Pannun assassination plot US: अमेरिकेकडून भारत सरकारच्या एका गुप्तचर अधिकाऱ्यावर आरोप करण्यात आले आहेत. या अधिकाऱ्याचे नाव विकास यादव असे आहे. आरोपपत्रात विकास यादव याचा उल्लेख CC-1 असा करण्यात आला आहे. विकास यादव याच्यावर खलिस्तानी समर्थक गुरपतवंत सिंग पन्नून याला ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला होता आणि त्यानंतर वर्षभरानंतर पहिल्यांदाच गेल्या शुक्रवारी त्यांची ओळख जाहीर करण्यात आली. सध्या यादव याच्या विरुद्ध फेडरल अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. विकास यादव हा भारतात आहे, परंतु भारत सरकारचा कर्मचारी नाही. गेल्या वर्षी निखिल ‘निक’ गुप्ता याला अटक केल्यानंतर विकास यादव (CC-1) याच्या विरोधातील आरोप १५ पानांच्या आरोपपत्राद्वारे सार्वजनिक अर्थात सर्वांना माहीत झाले. गुप्ता याच्यावरही पन्नून याच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप आहे आणि सध्या तो अमेरिकेत तुरुंगात आहे.

शुक्रवारी न्यूयॉर्कच्या सदर्न डिस्ट्रिक्टमधील यूएस अॅटर्नी कार्यालयाच्या निवेदनात भारतीय सरकारी कर्मचारी ‘विकाश यादव’ उर्फ ‘विकास’ उर्फ ‘अमानत’ याच्या विरोधात ‘मर्डर-फॉर-हायर’ आणि ‘पैशांच्या अफरातफरी’च्या आरोपांची नोंद झाली आहे. यादव याने न्यूयॉर्कमधील एका अमेरिकी नागरिकाच्या हत्येच्या कटात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे आरोपपत्रात नमूद आहे.

dominican republic citizenship
पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख!
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
Canada police allegations
India-Canada Row: कॅनडाचा जळफळाट, लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेत भारतावर केले धक्कादायक आरोप
narendra modi justin trudeau lawrence bishnoi 1
बिश्नोई टोळीमुळे भारत-कॅनडा वाद चिघळला, परराष्ट्र मंत्रालयाचे ट्रुडो सरकारवर मोठे आरोप; नेमकं प्रकरण काय?
CJI Dhananjay Chandrachud
“अयोध्येचा निकाल देण्यापूर्वी देवासमोर बसलो अन्…”, सरन्यायाधीश चंद्रचूडांनी सांगितला ‘तो’ किस्सा
disciplined party bjp is on the verge of indiscipline
BJP Candidates List : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी समोर; ९९ जागांसाठी जाहीर केले उमेदवार, कुणाला संधी?
Christopher Columbus
Christopher Columbus: ख्रिस्तोफर कोलंबस हे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व; इतिहास नेमका काय सांगतो?
baba siddique firing
Who killed Baba Siddique: बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे ‘या’ गँगचा हात; आरोपींनी दिली धक्कादायक माहिती

या प्रकरणातील प्रमुख पात्रे

गेल्या नोव्हेंबरमध्ये दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात पाच व्यक्तींचा उल्लेख करण्यात आला आहे.

CC-1: हा एक भारतीय गुप्तचर अधिकारी आहे. जो भारतात राहतो आणि त्याने भारतातूनच हत्येचा कट रचला होता. त्याची ओळख आता विकाश/ विकास यादव म्हणून करण्यात आली आहे. तो भारताच्या परराष्ट्र गुप्तचर संस्थेचा म्हणजेच R&AW (Research and Analysis Wing) चा एजंट असल्याचा आरोप आहे. त्याआधी तो भारतातील सर्वात मोठी निमलष्करी सेना, केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये (CRPF) कार्यरत होता. FBI ने यादवचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. यादव याचा जन्म ११ डिसेंबर १९८४ रोजी प्रनपूरा, हरियाणात झाला आणि यादवने भारतातूनच या कटाचे नियोजन केले असे FBI ने म्हटले आहे.

