Apple iPod Discontinued: अॅपल कंपनीने आयपॉड टच मॉडेल बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आयपॉड प्रोडक्शन आता पूर्णपणे बंद होणार आहे. अॅपलने ऑक्टोबर २००१ मध्ये आयपॉड लाँच केला होता. त्या काळातील सर्वात प्रसिद्ध संगीत गॅझेट म्हणून याची ख्याती होती. आयपॉड मिनी, आयपॉड नॅनो, आयपॉड शफल आणि आयपॉड टचसारखे अनेक लोकप्रिय मॉडेल्स विकले आहेत. पण गेल्या काही वर्षांत आयपॉड क्लासिक, आयपॉड नॅनो आणि आयपॉड शफलची विक्री फारशी विक्री झालेली नाही. याशिवाय अनेक वर्षांपासून या मालिकेबाबत कोणतेही विशेष आणि मोठे अपडेट जारी करण्यात आलेले नाही. त्याचे शेवटचे अपडेट २०१९ मध्ये 7th Gen आयपॉड टचसाठी रिलीझ करण्यात आले होते. एक काळ असा होता की, बाजारात अॅपल आयपॉडची मोठी मागणी होती. आयफोनच्या वाढत्या लोकप्रियतेनंतर अॅपलने आपल्या आयपॉडकडे लक्ष देणे बंद केले आहे. अॅपल आता २० वर्षांनंतर प्रोडक्ट बंद करणार आहे. आयपॉड टच शेवटच्या स्टॉकपर्यंत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल, असे अॅपलने म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा