत्यांसाठी शिक्षा सुनिश्चित करणे ही शासनाची जबाबदारी आहे,” असे न्यायालयाने म्हटले आहे. “ग्रीष्माने त्याला रेकॉर्ड न करण्यास सांगूनही शेरॉनने संशयास्पद ज्यूसचा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यासारखे पुरावे हे सूचित करतात की, त्याला काहीतरी चुकीचे असल्याचा संशय होता. शेरॉनने पाण्याचा एक थेंबही न घेता, ११ दिवस आपल्या आयुष्यासाठी लढा दिला,” असे न्यायालयाने आपल्या निर्णयात नमूद केले.

हेही वाचा : बांगलादेशच्या संविधानातून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द हटणार? नेमका हा वाद काय?

त्यानंतर न्यायालयाने पुराव्याअभावी शेरॉनने मानसिक दबाव आणि शारीरिक शोषण केल्याचा ग्रीष्माचा दावा फेटाळून लावला. “तिच्या आरोपांचे समर्थन करण्यासाठी तिच्याकडे कोणताही पुरावा नाही. याउलट शेरॉनने कधीही तिच्यावर आरोप केले नाहीत. शेरॉन तिच्याशी कायम एकनिष्ठ राहिला; तर ग्रीष्माने तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी संपर्क कायम ठेवला,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाने हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मीळ उदाहरण मानले आणि तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. तिचे काका निर्मल कुमार याला साथीदार म्हणून मदत केल्याबद्दल आणि पुरावे नष्ट केल्याबद्दल तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तिच्या आईची मात्र पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू झालेल्या खटल्यात अंतिम निकाल देण्यापूर्वी ९५ हून अधिक साक्षीदारांची तपासणी करण्यात आली होती.

Story img Loader