निक गुप्ता: हा ५२ वर्षीय भारतीय नागरिक आहे, ज्याला यादव/ CC-1 ने पन्नून याला अमेरिकेत ठार मारण्याच्या कटात सहभागी होण्यासाठी नियुक्त केले होते. निक गुप्तावर आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्रे आणि मादक पदार्थांच्या तस्करीत सहभागी असल्याचा आरोप आहे. तो देखील भारतातच होता. गेल्या वर्षी झेक प्राधिकाऱ्यांनी त्याला अटक केली आणि त्यानंतर त्याला अमेरिकेकडे सुपूर्त करण्यात आले.

अधिक वाचा: Vikash Yadav: पन्नूनच्या हत्येच्या कटात भारत सरकारच्या कर्मचाऱ्याचा सहभाग- अमेरिकेचा आरोप; दिल्लीत यादवला अटक का करण्यात आली होती?

CS (गुप्त संपर्क): निक गुप्ताने न्यूयॉर्क सिटीमध्ये हिटमॅन नेमण्यासाठी मदत करण्यासाठी संपर्क साधला होता. परंतु, ही व्यक्ती प्रत्यक्षात अमेरिकन कायदा अंमलबजावणी संस्थांबरोबर काम करणारी एक गोपनीय स्रोत होती.

UC (अंडरकव्हर एजंट): या व्यक्तीची ओळख CS ने गुप्ता याला हिटमॅन म्हणून ओळख करून दिली होती. परंतु, UC हा प्रत्यक्षात एक अमेरिकी कायदा अंमलबजावणी संस्थेचा अंडरकव्हर अधिकारी होता.

गुन्हा जिच्याबाबत घडणार होता, ती व्यक्ती (The Victim): आरोपपत्रात पन्नूनचे नाव स्पष्टपणे उल्लेखलेले नाही, तरी दिलेल्या तपशीलांमुळे त्याच्याबद्दल शंका राहात नाही. बळीचे वर्णन ‘एक वकील आणि राजकीय कार्यकर्ता’, ‘न्यूयॉर्कमध्ये राहणारा एक अमेरिकी नागरिक’ आणि ‘भारतीय सरकारचा तीव्र टीकाकार, जो पंजाबच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार करणाऱ्या एका अमेरिकास्थित संघटनेचे नेतृत्व करतो’ असे केले आहे. तसेच, ‘ज्याच्या संदर्भात गुन्हा घडणार होता ती व्यक्ती (व्हिक्टीम) आणि त्याच्या फुटीरवादी संघटनेवर भारतीय सरकारने बंदी घातली’ असेही आरोपपत्रात म्हटले आहे.

घटनांची क्रमवारी

विकाश यादव, ज्याचा आरोप पत्रात CC-1 म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. याच्याविरुद्ध गेल्या वर्षीच्या आरोपपत्रात नोंद करण्यात आली आहे.

१ मे २०२३ च्या सुरुवातीस:

एनक्रिप्टेड अ‍ॅप्लिकेशन्सद्वारे संवाद साधताना, CC-1 (विकाश यादव) याने गुप्ता याला व्हिक्टीमचा (पन्नू) खून घडवून आणण्याची व्यवस्था करण्याचे सांगितले. त्याबदल्यात, गुप्ताविरुद्ध भारतात असलेल्या गुन्हेगारी प्रकरणाचे खटले रद्द करण्यात CC-1 मदत करेल, असे आश्वासन दिले.

६ मे:
CC-1 (विकाश यादव) गुप्ताला संदेश पाठवतो की, त्याच्याकडे न्यूयॉर्कमध्ये एक टार्गेट आहे आणि दुसरे एक कॅलिफोर्नियात आहे. गुप्ता उत्तर देतो: ‘आम्ही सर्व टार्गेट्सना ठार करू.’

१२ मे:
CC-1 (विकाश यादव) गुप्ताला संदेश पाठवतो की, त्याच्याविरोधातील सगळ्या प्रकरणांचा आधीच सोक्षमोक्ष लावण्यात आलेला आहे. गुजरात पोलिसांकडून यापुढे कोणताही कॉल त्याला येणार नाही.

