तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे प्रमाण चिंताजनक दराने वाढत आहे. कॅनडासारख्या देशात फसवणूक हा आता ज्येष्ठांविरुद्धचा प्रमुख गुन्हा आहे. आजचे घोटाळेबाज नवनवीन तांत्रिक साधनांचा गैरफायदा घेत आहेत; ज्यामुळे त्यांना शोधून काढणेही कठीण झाले आहे. व्हॉइस सिम्युलेशन सिस्टीम वापरून फसव्या फोन कॉल्सपासून ते अत्याधुनिक ऑनलाइन हस्टलिंगपर्यंत फसवणुकीचे नवनवीन स्वरूप आता पाहायला मिळत आहे. एकीकडे तंत्रज्ञान दैनंदिन आयुष्यातील कामे सोपे करीत आहे; मात्र दुसरीकडे याच तंत्रज्ञानामुळे फसवणुकीच्या प्रमाणात लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीच्या घटना का वाढत आहेत? त्यापासून त्यांचे संरक्षण कसे करता येईल? त्याविषयी जाणून घेऊ.

फसवणुकीची वाढती प्रकरणे

एकूणच ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. महाठक प्रिय व्यक्ती अडचणीत असल्याचे भासवून वृद्ध व्यक्तींना फसवतात, त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतात आणि त्यांना विचार करण्यास वेळ न देता घाईने पैसे पाठवण्यास प्रवृत्त करतात. कॅनेडियन अँटी फ्रॉड सेंटर (सीएएफसी)ने आतापर्यंत एकूण २,४९४ प्रकरणांची नोंद केली आहे; ज्यांचे एकूण ९.४ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले आहे. रोमान्स घोटाळा हा आणखी एक सामान्य सापळा आहे. आर्थिक अडचणीत किंवा एकट्या असलेल्या पीडितांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे काढून घेतले जातात. आधुनिक तंत्रज्ञानामुळे फसवणुकीचा हा प्रकार लक्षणीयरीत्या वाढला आहे. रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २०२३ मध्ये रोमान्स घोटाळ्यामुळे कॅनेडियन लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ‘सीएएफसी’नुसार, २०२२ मध्ये कॅनेडियन लोकांनी या प्रकारच्या फसवणुकीमुळे ५९ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम गमावली.

Queen Nefertiti bust
Queen Nefertiti bust: ३,३७० वर्षे प्राचीन इजिप्तची राणी परंतु तिचा पुतळा जर्मनीत; नेफरतितीचा अर्धपुतळा इजिप्तला परत मिळणार का?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Japan plunged into political uncertainty after voters deliver dramatic defeat to longtime ruling party
जपानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत धक्कादायक निकाल… ५० वर्षांहून अधिक काळ सत्तारूढ पक्षाची घोटाळ्यांमुळे पडझड?
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Election Commission, maharashtra Director General of Police, Rashmi Shukla
विश्लेषण : पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना अखेर निवडणूक आयोगाने का हटविले?
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?

हेही वाचा : शास्त्रज्ञांनी लावला पहिल्या ‘ब्लॅक होल ट्रिपल’चा शोध; यातून नेमकं काय उलगडणार?

काल्पनिक ओळखीद्वारे फसवणूक

चोरलेले फोटो वापरून, काल्पनिक ओळख पटवून देणारे प्रोफाइल तयार करीत फसवणूक करणारे डेटिंग प्लॅटफॉर्म आणि सोशल नेटवर्क्सचा वापर करतात. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इमेज मॅनिप्युलेशन सॉफ्टवेअरचा वापर करून, या घोटाळ्यांना अधिक वास्तववादी केले जाते. पीडितांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी याचा वापर केला जाते. कॅनेडियन जनतेला रोमान्स फसवणुकीबद्दल सावध करण्यासाठी अलीकडेच सूचना जारी केल्या गेल्या आहेत; जेथे फसवणूककर्ते फसव्या क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पीडितांना प्रवृत्त करतात. फिशिंग हा ज्येष्ठांविरुद्ध वापरला जाणारा फसवणुकीचा आणखी एक सामान्य प्रकार आहे. हे महाठक कंपन्या किंवा वित्तीय संस्था असल्याचे भासवून ई-मेल किंवा मजकूर संदेश पाठवतात आणि प्राप्तकर्त्यांना फसव्या लिंकवर क्लिक करण्यास किंवा वैयक्तिक माहिती उघड करण्यास प्रवृत्त करतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेटेड सिस्टीममुळे फसवणूककर्ते पीडितांना अगदी सहजपणे लक्ष्य करू शकतात.

एकूणच ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक दिवसेंदिवस वाढत आहे. (फायनान्शियल एक्सप्रेस)

फसवणुकीचे प्रमाण वाढण्याची कारणे काय?

ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून, फसवणूक होण्याचे प्रमाण वाढण्यास अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. ज्येष्ठ नागरिकांकडे अधिक मोकळा वेळ असतो आणि ते सामाजिकदृष्ट्या अधिक अलिप्त असल्यामुळे अनोळखी व्यक्तींच्या कॉल, ई-मेल किंवा मजकूर संदेशांना प्रतिसाद देण्याकडे अधिक लक्ष देतात. त्यांचा एकटेपणादेखील फसव्या परस्परसंवादांना अधिक विश्वासार्ह करण्यास कारणीभूत ठरतो. अनेक ज्येष्ठ नागरिक इंटरनेट वापरत असले तरी बहुसंख्य लोकांकडे तंत्रज्ञानाची सोय नसते. अनेक जागरूकता मोहिमा राबविल्या जाऊनही ज्येष्ठ लोक या सापळ्यात अडकत राहतात. कारण- फसवणूककर्ते ज्येष्ठ नागरिक डिजिटल तंत्रज्ञानाशी परिचित नसल्याचा गैरफायदा घेतात.

फसवणुकीपासून ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण कसे करावे?

फसवणुकीपासून आपल्या वरिष्ठांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना अधिक जागरूक करणे आवश्यक आहे. जसे की, पिन किंवा पासवर्ड, मोबाईल क्रमांक, ई-मेल किंवा मजकूर संदेश कधीही सामायिक करू नये. ई-मेल, मजकूर किंवा फोनद्वारे प्राप्त झालेल्या कोणत्याही अवांछित ऑफरला प्रतिसाद देणे टाळावे. एखाद्या विशिष्ट प्रकरणात कारवाईची आवश्यकता असल्यास, दिलेल्या लिंकवर क्लिक करण्याऐवजी वित्तीय संस्थेचा वेब पत्ता टाईप करणे योग्य असेल. वरिष्ठ नागरिकांनी कधीही घाईघाईने निर्णय घेऊ नये. एखाद्याने मूल किंवा नातवंडे आपत्कालीन परिस्थितीत असल्याचा दावा केल्यास आणि आर्थिक मदत मागितल्यास त्यांची ओळख पडताळण्यासाठी त्यांना वैयक्तिक प्रश्न विचारावेत. काहीतरी संशयास्पद वाटत असल्यास खबरदारी घेणे योग्य असेल.

हेही वाचा : ‘कोदो मिलेट’च्या सेवनाने तीन दिवसांत १० हत्तींचा मृत्यू; कारण काय? काय आहे कोदो मिलेट?

ज्येष्ठ नागरिक डिजिटल साधनांशी कमी परिचित असल्याने त्यांना अधिकाधिक लक्ष्य केले जाते. मग ते रोमँटिक फसवणूक असो, फिशिंग असो किंवा टेलिफोन फसवणूक असो. त्यांच्या विश्वास आणि एकटेपणाचा गैरफायदा घेतला जातो. या धोक्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना माहिती देणे आणि त्यांना शिक्षित करणे आवश्यक आहे; जेणेकरून ते या फसवणूक प्रकारांपासून स्वतःला दूर ठेवू शकतील किंवा स्वतःचे संरक्षण करू शकतील.