अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. “राज्य सरकारचा हा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. या निर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे.” असे उपमुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. त्याच निमित्ताने त्यानिमित्ताने अहिल्यादेवी होळकर यांचे कार्यकर्तृत्त्व समजून घेणे महत्त्वाचे ठरावे.

सध्या भारताच्या राजकारणात काशी विश्वनाथ, ग्यानव्यापी मशीद, हिंदू -हिंदू मंदिरे, त्यांचा जीर्णोद्धार असे अनेक मुद्दे चर्चेत आहेत. भारतीय इतिहासात ज्या राज्यकर्त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यात अहिल्याबाई होळकरांचा समावेश प्रामुख्याने होतो.

cbi arrests rg kar ex principal and psi
कोलकाता बलात्कार प्रकरणी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्यासह पोलीस निरीक्षकाला अटक; पुराव्याशी छेडछाड केल्याचा आरोप
Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती,…
10 year imprisonment for murder of brother
सावत्र भावाची हत्या करणाऱ्यास सश्रम कारावास, उल्हासनगरमध्ये जमिनीच्या वादातून झाली होती हत्या
Thane Suicide youth, highly educated youth thane,
ठाणे : उच्च शिक्षित तरुणाची आत्महत्या
Apte Vachan Mandir passion for innovation Kolhapur news
आपटे वाचन मंदिराला नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास
Vasind police station, three employees Suspension,
वासिंद पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्याचे निलंबन, तरुणाच्या मृत्यूनंतर ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
Pune suicide, wife s affair, Pune Man Commits Suicide Lonikand police, abetment to suicide, complaint, investigation
पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे तरुणाची आत्महत्या, पत्नीसह प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
Sadashiv Sathe, Bhau Sathe, Chhatrapati Shivaji Maharaj, sculptures, standing statue of Chhatrapati Shivaji Maharaj with sword,
आरमार-द्रष्टे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उभ्या, तलवारी पुतळ्याचे खरे संकल्पक भाऊ साठेच!

कोण होत्या अहिल्यादेवी होळकर?

अहिल्यादेवी होळकर या भारतीय इतिहासातील प्रसिद्ध राज्यकर्त्या महिलांपैकी एक होत्या. माळव्याच्या मराठा साम्राज्यातील एक कर्तृत्त्ववान स्त्री म्हणून अहिल्यादेवींची ओळख आहे. त्यांचा जन्म १७२५ साली अहमदनगरच्या चौंडी या गावी झाला. ऐतिहासिक संदर्भानुसार अहिल्यादेवींचा विवाह मल्हारराव होळकर यांचा पुत्र खंडेराव यांच्याशी वयाच्या आठव्या वर्षी झाला. परंतु, कुंभेर येथील युद्धात खंडेराव यांचा मृत्यू झाल्याने अहिल्यादेवी यांना वयाच्या २९ व्या वर्षीच वैधव्य प्राप्त झाले. यानंतर अहिल्यादेवी यांनी आपल्या पतीसोबत सती जाण्याचा निर्णय घेतला. परंतु मल्हारराव होळकर यांनी त्यांना तसे करू दिले नाही आणि लवकरच १७६७ साली त्यांच्या हाती राज्यकारभाराची धुरा आली. अहिल्यादेवी यांनी जवळपास तीन दशके राज्यकारभार सांभाळला. १७६६ साली मल्हारराव होळकर यांचा मृत्यू झाला, अहिल्यादेवींनी आपल्या मुलाच्या जागी राज्य कारभार पहिला. त्यानंतर पेशवे माधवराव पहिले यांच्याकडे स्वतंत्र राज्यकारभारासाठी निवेदन केले. १९६७ साली त्याना स्वतंत्र शासक म्हणून मान्यता मिळाली होती.

आणखी वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक उल्लेख केलेल्या ऐतिहासिक चोल साम्राज्याचा इतिहास काय?

अहिल्यादेवी होळकर यांनी मोठ्या प्रमाणात मंदिरांची केली होती डागडुजी?

अहिल्याबाई या उत्तम प्रशासक होत्या आणि त्याचबरोबरीने त्यांची एक आगळी वेगळी ओळख होती; ती म्हणजे त्यांनी अनेक हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार प्रयत्नपूर्वक केला. त्यांनी केलेल्या अनेक मंदिर जिर्णोद्धारांपैकी गुजरातचे सोमनाथ व उत्तरेकडचे काशी विश्वनाथ ही महत्त्वाची मंदिरे मानली जातात. अहिल्यादेवी यांनी प्राथमिक स्तरावर शिव मंदिराचा जीर्णोद्धार केला. ११ व्या शतकात गझनीचा महमूद आणि १७ व्या शतकात औरंगजेबाने प्रभास पाटणचे सोमनाथ मंदिर आणि वाराणसीचे काशी विश्वनाथ मंदिर उद्ध्वस्त केले. ही मंदिरे शिव भक्तांसाठी अतिशय महत्त्वाची होती व आजही आहेत. १७८३ साली अहिल्यादेवी यांनी सोमनाथच्या शिव मंदिराचा जीर्णोद्धार केला. अहिल्याबाईंनी बांधलेले मंदिर आता ‘जुने सोमनाथ’ किंवा ‘अहिल्यादेवी मंदिर’ म्हणून ओळखले जाते आणि मुख्य सोमनाथ मंदिरापासून सुमारे २०० मीटर अंतरावर आहे.