२३ मे:
CC-1 पुन्हा एकदा गुप्ताला खात्री देतो की, तो गुप्ताच्या गुजरात [प्रकरणाविषयी] बॉसशी बोलला आहे, आणि सर्व काही ठीक आहे आणि आता त्याला कोणी त्रास देणार नाही. याशिवाय, CC-1 गुप्तासाठी एका उपायुक्ताबरोबर (DCP) बैठक आयोजित करण्याची ऑफरदेखील देतो.

अधिक वाचा: Diabetes ‘Smart’ Insulin:मधुमेहाच्या रुग्णांसाठी आता ‘स्मार्ट’ इन्सुलिन; काय सांगते नवीन संशोधन?

२९ मे:
CC-1 (विकाश यादव) कडून मिळालेल्या आश्वासनांनंतर, गुप्ता खुनाच्या कटाची योजना कार्यान्वित करतो. तो CS ला फोन करून विचारतो की, ‘अमेरिकेत खून करण्यासाठी कुणी उपलब्ध असेल का?’… गुप्ता सांगतो की, ‘व्हिक्टिम’ हा न्यूयॉर्क शहर आणि अमेरिकेतील दुसऱ्या शहरामध्ये राहणारा वकील आहे आणि त्याच्याबद्दलचे तपशील तो CS ला देतो.

याला प्रतिसाद म्हणून, CS गुप्ताकडे ‘व्हिक्टिम’विषयी अधिक माहिती आणि खुनासाठी पैशांची व्यवस्था कशी असेल याबद्दल माहिती मागतो. गुप्ता या मजकूरांचे स्क्रीनशॉट CC-1 ला पाठवतो, ज्यावर CC-1 प्रतिसाद देतो: “आम्ही १५०,००० डॉलर्स द्यायला तयार आहोत … कामाच्या गुणवत्तेनुसार रक्कम आणखी वाढवली जाईल … आणि हे लवकरात लवकर झाले पाहिजे.”

CS खुनासाठी १००,००० डॉलर्स मागतो.

१ जून :
CC-1 (विकाश यादव) गुप्ताला न्यूयॉर्क सिटीमधील ‘व्हिक्टिम’च्या घराचा पत्ता पाठवतो आणि त्या परिसराचे वर्णन “‘व्हिक्टिम’च्या घराचा परिसर” म्हणून करतो.

२ जून:
CC-1 गुप्ताला सांगतो की “[हे] महत्त्वाचे आहे आणि [वेळ कमी आहे].” यावर गुप्ता त्याला उत्तर देतो की त्याला एका दिवसाचा कालावधी द्यावा, मग तो कळवेल.

३ जून:
गुप्ताचे CS बरोबर ऑडिओ कॉलवर बोलणे होते आणि CS ला आग्रह करतो की, लवकरच खून करावा असे त्याचे सहकारी सांगत आहे. त्याला संपव, भाऊ, त्याला संपव, खूप वेळ घेऊ नकोस … या माणसांना पुढे ढकल, या माणसांना पुढे ढकल … काम संपव.
यानंतर, गुप्ता CC-1 ला मेसेज करतो की, त्याचे न्यूयॉर्कच्या ग्रुपबरोबर बोलणे झाले आहे आणि त्यांना सांगितले की “त्यांनी [व्हिक्टीमला] शक्य तितक्या लवकर संपवायला हवे.”

४ जून:
CS गुप्ताला ‘व्हिक्टीम’चे एक कथित निरीक्षण छायाचित्र पाठवतो. या फोटोद्वारे सहकाऱ्यांनी ‘व्हिक्टीम’वर लक्ष ठेवल्याचा पुरावा दिला जातो. CS सांगतो की ‘व्हिक्टीम’ला ठार मारले जाईल, परंतु त्यासाठी २५,००० डॉलर्स आगाऊ रकमेची गरज आहे.

५ जून:
गुप्ता हे फोटो आणि CS च्या संदेशांचे स्क्रीनशॉट CC-1 कडे पाठवतो. गुप्ता CC-1 ला विचारतो की, आपल्या न्यूयॉर्कमधील डीलरला विचारा तो २५,००० डॉलर्सची व्यवस्था करू शकतो का?

६ जून:
गुप्ता CS ला स्पष्टपणे सांगतो की, त्या महिन्याच्या शेवटी अमेरिकन आणि भारतीय उच्च-स्तरीय सरकारी अधिकाऱ्यांमधील अपेक्षित बैठकीदरम्यान खून करू नये. गुप्ता स्पष्ट करतो की, ‘व्हिक्टीम’च्या मृत्यूनंतर आंदोलनं होऊ शकतात. त्यामुळे राजकीय तणाव निर्माण होऊ शकतो. तसेच गुप्ता CS ला विचारतो की, त्याला थेट न्यूयॉर्कमधील त्या सहकाऱ्यांशी जोडावे, जे आगाऊ पैसे घेतील आणि खून करतील. याला उत्तर म्हणून, CS गुप्ताचा परिचय इलेक्ट्रॉनिक संदेशांद्वारे UC (अंडरकव्हर अधिकारी) बरोबर करून देतो. गुप्ता CS बरोबरच्या संदेशांचे स्क्रीनशॉट CC-1 ला पाठवतो, ज्यामध्ये आगाऊ रकमेची चर्चा आणि UC चा परिचय आहे. CC-1 उत्तर देतो, “ओके भाईजी.”

७ जून:
गुप्ता CC-1 ला मेसेज करतो की, त्याच्या सहकाऱ्याकडे न्यूयॉर्कमध्ये आगाऊ पेमेंट देण्यासाठी पैसे उपलब्ध नाहीत आणि CC-1 ला आपल्या संपर्काकडे तपासण्याचे सांगतो.

९ जून:
CC-1 गुप्ताला संदेश पाठवतो की “आज सकारात्मकरीत्या पेमेंट केले जाईल” आणि ‘व्हिक्टीम’चा खून “या आठवड्याच्या शेवटी करूया” असे सांगतो.

CC-1 च्या संदेशाच्या दोन तासानंतर, गुप्ता UC ला कॉल करून सांगतो की, न्यूयॉर्कमध्ये एक व्यक्ती त्याला पार्सल (आगाऊ पेमेंटच्या १५,००० डॉलर्सचा संदर्भ) देण्यासाठी येईल. ही व्यक्ती मॅनहॅटनमध्ये UC ला भेटते आणि व्यवहार UC च्या कारमध्ये होतो.

११ जून :
गुप्ताकडून ‘व्हिक्टीम’चे आणखी कथित छायाचित्रे प्राप्त झाल्यानंतर, CC-1 गुप्ताला सांगतो: हे आशादायक दिसते … पण आजचाच दिवस आहे … जर आज नाही झाले तर ते २४ तारखेनंतर होईल,” म्हणजेच २१ ते २३ जून दरम्यान भारतीय पंतप्रधानांच्या वॉशिंग्टन डीसीच्या उच्च-स्तरीय भेटीनंतर होईल.

१२ जून:
गुप्ता UC ला व्हिडिओ कॉल करतो आणि त्याच्याबरोबर असलेल्या तिघा पुरुषांना कॅमेराच्या समोर आणतो. गुप्ता म्हणतो, आम्ही सर्वजण तुमच्यावर अवलंबून आहोत.

त्याच दिवशी, CS बरोबरच्या कॉलमध्ये, गुप्ता सांगतो की, कॅनडामध्ये एक मोठे टार्गेट आहे.

१४ जून:
गुप्ता CS ला संदेश पाठवतो की “आम्हाला कॅनडामध्ये एक चांगली टीम हवी आहे.”

१८ जून:
बुरखा घातलेल्या बंदुकधाऱ्यांनी कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियामधील एका गुरुद्वाराबाहेर ‘व्हिक्टीम’चा सहकारी आणि खलिस्तानी फुटीरवादी हरदीप सिंग निज्जर यांची हत्या केली.

CC-1 गुप्ताला निज्जरच्या रक्ताळलेल्या शरीराची व्हिडिओ क्लिप पाठवतो, ज्यामध्ये त्याचे शरीर गाडीत बसलेल्या अवस्थेत दिसते. गुप्ता हा व्हिडिओ CS आणि UC या दोघांनाही पाठवतो. सुमारे एका तासानंतर, CC-1 गुप्ताला न्यूयॉर्क सिटीमधील ‘व्हिक्टीम’च्या राहत्या घराचा पत्ता पाठवतो.

