Rediscovering Somnath Jyotirlinga: एका ऐतिहासिक घडामोडीत इस्लामी आक्रमक गझनीच्या मुहम्मदाने शतकांपूर्वी उद्ध्वस्त केलेल्या प्राचीन सोमनाथ ज्योतिर्लिंगाची पुन्हा प्राणप्रतिष्ठित केली जाणार आहे. कारण त्याचे भग्न अवशेष अलीकडेच सापडले आहेत. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर हे या ज्योतिर्लिंगाच्या भग्नावशेषांची प्रतिष्ठापना करणार आहेत. सोमनाथ ज्योतिर्लिंग उद्ध्वस्त झाल्यानंतर अग्निहोत्री ब्राह्मणांनी त्याचे तुकडे पिढ्यान्‌पिढ्या जतन केले होते. हे तुकडे अद्यापही अत्यंत चुंबकासारखी ऊर्जा प्रकट करतात, असे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले. अलीकडच्या पिढीत सीताराम शास्त्री यांनी २१ वर्षे सोमनाथ शिवलिंगाचे तुकडे जतन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या महिन्यात अग्निहोत्री पुजारी सीताराम शास्त्री यांनी श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली आणि २१ वर्षांपासून जतन केलेले सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे तुकडे त्यांना सुपूर्द केले. शास्त्री यांनी सांगितले की, त्यांच्या दोन पिढ्यांनी हे तुकडे जतन केले आहेत. त्यांच्या काकांनी हे तुकडे संपूर्ण आयुष्यभर जतन केले आणि नंतर त्यांच्याकडे सोपवले. “माझ्याकडे हे मूर्तस्वरूप तुकडे २१ वर्षांपूर्वी आले. त्यापूर्वी, माझ्या काकांनी ते जपले होते. त्यांनी मला हे तुकडे दिले आणि त्यातील किमान दोन तुकडे गुजरातमधील सोमनाथ मंदिरात स्थापना करण्याचे आदेश दिले. हीच खरी सोमनाथाची मूर्त प्रतिमा आहे. हे १००० वर्षांपासून अस्तित्वात आहेत… माझ्या काकांनी मला हे सोमनाथ मंदिरात स्थापनेसाठी दिले. त्यांना ते त्यांचे गुरु प्रवेंद्र सरस्वतीजी यांनी दिले होते. त्यानंतर, माझ्या काकांनी ६० वर्षे याची पूजा केली. ही मूर्ती माझ्याकडे, माझ्या काकांकडे आणि त्यांच्या गुरूंमार्फत गुरु-परंपरेतूनच आली आहे,”.

श्री श्री रविशंकर यांनी सांगितले की, शास्त्री यांच्या काकांनी हे शिवलिंगाचे तुकडे त्यांच्या गुरु प्रवेंद्र सरस्वतीजींकडून प्राप्त केले होते. प्रवेंद्र सरस्वती यांनी १०० वर्षांपूर्वी, १९२४ मध्ये, हे तुकडे कांची शंकराचार्यांकडे नेले होते. शंकराचार्यांनी त्यांना सांगितले होते की, शिवलिंग प्रतिष्ठापनेसाठी १०० वर्षे लागतील. त्यामुळे त्यांनी तोपर्यंत हे तुकडे जतन करण्याचे निर्देश दिले. प्रवेंद्र सरस्वती यांनी आयुष्यभर हे तुकडे जतन करून त्यांची पूजा केली आणि नंतर ते शास्त्री यांच्या काकांकडे सोपवले.

