अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील बहुप्रतीक्षित पहिली वादविवाद चर्चा गुरुवारी रात्री अटलांटा येथे (भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी) सीएनएन वाहिनीच्या स्टुडिओमध्ये पार पडली. ७८ वर्षीय ट्रम्प आणि ८१ वर्षीय बायडेन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत वयोवृद्ध अध्यक्षीय उमेदवार आहेत. ट्रम्प यांनी अधिक तंदुरुस्ती आणि चतुराई दाखवली, तर बायडेन अनेकदा मुद्देसूद बोलतानाही अडखळले आणि गडबडले. त्यामुळे पहिल्या वादविवादात ट्रम्प यांचीच सरशी झाल्याची चर्चा आहे. दुसरी वादविवाद चर्चा सप्टेंबरमध्ये अपेक्षित आहे.

बायडेन यांचे अडखळते वय….

जो बायडेन सध्या ८१ वर्षांचे आहेत. ते पुन्हा अध्यक्ष बनल्यास अध्यक्ष म्हणून ८५ वर्षांपर्यंत पदावर राहतील. या वयात इतकी महत्त्वाची जबाबदारी झेपेल का, या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याचे बायडेन यांनी सातत्याने टाळले. एरवी वादचर्चेतील सर्व मुद्द्यांवर उत्तरे देण्याचा प्रयत्न करणारे बायडेन या प्रश्नावर मात्र फार काही बोललेच नाहीत. त्यांच्या वाढत्या वयाविषयी, बोलताना आणि चालताना अडखळण्याविषयी डेमोक्रॅटिक पक्षामध्येच वाढती चिंता दिसून येते. ती चिंता तथ्याधारित असल्याचेच प्रस्तुत वादचर्चेत आढळून आले. कोविड निर्मूलन, स्थलांतरितांचा प्रश्न, अर्थव्यवस्था, अमली पदार्थ नियंत्रण अशा अनेक मुद्द्यांवर बोलताना बायडेन अडखळले, काही वेळा शब्ददेखील विसरले. ही एक बाब त्यांचे विरोधक डोनाल्ड ट्रम्प यांच्या पथ्यावर पडू शकते. ट्रम्प यांनीदेखील एकदा ‘ते काय म्हणाले ते मला समजले. ते त्यांनाही समजले असे वाटत नाही,’ असा टोला लगावलाच.

woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Kishore Jorgewar expressed his displeasure with Sudhir Mungantiwar front of Devendra Fadnavis
थेट फडणवीसांसमोरच जोरगेवारांनी व्यक्त केली मुनगंटीवारांवर जाहीर नाराजी… म्हणाले, “मला उमेदवारी मिळू नये म्हणून…”
Loksatta editorial on Donald Trump unique campaign in us presidential election
अग्रलेख: ‘तो’ आणि ‘त्या’!
Devendra Fadnavis , Ravi Rana, Mahavikas Aghadi,
विरोधकांच्या डोक्‍याचे नट कसण्‍यासाठी मी राणांचा पाना… फडणवीसांकडून जोरदार….
Loksatta editorial Donald Trump victory in the US presidential election
अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!

हेही वाचा: इब्राहिम रईसींच्या अपघाती मृत्यूनंतर इराणमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कशी होणार आहे? काय असते प्रक्रिया?

ट्रम्प यांचे आत्मविश्वासपूर्ण असत्यकथन…

बायडेन सुरुवातीपासूनच अडखळले, तसा ट्रम्प यांचा आत्मविश्वास वाढला. त्यांनी एकेका मुद्द्यावर आपली मते रेटून मांडण्यास सुरुवात केली. या वादचर्चेत एक उमेदवार बोलत असताना दुसऱ्याचा माईक बंद राहील, अशी योजना होती. कारण २०२०मधील एका वादचर्चेत ट्रम्प यांनी बायडेन यांना जवळपास बोलूच दिले नव्हते. पण बायडेन अढखळले, तरी ट्रम्प यांनी अनेक मुद्द्यांवर आधीचीच मते मांडली. काही प्रश्नांचे उत्तर द्यायचेही टाळले. निर्वासितांसाठी बायडेन यांनी अमेरिकेची सीमा खुली केल्यामुळे गुन्हेगारी वाढली, युक्रेन युद्धसाठी मदत म्हणून कोट्यवधी डॉलर्स देण्याची चूक केली, हमासला बोकाळू दिले हे मुद्दे वगळता ट्रम्प यांच्याकडे विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण उत्तरांचा अभाव आढळला. पण त्यांनी आपला हुकमी एक्का – आत्मविश्वासपूर्ण असत्यकथन – खुबीने वापरला.

परस्परांविषयी पराकोटीचा तिटकारा

आजी-माजी अध्यक्षांनी वादविवादापूर्वी हस्तांदोलन केले नाही. परस्परांविरोधात अत्यंत कडव्या शब्दांत टिप्पणी केली. ‘गल्लीतल्या मांजरासारखी या माणसाची मानसिकता आहे’, असे एकदा बायडेन म्हणाले. आपल्याच सध्या एकच गुन्हेगार आहे नि तो माझ्या उजवीकडे उभा आहे, ही बायडेन यांची मल्लीनाथी ट्रम्प यांना विलक्षण झोंबली. गोल्फ खेळताना चेंडू ५० यार्ड तरी मारून दाखवा, अशा शब्दांत ट्रम्प यांनी बायडेन यांच्या वयाची टर उडवली. ‘पोरांसारखे वागू नका, तुम्ही तर बालक आहात’ असेही ट्रम्प म्हणाले.

हेही वाचा: लोकसभेतील सेंगोलवरुन पुन्हा वाद होण्याची चिन्हे; काय आहेत सेंगोलबाबतची मिथकं, वाद, इतिहास आणि वास्तव

ट्रम्प यांची बहुतेकदा मूळ प्रश्नांना बगल…

गर्भपाताच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली. परंतु आपले म्हणणे सादर करण्याऐवजी ट्रम्प यांनी भलतीकडेच चर्चा वळवली. ते पुन्हा एकदा स्थलांतर या सुरुवातीच्या मुद्द्यावर बोलू लागले. गर्भपाताच्या मुद्द्यावर बायडेन हेही आरोग्य कल्याणाच्या चर्चेकडे वळले. माजी सैनिकांच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांनी चर्चेचा रोख इतरत्र वळवला. पण ट्रम्प यांनी हे अधिकवेळा केला. स्थलांतर या मुद्द्यावर आपल्याला सर्वाधिक रिपब्लिकन मतदारांचा पाठिंबा मिळेल, हे ठाऊक असल्यामुळे अडचणीच्या मुद्द्यांमध्ये ट्रम्प फार शिरायचेच नाहीत. ‘नाटोचे अवमूल्यन केलेत,’ या बायडेन यांचा आरोपावर ट्रम्प गर्भपाताच्या मुद्द्याकडे वळायचे. पुतिन यांच्याविषयी चर्चेदरम्यान ट्रम्प पुन्हा स्थलांतरितांच्या मुद्द्याकडे सरकायचे. सर्वांत महत्त्वाच्या आणि कळीच्या प्रश्नावर त्यांची भंबेरी उडाली. निवडणूक निकाल स्वीकारणार का, या प्रश्नाचे उत्तर ते सतत टाळत होते. अखेरीस सूत्रधाराने त्यांना प्रश्नाचे उत्तर देण्याविषयी स्मरण केले, त्यावेळी संदिग्ध उत्तर देऊन ट्रम्प यांनी वेळ मारून नेली.

हेही वाचा: गडचिरोलीतील अनेक गावांमध्ये ग्रामस्थांकडून नक्षलींना प्रवेशबंदी का? ती कितीपत प्रभावी?

पुढे काय?

ही अध्यक्षीय निवडणुकीच्या इतिहासातली सर्वाधिक अलीकडची वादचर्चा होती. सप्टेंबरमध्ये चर्चेची दुसरी फेरी आहे. याचा निवडणूक निकालावर किती परिणाम होईल, हे सांगता येत नाही. परंतु ट्रम्प यांच्या समर्थकांना आणि पक्षाला त्यांच्याकडून अपेक्षित तेच मिळाले. याउलट बायडेन यांच्या वयाविषयी पक्ष सहकाऱ्यांना आणि डेमोक्रॅटिक मतदारांना वाटणारी भीती खरी ठरत आहे, ही बाब बायडेन यांच्यासाठी प्रतिकूल ठरू शकते. त्यामुळे सध्या तरी अध्यक्षीय शर्यतीमध्ये ट्रम्प किंचित पुढे सरकले आहेत.