अधिक वाचा: Bigg Boss 18: गाढव पाळणे हा भारतात गुन्हा आहे का?

१९ जून:

गुप्ता UC बरोबर ऑडिओ कॉलवर बोलताना सांगतो की निज्जर “हा देखील टार्गेट होता” आणि “आमच्याकडे खूप टार्गेट्स आहेत.”
तो CS बरोबरही बोलतो आणि त्याला कन्फर्म करतो की निज्जरच तो कॅनडातील “जॉब” होता, ज्याचा तो पूर्वी उल्लेख करीत होता. तो म्हणतो, “आम्ही UC ला हे काम दिले नाही, त्यामुळे कॅनडामध्ये हे काम दुसऱ्या माणसाने केले.” गुप्ता आपल्या आधीच्या योजनेत बदल करून CS ला खून लवकर करण्याचे सांगतो, भारतीय पंतप्रधानांच्या दौऱ्याचा विचार न करता. “आम्हाला कोणत्याही वेळी, अगदी आज किंवा उद्या काम करण्याची परवानगी मिळाली आहे. [UC] ला हे काम लवकरात लवकर संपवावे लागेल, भाऊ,” तो म्हणतो. गुप्ता CS ला इशारा देतो की ‘व्हिक्टीम’ आता अधिक सावध होण्याची शक्यता आहे, कारण त्याचा “सहकारी संपला आहे. जर तो एकटा नसेल… सगळ्यांना संपव.”

२० जून:
CC-1 गुप्ताला ‘व्हिक्टीम’वर असलेल्या एका वृत्तपत्रातील लेखाचा संदर्भ देतो आणि मेसेज करतो, “आता हे प्राधान्य आहे.”
गुप्ता CS ला कॉल करून सांगतो, “२९ जूनपर्यंत चार कामे पूर्ण करायची आहेत,”म्हणजे व्हिक्टीम आणि त्यानंतर “कॅनडामध्ये आणखी तीन.”

२२ जून:
CC-1 गुप्ताला मेसेज करतो की ‘व्हिक्टीम’ घरात नाही. गुप्ता लगेचच UC ला कॉल करण्याचा प्रयत्न करतो. कॉलला उत्तर न मिळाल्यामुळे, तो UC ला मेसेज करतो की, “आमच्या माहितीनुसार [व्हिक्टीम] घरात नाही … [घरात प्रवेश करण्यापूर्वी] त्याच्या उपस्थितीची खात्री करा.”

२५ जून:
UC गुप्ताला बळीच्या घराच्या आणि परिसराच्या आसपासचे GPS कोऑर्डिनेट असलेले फोटो पाठवतो. गुप्ता हे फोटो CC-1 ला फॉरवर्ड करतो.

२६ जून:
CC-1 उत्तर देतो, “उत्तम … येणाऱ्या २४ तासांत सर्व काही निर्णायक ठरेल, व्हिक्टीम घरात किंवा कार्यालयात नक्कीच असेल.” गुप्ता ही माहिती UC कडे पाठवतो, त्याला सांगतो की, “त्याच्या घरावर, कार्यालयावर आणि कॅफेवर लक्ष ठेवा, जिथे तो जात असे.”

२९ जून:
गुप्ता UC ला मेसेज करतो की, “आमच्याकडे माहिती आहे की [व्हिक्टीम] … घरी परत आला आहे, आणिआज तो बाहेर नक्कीच येईल.” गुप्ता UC ला खून करण्याचे निर्देश देतो, हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.”

३० जून:
गुप्ता भारतातून झेक प्रजासत्ताकात प्रवास करतो, त्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्याच्या आगमनानंतर, गुप्ताला झेक कायदा अंमलबजावणी प्राधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या विनंतीवरून अटक केली, जे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय प्रत्यार्पण करारानुसार केले गेले.

१८ सप्टेंबर:
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो कॅनडाच्या संसदेच्या सभागृहात निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय सहभाग असल्याचा आरोप करतात. भारत हे आरोप फेटाळतो.

२९ नोव्हेंबर:

पन्नू प्रकरणातील पहिले आरोपपत्र उघडले जाते आणि हा अयशस्वी कट सर्वांसमोर येतो