अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचा पराभव करत पुनरागमन केले आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला २७० चा आकडा त्यांनी ओलांडला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर भारतातही मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातील एका गावातील रहिवाशांनी जेडी वेन्स उपाध्यक्ष झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे, कारण जेडी वेन्स यांच्या पत्नी उषा वेन्स यांना अमेरिकेच्या ‘सेकंड लेडी’ होण्याचा मान मिळाला आहे आणि त्यांचे वंशज अमेरिकेतील याच गावाचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. कोण आहेत उषा वेन्स? त्यांचे भारत कनेक्शन काय? जेडी वेन्स यांच्या यशात उषा यांची भूमिका काय? गावकर्यांना त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत? त्याविषयी जाणून घेऊ.
उषा वेन्स यांच्याकडून गावकर्यांना अपेक्षा
उषा वेन्स यांचा जन्म सॅन डिएगो या उपनगरात झाला. आंध्र प्रदेश राज्यातील उषा वेन्स यांच्या पूर्वजांच्या गावातील लोकांनी ट्रम्प यांच्या विजयासाठी प्रार्थना केली. वॉशिंग्टनमधील व्हाईट हाऊसपासून १३,४५० किलोमीटर (८,३६० मैल) पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या वडलुरू येथील रहिवासी असलेल्या ५३ वर्षीय श्रीनिवासू राजू यांनी सांगितले, “आम्ही आनंदी आहोत, आम्ही ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे.” निवडणुकीपूर्वी गावकऱ्यांनी ट्रम्प यांच्या विजयासाठी प्रार्थना केली होती. हिंदू पुजारी अप्पाजी यांना आशा होती की, उषा वेन्स त्या बदल्यात गावासाठी काहीतरी करतील. “आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी आमच्या गावाला मदत करावी,” असे पुजारी म्हणाले.
हेही वाचा : समोसा कॉकस म्हणजे काय? अमेरिकेच्या निवडणुकीत का चर्चेत?
“जर त्या त्यांची मुळे ओळखू शकल्या आणि या गावासाठी काही चांगले करू शकल्या तर खूप चांगले होईल. फक्त मीच नाही प्रत्येक भारतीयाला उषा यांचा अभिमान आहे, कारण उषा या भारतीय वंशाच्या आहेत,” असे ७० वर्षीय व्यंकटा रामनाय म्हणाल्या. “आम्हाला आशा आहे की त्या आमच्या गावाचा विकास करतील,” असेही त्या म्हणाल्या. उषा कधीच गावात गेल्या नाहीत, पण पुजारी म्हणाले की त्यांचे वडील सुमारे तीन वर्षांपूर्वी गावात आले होते आणि मंदिराची स्थिती तपासली होती. “आम्ही ट्रम्प यांचे काम पाहिले आहे, ते खूप चांगले आहेत, ” असे रामनाय म्हणाले. ट्रम्प यांच्या अध्यक्षतेदरम्यान भारत आणि अमेरिकेचे संबंध अतिशय चांगले होते.
हेही वाचा : ट्रम्प यांच्या विजयाने भारतीय स्थलांतरित चिंतित का आहेत?
उषा वेन्स यांचे भारत कनेक्शन
येल आणि केंब्रिज विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलेल्या उषा यांनी २०१४ मध्ये हिंदू पद्धतीने केंटकी येथील जेडी व्हेन्स यांच्याशी लग्न केले. त्यांना तीन मुले आहेत. त्यांचे पणजोबा वडलुरू या गावातील होते. त्यांचे वडील चिलुकुरी राधाकृष्णन पीएचडीधारक असून त्यांनी अमेरिकेत आपले संपूर्ण शिक्षण पूर्ण केले. अमेरिकेत येण्यापूर्वी ते चेन्नई येथे राहिले. राधाकृष्णन यांच्या अमेरिकेतील सुरुवातीच्या वर्षांबद्दल फारशी माहिती नाही. सर्वात अलीकडील अमेरिकेच्या जनगणनेनुसार, भारतीय हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आशियाई वांशिक आहेत. उषा वेन्स यांचे पतीच्या यशात मोलाचे योगदान आहे. ‘एएनआय’नुसार, ग्रामीण अमेरिकेत आपल्या पतीचे विचार मांडण्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात सहाय्य केले. ‘सीएनएन’नुसार जेडी वेन्स यांनी लिहिले, “मला तिने नेहमी संधींचा शोध घेण्यास प्रोत्साहित केले.”