लंडनचे महापौर सादिक खान यांची शनिवारी (४ मे रोजी) या पदावर पुन्हा निवड करण्यात आली आहे, ज्यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत लेबर पार्टीकडून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. २०१६ मध्ये पाकिस्तानी वंशाच्या नेत्याने एवढ्या मोठ्या पाश्चात्य राजधानीत निवडून येऊन पहिले मुस्लिम महापौर झाल्यानंतर इतिहास घडवला होता. विशेष म्हणजे त्यावेळी एकूण मतांपैकी ५७ टक्के मते मिळवल्याने तो ब्रिटिश राजकारणाच्या इतिहासातील सर्वात मोठा वैयक्तिक जनादेश होता. त्यांच्या अलीकडील विजयामुळे ५३ वर्षीय सादिक खान यांनी लंडनचे सर्वात जास्त काळ महापौर राहण्याची कामगिरी केली आहे. त्यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या प्रतिस्पर्धी सुसान हॉलवर आघाडी मिळवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे ते पुन्हा निवडून आल्याने निरीक्षकांना आश्चर्य वाटले नाही, परंतु लेबर पार्टीसाठी हा एक महत्त्वाचा विजय आहे. युनायटेड किंगडममध्ये जानेवारी २०२५ नंतर सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत आणि लेबर पार्टी २०१० नंतर प्रथमच राष्ट्रीय स्तरावर पुन्हा सत्ता मिळवू पाहत आहे. सादिक खान यांची लोकप्रियता लंडनवासीयांमध्ये कशी टिकून आहे हे जाणून घेऊ यात.

मानवी हक्क वकील म्हणून कामगिरीला सुरुवात

खान यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारांमध्ये अनेकदा नम्र वक्तृत्वाने मतदारांना साद घालतात. त्यांचा जन्म लंडनमध्ये पाकिस्तानी स्थलांतरित झालेल्या कुटुंबामध्ये झाला आहे. असोसिएटेड प्रेस प्रोफाइलनुसार त्यांचे वडील बस ड्रायव्हर म्हणून काम करतात आणि आई शिवणकाम करीत होती. न्यू स्टेट्समनला २०१६ रोजी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी एक आठवणही सांगितली. “माझे आई आणि वडील त्यांच्या नातेवाईकांना पाकिस्तानात पैसे पाठवायचे. माझी आई अजूनही ते काम करते. सात भावंडांसह तीन बेडरूमच्या सार्वजनिक गृहनिर्माण अपार्टमेंटमध्ये त्यांचे बालपण गेले. ते आणि त्यांचे कुटुंब वाढत्या वांशिक अत्याचाराचे बळी ठरले होते. त्यांनी शालेय शिक्षण राज्य शाळांमध्ये पूर्ण केले आणि नंतर उत्तर लंडन विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतले. १९९४ मध्ये त्यांनी मानवाधिकार वकील म्हणून सराव करण्यास सुरुवात केली आणि नंतर सादिया अहमद यांच्याशी विवाह केला, ज्या एक वकील देखील होत्या.

राजकीय कारकीर्द कशी सुरू झाली

२००५ पर्यंत खान यांनी संसद सदस्य म्हणून त्यांची पहिली निवडणूक जिंकली होती. त्यांनी आपला कायदेशीर पेशा सोडला, कारण त्यांना वाटले की, राजकारणात काम करून लोकांच्या जीवनात मोठा फरक पडू शकतो. खरं तर त्यांना लहानपणापासूनच राजकारणाची आवड होती. ते १५ व्या वर्षी लेबर पार्टीत सामील झाले.

खान यांनी दक्षिण लंडनमधील टूटिंग मतदारसंघाचे खासदार म्हणून ११ वर्षे काम केले. परिवहन मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये सहभागी होणारे ते पहिले मुस्लिम ठरले. सुरुवातीला महापौरपदाच्या लढतीसाठी अधिक ज्येष्ठ नेत्याची निवड करावी, असे पक्षांतर्गत मानले जात होते. खान यांच्याकडे सरप्राईज नेते म्हणून पाहिले जात होते. प्रचार करताना त्यांच्या प्रमुख धोरणांपैकी बस आणि मेट्रो प्रवासाचे भाडे गोठवणे आणि कामगार वर्गातील लोकांसाठी भाडे कमी करणे हे होते. त्यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या विरोधकांनी अशा उपाययोजनांच्या खर्चावर टीका केली. परंतु शेवटी त्यांचाच विजय झाला.

ते पुन्हा कसे निवडून आले?

२०२१ च्या त्यांच्या पुनर्निवडणुकीत खान यांना ५५.२ टक्के मते मिळाली. राजधानीतील वाढत्या हिंसक गुन्ह्यांबरोबरच विशेषतः किशोरवयीन मुलांविरुद्धच्या घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना टीकेचा सामना त्यांना करावा लागला होता. त्यांच्या निवडणूक यशाचा एक भाग देशाच्या इतर भागांच्या तुलनेत लंडनच्या अधिक वांशिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण लोकसंख्येला देण्यात आला, ज्यांनी तोपर्यंत कंझर्व्हेटिव्हला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला होता.

यावेळी खान यांना ४३.८ टक्के मते मिळाली आहेत. गुन्ह्यांमध्ये वाढ ही मतदानादरम्यान एक महत्त्वाची समस्या होती. विशेष म्हणजे त्याचे रूपांतर खान यांच्या निवडणुकीतील नापसंतीमध्ये झाले नाही. आणखी एका प्रमुख धोरणाचा मतदारांवर फारसा प्रभाव पडला नाही. खान यांच्या विजयामुळे महापौरपदाच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या जातीय वादाला बाजूला सारण्यात आल्याचे पाहायला मिळते. खान यांनी प्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांवर शुल्क आकारण्याबरोबरच वायू प्रदूषणाच्या बाबतीत लंडनसमोरील आव्हानावर त्यांनी अनेकदा भर दिला आहे.

मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असलेल्या दोन मतदारसंघांतही खान यांनी चांगली कामगिरी केली. अलीकडील स्थानिक निवडणुकांमधील इतर काही लेबर पार्टीच्या नेत्यांच्या कामगिरीपेक्षा त्यांची कामगिरी उजवी होती, असे वृत्त द गार्डियनने दिले. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर लेबर पार्टीने गाझावरील इस्रायलच्या लष्करी हल्ल्याचा तात्काळ निषेध कसा केला नाही, याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. लेबर मुस्लिम नेटवर्कचे राष्ट्रीय अध्यक्ष अली मिलानी यांनी द गार्डियनला सांगितले की, “सादिक या ट्रेंडला बळ देत आहेत आणि त्यामागे एक कारण आहे. ते आता शस्त्र विक्रीच्या निलंबनाला पाठिंबा देत आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is the pakistani origin mayor of london sadiq khan vrd
Show comments