भारतभर मंदिर उभारणी

अहिल्यादेवी यांनी श्रीनगर, हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश, प्रयाग, वाराणसी, नैमिषारण्य, पुरी, रामेश्वरम, सोमनाथ, नाशिक, ओंकारेश्वर, महाबळेश्वर, पुणे, इंदूर, श्रीशैलम, उडीपी, गोकर्ण, काठमांडू इत्यादी अनेक ठिकाणी मंदिरे बांधली. ब्रिटिश, अफगाण, नवाबांच्या ताब्यातील प्रदेश वगळता तत्कालीन भारतभर सर्वत्र काही नवी मंदिरे बांधली व जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. गंगा नदीला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन भारतीय कला व स्थापत्य तसेच पौराणिक साहित्यात गंगेला देवीचे स्थान देण्यात आले आहे. या नदीच्या पाण्याच्या केवळ स्पर्शाने पाप नष्ट होते, अशी पारंपरिक धारणा आहे. तिचे पाणी अत्यंत पवित्र मानले जाते. म्हणून गंगाजलाचा समावेश धार्मिक कार्यात आवर्जून करण्यात येतो. त्यामुळेच अहिल्यादेवी यांनी केरळ, कर्नाटक, तामिळनाडू यांसारख्या भागात असलेल्या मंदिरांमध्ये गंगाजल स्व-खर्चाने पोहचते केले, अशी नोंद ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये सापडते.

आणखी वाचा : विश्लेषण : गद्दार कोण? मानसिंग ते जयचंद भारतीय गद्दारांचा सापेक्ष इतिहास !

अहिल्यादेवींचा काशी विश्वनाथाच्या मंदिरात हातभार

अहिल्यादेवी यांनी अनेक मंदिरे, घाट, तीर्थक्षेत्रे, धर्मशाळा बांधल्या, परंतु त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी काशी विश्वेश्वर मंदिराचा केलेला जीर्णोद्धार विशेष मानला जातो. काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास हा प्राचीन आहे. स्थानिक कथांच्या संदर्भानुसार ज्या वेळी अहिल्यादेवी यांनी काशी विश्वनाथाच्या मंदिराची दुर्दशा पहिली त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला होता. मुघल-इस्लामिक आक्रमकांनी मूळ मंदिर पूर्णतः उध्वस्त केले होते. आधी गझनी आणि नंतर औरंगजेब या दोघांचाही हे मंदिर पाडण्यात सहभाग होता. १८ एप्रिल १६६९ रोजी औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडण्याचा आदेश दिला होता. त्याच्या या आदेशात, त्याने नमूद केल्याप्रमाणे ‘काशीचे मंदिर हे ते ठिकाण आहे जेथे मूर्ख पंडित रद्दी पुस्तकांमधून वाईट ज्ञान शिकवतात’. याच काळातच मुख्य काशी विश्वनाथाच्या मंदिराचे रूपांतर ग्यानवापी मशिदीत करण्यात आले, असा आरोप आहे. (सध्या ग्यानवापी मशिदीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे) सध्या उभे असलेले काशी विश्वनाथाचे मंदिर हे १७७६ साली अहिल्यादेवींनी बांधलेले आहे. अहिल्यादेवींनी बांधलेल्या मंदिरात विश्वेश्वर आणि दंडपाणी यांना समर्पित दुहेरी गर्भगृहांचा समावेश होता.

मूळ नष्ट झालेल्या मंदिराच्या पुनर्बांधणीचे स्वप्न अनेक मराठा राज्यकर्त्यांनी पहिले होते. परंतु, ते सत्यात आणण्याचे श्रेय अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे जाते. जेम्स प्रिन्सेप (इंग्लिश विद्वान आणि पुरातत्त्व अभ्यासक) यांनी नमूद केल्याप्रमाणे १८२० च्या दशकात अहिल्यादेवींनी बांधलेले मंदिर लोकप्रिय झाले. याचबरोबर अहिल्यादेवी होळकर यांनी इतर हिंदू तीर्थक्षेत्रांच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावली. यात ओडिशाचे जगन्नाथ मंदिर, गुजरात येथील द्वारका, उत्तरेकडील केदारनाथ पासून ते दक्षिणेच्या रामेश्वरापर्यंत अहिल्यादेवींनी मंदिरे व तीर्थक्षेत्रे यांच्या जीर्णोद्धारासाठी सिंहाचा वाटा उचलला होता. किंबहुना म्हणूनच सत्तेतील भाजपा सरकारने अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवी होळकर नगर असे करण्याचा निर्णय घेतला.