Lok Sabha Election 2024 Winners भारतीय जनता पार्टीने (भाजपा) लोकसभा निवडणुकीत ‘४०० पार’चा नारा दिला होता. मात्र, भाजपाला ५४३ पैकी एनडीएला केवळ २९३; तर भाजपाला २४० जागा जिंकता आल्याने भाजपाचे ते स्वप्न भंगले. दुसरीकडे काँग्रेसने ९९ जागा जिंकल्या; तर इंडिया आघाडीने २३३ जागांवर विजय मिळविला. भाजपासाठी हा निकाल अनपेक्षित होता. एकीकडे हा भाजपाचा पराभव असल्याचे विरोधक म्हणत आहेत; तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसर्यांदा सत्तास्थापनेचा दावा केला आहे. २०१९ च्या तुलनेत यंदा मोदीदेखील वाराणसीतून फार कमी मतफरकाने विजयी झाले. २०१९ च्या निवडणुकीत ४.७९ लाखांच्या मतांनी विजयी होणारे पंतप्रधान मोदी यंदा १.५२ लाखांच्या फरकाने विजयी झाले. या लोकसभा निवडणुकीत कोणाचा सर्वाधिक मतांनी विजय झाला आणि कोण सर्वांत कमी मतांनी विजयी झाले? यावर एक नजर टाकू या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा