गेली काही वर्षे अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने भारतात मुक्काम ठोकला आहे. तालिबानने दुसऱ्यांदा अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर तेथे क्रिकेट खेळणे जवळपास अशक्य बनले होते. पण आता अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेटपटूंना मात्र तशी संधी मिळाली नाही. त्यांनी ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये आश्रय घेतला, असे वृत्त ‘दि इकॉनॉमिस्ट’ने दिले आहे. तालिबानच्या जुलमी राजवटीत या महिला क्रिकेटपटूंना संधी मिळणे अशक्यच आहे. मात्र अफगाण पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणे आयसीसी किंवा इतर देशांचा पाठिंबा महिला क्रिकेटपटूंना का मिळू शकत नाही, असा त्यांचा सवाल आहे.

५ ऑगस्ट २०२१ रोजी सारे काही बदलले…

अफगाणिस्तानमध्ये या दिवशी तालिबान राजवटीची दुसऱ्यांदा स्थापना झाली. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून अमेरिकी फौजा माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आणि काबूलमधील अश्रफ घनी सरकार तालिबानच्या रेट्यापुढे अवघ्या काही आठवड्यांत शरण आले. काबूल आणि त्याद्वारे अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर काही दिवसांतच तालिबान राजवटीने फतवे काढण्यास सुरुवात केली. पहिले लक्ष्य अर्थातच महिला आणि मुली ठरल्या. मुलींनी सहावीपर्यंतच शिक्षण घेतले पाहिजे, कोणत्याही प्रकारच्या क्रीडा-कलाविष्कारापासून दूर राहिले पाहिजे, महिलांनी घराबाहेर पडताना संपूर्ण शरीर झाकले पाहिजे, मोठ्या आवाजात बोलणे टाळले पाहिजे अशा जाचक अटी लादण्यात आल्या आणि त्यांची निष्ठूर अंमलबजावणीही सुरू झाली. याचा फटका अर्थातच तेथील महिला क्रिकेटपटूंना बसला.

digi yatra to target tax evaders
कर चुकवेगिरी करणाऱ्यांना पकडण्यासाठी होतोय सरकारच्या ‘डिजी यात्रा’ अ‍ॅपचा वापर? यामागील सत्य काय?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Why do we celebrate New Year on January 1_
Julius Caesar calendar reform: १२ महिने, ३६५ दिवस; कॅलेंडरचं हे स्वरुप कोणी ठरवलं?
Koregaon Bhima Shaurya Din
Koregaon Bhima Shaurya Din: महार रेजिमेंट आणि कोरेगाव विजय स्तंभ नेमके नाते काय? महार रेजिमेंटची स्थापना कशी झाली?
rohit sharma performance in last 15 innings in test match
गेल्या १५ डावांत एकदा ५०, दोनदा २०… अपयशी रोहितची सिडनी कसोटी अखेरची? कर्णधारपदासाठी दावेदार कोण?
underwater telescope
‘Ghost Particle’ शोधण्यासाठी शास्त्रज्ञ आता समुद्राखाली बसवणार दुर्बिणी; कसं चालणार त्यांचं काम?
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
How is the President of the United States elected Why is voting indirect
अमेरिकेचे अध्यक्ष कसे निवडले जातात? मतदान अप्रत्यक्ष का असते? समसमान मते मिळाल्यास काय? 

हेही वाचा : येत्या ३० वर्षांत ‘एआय’मुळे मानवी उपयोगिताच नष्ट? कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रणेते हिंटन यांचा इशारा काय सांगतो? नियमनाची गरज का?

अफगाणिस्तानातील महिला क्रिकेट

तालिबान राजवटीच्या स्थापनेच्या नऊ महिने आधी अफगाणिस्तानात पहिल्या महिला क्रिकेट संघाची स्थापना झाली होती. अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने (एसीबी) २०१०मध्ये महिला क्रिकेट संघाच्या उभारणीसाठी प्रयत्न केला. पण पुरेशा मुली उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे चार वर्षांनी तो प्रयत्न सोडून देण्यात आला. मात्र २०२०मध्ये पुन्हा एकदा प्रयत्न केले गेले. शालेय क्रिकेट संघांतून राष्ट्रीय संघासाठी क्रिकेटपटूंची निवड सुरू झाली. केवळ ५०० मुलीनी उत्साह आणि तयारी दाखवली. त्यातून २५ मुलींची निवड झाली आणि त्यांना करारबद्ध केले गेले.

उत्साह, आशा… नि स्वप्नांचा चुराडा!

अनेक क्रिकेटपटूंच्या कुटुंबियांना आपली मुलगी क्रिकेट खेळते, हे समाजात उघड करण्याची इच्छा नव्हती. बेनाफशा हाशिमीच्या आईने तिला जाणूनबुजून खराब खेळण्याचा सल्ला दिला, जेणेकरून तिची कारकीर्द संपुष्टात येईल! रोया समीम या क्रिकेटपटूने सांगितले, की तालिबान राजवटीची चिन्हे दिसू लागताच अफगाण क्रिकेट संघटनेच्या काही अधिकाऱ्यांनी याबद्दल महिला क्रिकेटपटूंना जबाबदार धरण्यास सुरुवात केली. तरीदेखील बहुतेक क्रिकेटपटूंनी धीर सोडला नाही. तुबा संगर ही संघटनेची प्रशासकीय अधिकारी सांगते, की पहिल्यांदा या क्रिकेटपटूंना पोशाख आणि साहित्य (किट) मिळाले, त्यावेळी अनेकींनी जाहीरपणे जाहीरपणे त्याचे प्रदर्शन केले. त्यांच्यासाठी आयुष्यातला तो सर्वोत्तम क्षण होता, असे तुबा सांगते. लवकरच या मुलींच्या पहिल्या परदेश दौऱ्याची तयारी सुरू झाली. अफगाणिस्तानचा महिला संघ ओमानच्या दौऱ्यावर निघाला होता. सारे काही सुरळीत सुरू असतानाच तालिबान राजवटीचे संकट ओढवले आणि महिला क्रिकेटच संपुष्टात आले.

हेही वाचा : विश्लेषण : भारतीय लष्करातील प्राणी-विभागावर ‘कॅग’चे कोणते ठपके?

क्रिकेपटू आणि क्रिकेटही विखुरले…

तालिबानच्या राजवटीची चाहूल लागताच सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचे सरकार या क्रिकेटपटूंच्या मदतीसाठी धावून आले. अनेकींनी काबूलमधून तात्काळ पळ काढला. पुढे कॅनडा आणि ब्रिटनच्या सरकारांनीही काही क्रिकेपटूंना आश्रय दिला. पण फिरोझा सुल्तानसारख्या काही जणी तितक्या नशीबवान नव्हत्या. फिरोझाकडे पासपोर्टच नव्हता. पाकिस्तानात जाण्यासाठी जवळपास नऊ हॉटेले बदलावी लागली. बहुतेक तालिबान चेकपोस्टवरून तिला पाकिस्तानात प्रवेश नाकारण्यात आला. ओळख संपूर्णपणे पुसली जावी, यासाठी तिला आपले क्रिकेटचे साहित्य, प्रमाणपत्रे वगैरे सारे काही जाळून टाकावे लागले. आपण क्रिकेटपटू आहोत हे तालिबानला कळते, तर आपला आणि आपल्या जवळच्यांचा जीव धोक्यात आला असता असे तिने ‘दि इकॉनॉमिस्ट’ला सांगितले. पाकिस्तानात अफगाणांना वैद्यकीय व्हिसा तात्काळ मिळतो. फिरोझाच्या नातेवाईकांनी तिला कसलासा आजार असल्याची खोटी प्रमाणपत्रे बनवली आणि अखेरीस बऱ्याच प्रत्यत्नांनतर ती व तिच्या कुटुंबियांना पाकिस्तानात प्रवेश मिळाला. पुढे फिरोझाही ऑस्ट्रेलियाला रवाना झाली.

आयसीसीकडून मान्यतेची प्रतीक्षा

१९७० आणि ८०च्या दशकांमध्ये अफगाणिस्तानातील यादवीपासून पळ काढत असंख्य अफगाण निर्वासित पाकिस्तानात स्थिरावले. तेथे अनेक अफगाण मुलांचा क्रिकेटशी परिचय झाला. हेच निर्वासित नवीन सहस्रकाच्या सुरुवातीस अफगाणिस्तानात परतले, त्यावेळी अनेक मुलांमध्ये क्रिकेटचे कौशल्य मुरले होते. २००७मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. पुरुष क्रिकेटपटूंनी अल्पावधीतच विशेषतः टी-ट्वेण्टी प्रकारात उत्तम कामगिरी करून दाखवली. आयसीसीचा निधी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पुरुष संघाला मिळतो. महिला मात्र तितक्या सुदैवी नाहीत. याचे एक कारण तांत्रिक आहे. आयसीसीच्या नियमानुसार एखाद्या क्रिकेट संघटनेला तेथील सरकारची मान्यता अनिवार्य असते. अफगाणिस्तानच्या पुरुष संघाला ती आजही आहे. तालिबानचे अनेक नेते क्रिकेटप्रेमी आहे. पण या राजवटीकडून महिला क्रिकेटला किंवा तेथील संघटनेला मान्यता मिळण्याची शक्यताच नाही. ती मान्यता नाही, त्यामुळे आयसीसीची मान्यता नाही. आयसीसीची मान्यता नाही, त्यामुळे निधी नाही. या निधीशिवाय अफगाणिस्तानचे महिला क्रिकेट उभे राहू शकत नाही, असा हा विचित्र तिढा आहे.

Story img Loader