हृषिकेश देशपांडे
लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने गुजरातमधील सर्व म्हणजे २६ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हे गृहराज्य. तसेच भाजपचे राज्यात भक्कम संघटन असून, तीन दशकांहून अधिक काळ राज्यात सत्ता आहे. दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत भाजपने एकूण ५२.५० टक्के मतांसह राज्यातील १८२ पैकी विक्रमी १५६ जागा पटकावल्या होत्या. त्यामुळेच यंदाही राज्यातील सर्व २६ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. मात्र राज्यात भाजपपुढे समस्या निर्माण झाली आहे ती, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या विधानाने. खरे तर उत्तम वक्ते असलेले रुपाला वादापासून दूर राहतात. अमरेली हे कार्यक्षेत्र असलेले ६९ वर्षीय रुपाला यांना भाजपने राजकोट मतदारसंघातून रिंगणात उतरवले आहे. प्रचारसभेदरम्यान एका वक्तव्याने रुपाला यांच्याबरोबीने भाजपची कोंडी झाली आहे. 

नेमका वाद काय?

राजकोट येथे २२ मार्च रोजी एका मेळाव्यातील रुपाला यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. त्यात त्यांनी, तत्कालीन राजे हे त्या वेळचे शासक तसेच ब्रिटिशांच्या छळामुळे शरण आले. इतकेच नव्हे तर तडजोड म्हणून आपल्या मुलींचे विवाह लावून दिले, असे विधान केले. रुपाला यांच्या या विधानावर रजपूत समुदायाने यावर आक्षेप घेतला. गुजरातमधील तत्कालीन राजघराणी रजपूत समुदायातील आहेत. अर्थात रुपाला यांनी वक्तव्यावर माफी मागितली असली तरी, रजपूत समुदायाला ती मान्य नाही. त्यांची उमेदवारी बदला, अन्यथा अपक्ष उमेदवार उभा करू असा इशारा त्यांनी दिलाय. यात प्रदेश भाजपच्या समाजातील नेत्यांनी चर्चा केली मात्र त्यातून तोडगा निघाला नाही. रजपूत समन्वय समितीने भाजपविरोधात देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. रुपाला यांना हटवा इतकीच आमची मागणी आहे असे या समितीचे म्हणणे आहे. गुजरातमध्ये ७५ लाख रजपूत तर देशात २.२ कोटी समाज आहे. तुम्हाला एक उमेदवार हवा की आमची मते, असा त्यांचा सवाल आहे. राज्यातील रजपूत समुदायातील भाजपच्या नेत्यांशीही चर्चा करून मार्ग निघाला नाही. अशात रजपूत समाज जर विरोधात गेला तर भाजपपुढे गुजरातमध्ये काही प्रमाणात आव्हान निर्माण होऊ शकते. रजपूत समाजाने विरोध केल्यानंतर राज्यातील प्रभावशाली असा पाटीदार समाज रुपाला यांच्यामागे आहे. रुपाला हे या समुदायातून येतात.

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra assembly polls 2024 state economy in decline during bjp rule says chidambaram
भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका
maharashtra assembly election 2024 union minister nitin gadkari at a campaign rally of mahayuti candidate in ambad print
जात लोकांच्या नव्हे, तर पुढाऱ्यांच्या मनात! नितीन गडकरी यांचे मत
those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?

हेही वाचा >>>Water Crisis: बंगळुरूमध्ये केपटाऊनपेक्षाही भीषण जलसंकट? कारणीभूत कोण?

फलक हटवले

मी हिंदुत्वाबरोबर आहे. मी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच परुषोत्तम रुपाला यांच्या पाठीशी आहे असे फलक राजकोटमध्ये लावण्यात आले होते. पाटीदार अनामत आंदोलन समितीने हे फलक लावल्याचे सांगितले जाते. आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाने हे फलक हटवले मात्र यातून दोन समाज एकमेकांविरोधात आल्याचे स्पष्ट झाले. राज्यात १८ टक्के हा पाटीदार समाज आहे. रुपाला यांनी माफी मागूनदेखील आंदोलन सुरू ठेवणे चुकीचे असल्याचे पाटीदार समाजातील काही नेत्यांनी सांगितले. भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांनी वादात मध्यस्थी करत रुपाला यांना माफ करण्याचे आवाहन केले आहे. या मुद्द्यावर रुपाला यांनी तीनदा दिलगिरी व्यक्त केल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पाटील यांनी भाजपच्या रजपूत नेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र राज्यात ठिकठीकाणी रुपाला यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन सुरूच आहे. राज्य भाजपमधील रजपूत नेतेही उघडपणे रुपाला यांच्याविरोधात गेल्याने मोठ्या मतांनी राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचे आव्हान आहे. काँग्रेस तसेच आम आदमी पक्ष यांची आघाडी भाजपविरोधात रिंगणात आहे.

हेही वाचा >>>जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?

रुपाला यांचे महत्त्व

केंद्रीय मंत्री रुपाला यांनी पंतप्रधानांना संकटकाळात साथ दिली आहे. पाटीदार आरक्षण आंदोलन ऐन भरात असताना २०१७ ची गुजरात विधानसभा निवडणूक भाजपसाठी खूपच आव्हानात्मक होती. त्या वेळी रुपाला यांनी राज्यभर फिरून भाजपचा प्रचार करत पक्षाला बहुमत मिळवून देण्यात यश मिळवले होते. प्रदेशाध्यपदासह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पक्ष संघटना तसेच सरकारमध्ये त्यांनी सांभाळल्या आहेत. आताही केंद्रात मंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मंत्रिमंडळातील अनेक राज्यसभा सदस्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय पक्षाने घेतला. त्यात रुपाला यांनाही उमेदवारी देण्यात आली. अशा वेळी त्यांची उमेदवारी रद्द करणे पक्षासाठी नामुष्कीची बाब ठरेल. या मुद्द्यावर भाजप तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र रजपूत नेते रुपाला यांनी उमेदवारी मागे घ्यावी यावरच ठाम आहेत. आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच यात लक्ष घातले तर, तोडगा निघेल अन्यथा भाजपसाठी काही प्रमाणात हे आव्हानच ठरेल.

hrishikesh.deshpande@expressindia.com