स्वीडनमध्ये वारंवार कुराण जाळण्यासाठी कुप्रसिद्ध असलेला इराकी नागरिक सलवान मोमिका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्टॉकहोम जिल्हा न्यायालयाने तो प्रतिवादी असलेल्या खटल्यातील गुरुवारचा निकाल पुढे ढकलला. स्वीडिश राज्य माध्यमांनी गुरुवारी वृत्त दिले की, सलवान मोमिका यांची बुधवारी रात्री सोडरताल्जे येथील होवस्जो येथील त्यांच्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. २०२३ मध्ये, ३८ वर्षीय सलवान मोमिकाने स्वीडनमध्ये अनेक कुराण जाळले आणि कुराणची विटंबना केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यांच्या या कृतींनी जगाचे लक्ष वेधून घेतले होते, त्यामुळे अनेक मुस्लीम राष्ट्रांमध्ये रोष निर्माण झाला होता. परिणामस्वरूपी दंगली आणि अशांतता निर्माण झाली होती. मोमिकाने न्यायालयात असा युक्तिवाद केला होता की, त्यांची निदर्शने मुस्लिमांविरोधात नसून इस्लाम धर्माविरुद्ध होती आणि मला कुराणातील संदेशांपासून स्वीडनच्या लोकांचे संरक्षण करायचे होते. स्वीडिश पोलिसांनी भाषण स्वातंत्र्याचा उल्लेख करत त्यांच्या निषेधास परवानगी दिली, परंतु तरीही त्यांच्यावर आरोप दाखल करण्यात आले. नेमके हे प्रकरण काय? कोण होते सलवान मोमिका? त्यांनी कुराण का जाळले? त्याविषयी जाणून घेऊ.

सलवान मोमिका आणि त्यांच्याबरोबर सहभागी असणाऱ्यांवर स्टॉकहोम न्यायालयात कुराण जाळण्यामुळे वांशिक द्वेषाला उत्तेजन देण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : अर्थसंकल्प ‘लीक’ होतो तेव्हा… इतिहासात असं कधी घडलं होतं?

कोण होते सलवान मोमिका?

सलवान मोमिका आणि त्यांच्याबरोबर सहभागी असणाऱ्यांवर स्टॉकहोम न्यायालयात कुराण जाळण्यामुळे वांशिक द्वेषाला उत्तेजन देण्याचा आरोप ठेवण्यात आला होता. गुरुवारी सकाळी निकाल अपेक्षित होता. स्वीडिश मायग्रेशन एजन्सीने २०२३ मध्ये मोमिकाला देशातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, इराकमध्ये त्यांच्याविरुद्धच्या धमक्यांमुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली नाही आणि त्यांना एप्रिल २०२४ पर्यंत वैध नवीन तात्पुरता निवास परवाना देण्यात आला. सलवान मोमिका, उत्तर इराकच्या निनवेह प्रांतातील काराकोशच्या अल-हमदानिया जिल्ह्यात अश्शूर कॅथोलिक म्हणून लहानाचे मोठे झाले.

२००६-२००८ च्या गृहयुद्धादरम्यान इस्लामिक स्टेटकडून ख्रिश्चनांचा छळ होत असताना ते असीरियन देशभक्त पक्षात सामील झाले आणि त्यांच्या मोसुल मुख्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून त्यांनी काम केले. जून २०१४ मध्ये, ‘आयएसआय’च्या अतिरेक्यांनी मोसुलचा ताबा घेतल्यानंतर मोमिका इस्लामिक स्टेटला विरोध करण्यासाठी पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस (पीएमएफ) चा भाग झाले. ते ख्रिश्चन युनिटचा सदस्य म्हणून लष्करी पोशाख घालून, बंदूक धारण करून इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इराकची लष्करी शाखा इमाम अली ब्रिगेडशी निष्ठेची शपथ घेताना दिसले.

हेही वाचा : अण्वस्त्रांच्या निर्मितीसाठी चीनने तयार केले संशोधन केंद्र? याचा अर्थ काय? या घडामोडीमुळे भारतावर काय परिणाम?

मोमिका २०१७ मध्ये शेंजेन व्हिसासह जर्मनीला गेले, जिथे त्यांनी सार्वजनिकपणे ख्रिश्चन धर्माचा त्याग केला आणि आपण नास्तिक असल्याचे घोषित केली. त्यांनी एप्रिल २०१८ मध्ये स्वीडनमध्ये आश्रयासाठी अर्ज केला आणि इराकी निर्वासित म्हणून नोंदणी केली. त्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये त्यांना तीन वर्षांचा तात्पुरता निवास परवाना देण्यात आला, जो एप्रिल २०२४ पर्यंत वैध होता. परंतु, स्वीडिश नागरिकत्वासाठी आवश्यक असलेला त्यांचा कायमस्वरूपी निवासाचा अर्ज त्यांच्या आश्रय अर्जातील काही तफावतींमुळे नाकारण्यात आला. स्वीडनमध्ये असताना ते डेमोक्रॅट्सच्या ज्युलिया क्रोनलिड यांना भेटले. मोमिकाने नंतर स्वीडन डेमोक्रॅट्सचा उमेदवार म्हणून रिक्सडॅगसाठी उभे राहण्यास स्वारस्य व्यक्त केले.

स्वीडनमध्ये वारंवार कुराण जाळण्यासाठी कुप्रसिद्ध असलेला इराकी नागरिक सलवान मोमिका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

पोलिस घटनेविषयी काय म्हणाले?

पोलिसांना बुधवारी रात्री ११ वाजता मोमिका रहात असलेल्या भागात गोळीबार झाला असल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला मोमिका यांची हत्या झाली असल्याचे पोलिसांनी जाहीर केले नाही. एका व्यक्तीला गोळी लागल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला, केवळ इतकीच माहिती पोलिसांनी दिली. माहितीनुसार, त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा मोमिका घराच्या बाल्कनीत उभे होते आणि सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रीमिंग करत होते, असे वृत्त बीबीसीने दिले. गुरुवारीच त्यांच्यावर दाखल खटल्याची अंतिम सुनावणी होणार होती. मात्र, सुनावणी पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे खटल्याची सुनावणीदेखील पुढे ढकलण्यात आली. या घटनेचा तपास सुरू झाला असल्याची माहिती पंतप्रधान उल्फ क्रिसटेरसन यांनी दिली आहे.

हेही वाचा : ट्रम्प यांचा दिवाळखोर पाकिस्तानला दणका; थांबवली आर्थिक मदत, याचा परिणाम काय?

मोमिका यांनी कुराण का जाळले होते?

२०२३ ला स्टॉकहोम येथील सेंट्रल मशि‍दीसमोर सलवान मोमिका यांनी स्वीडनचे दोन झेंडे फडकवले आणि देशाचे गीत गायले. त्यानंतर त्यांनी कुराण जाळले. मोमिका स्वतःला नास्तिक म्हणवून घेत असत व आपण एक लेखक असल्याचेही सांगत असत. २८ जून २०२३ ला बकरी ईदच्या दिवशी त्यांनी कुराणची प्रत जाळली. त्यांच्या या कृतीने स्वीडनपेक्षा इतर राज्यांत संतापाची लाट पसरली होती. सौदी अरेबियासह इतर इस्लामिक देशांनी त्यांच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली होती. अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने झाली. पाकिस्तानातदेखील याचा निषेध करण्यात आला. संयुक्त राष्ट्रानेदेखील ही घटना द्वेषपूर्ण असल्याचे सांगत विरोध केला होता.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who was salwan momika iraqi man burned quran in sweden shot dead rac rac