सोमनाथची लूट आणि शिवलिंगाचा विध्वंस

सोमनाथ ज्योतिर्लिंग हे साधारणतः तीन फूट उंचीचे होते आणि ते जमिनीपासून दोन फूट जमिनीवर होते, असे मानले जाते. “हजार वर्षांपूर्वी हे तीन फूट उंच शिवलिंग गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात दोन फूट हवेत तरंगत असे. आक्रमकांनी हे शिवलिंग उद्ध्वस्त करण्यासाठी अनेक हल्ले केले. मंदिराची लूटही झाली. गझनीच्या मोहम्मदाने सोमनाथ मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी जवळपास ५० हजार लोकांची हत्या केली. त्याने मंदिरातील सर्व मौल्यवान वस्तू लुटल्या आणि शिवलिंगाचा विध्वंस केला,” असे शास्त्री यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, शिवलिंगाचे तुटलेले तुकडे पुजार्‍यांनी गोळा केले आणि अनेक वर्षे त्यांची पूजा केली.

हजारो वर्षे संतांनी जपले शिवलिंगाचे तुकडे

“या घटनेनंतर अनेक संतांनी येऊन हे तुटलेले तुकडे गोळा केले, त्यातून विविध मूर्ती तयार केल्या आणि त्यांची उपासना सुरू केली. या तुकड्यांपासून तयार झालेल्या मूर्ती पुन्हा योग्य वेळी मंदिरात प्रतिष्ठापित करण्याचा निर्णय त्यांनी एकमताने घेतला,” असे ते म्हणाले. कांची शंकराचार्यांनी शास्त्रींना आश्वासन दिले होते की, राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेनंतर सोमनाथ शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली जाईल. शास्त्री यांनी सांगितले की, शिवलिंगाचे तुकडे घेऊन ते जगद्गुरु श्री जयेन्द्र सरस्वती शंकराचार्य स्वामीजींकडे गेले आणि त्यांचा सल्ला मागितला. शंकराचार्यांनी त्यांना अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेपर्यंत वाट पाहण्यास सांगितले. मात्र, राम मंदिराची प्रतिष्ठापना होण्यापूर्वीच शंकराचार्यांनी समाधी घेतली, त्यामुळे शिवलिंगाच्या तुकड्यांचे पुढे काय करावे, हे शास्त्रींना समजत नव्हते. राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेनंतर, शास्त्री यांनी शिवलिंगाचे तुकडे जगद्गुरु श्री शंकर विजयेन्द्र सरस्वती स्वामीजींकडे नेले, जे शंकराचार्य जयेन्द्र सरस्वती यांचे उत्तराधिकारी आहेत. त्यांनी शास्त्रींना हे तुकडे श्री श्री रविशंकर यांच्याकडे नेण्याचा सल्ला दिला.

“गुरु श्री श्री रविशंकर यांनी आश्वासन दिले की, हे शिवलिंग सोमनाथ मंदिरात स्थापन केले जाईल. मी आनंदी आहे. माझा जन्म यशस्वी ठरेल. सोमनाथ शिवलिंगाची सोमनाथ मंदिरात स्थापना होईल, ही आमची प्रतिज्ञा आहे,” असे शास्त्री सांगतात.

गझनीच्या मुहम्मदाने सोमनाथ मंदिर कसे उद्ध्वस्त केले?

गुजरातमधील सोमनाथ मंदिर १० व्या शतकात गझनवी वंशातील इस्लामी आक्रमक मुहम्मदाने उद्ध्वस्त केले. त्याने सोमनाथ ज्योतिर्लिंग फोडले आणि मंदिराचे रक्षण करणाऱ्या हजारो भक्तांची कत्तल केली. गझनीच्या मुहम्मदाने भारतावर एकूण १७ वेळा आक्रमण केले होते आणि कांग्रा, मथुरा आणि ज्वालामुखी येथील मंदिरेही उद्ध्वस्त केली. यामुळे तो कुप्रसिद्ध ‘मूर्तिभंजक’ म्हणून ओळखला जातो. गझनीच्या मुहम्मदाने १०२५ साली भारतावरील आपल्या १६ व्या आक्रमणादरम्यान सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त केले. त्याने सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे चार तुकडे केले,अशी नोंद इतिहासात आहे. आता हे तुकडे पुनर्स्थापित होतील तेव्हा सोमनाथाच्या इतिहासाचे एक वर्तुळ पूर्ण होईल.