संक्रातीची चाहूल लागताच आबालवृद्धांना पतंगबाजीचे वेध लागतात. पतंगबाजीसाठी गेल्या काही वर्षांपासून चिनी बनावटीच्या नायलाॅन मांजाचा वापर करण्यात येत आहे. नायलाॅन मांजामुळे गळा चिरल्याने नागरिक मृत्युमुखी पडल्याच्या घटना अनेक शहरांत घडल्या आहेत. नायलाॅन मांजामुळे पक्ष्यांनाही गंभीर इजा होऊन ते मृत्युमुखी पडतात. पतंगबाजीसाठी वापरला जाणारा नायलाॅन मांजा नागरिक, पशू-पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरल्याने उच्च न्यायालयाने अशा मांजावर बंदी घातली आहे. मात्र, बंदी घातल्यानंतरही नायलाॅन मांजा बाजारात उपलब्ध असल्याने ही बंदी कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नायलाॅन मांजाची छुपी विक्री?

मुुंबई, पुणे, संभाजीनगर, नागपूर शहरातील बाजारपेठेत पतंगविक्रेत्यांची मोठ्या प्रमाणावर दुकाने आहेत. दर वर्षी संक्रातीपूर्वी पोलिसांची पथके बाजारपेठेतील पतंगविक्रेत्यांना नायलाॅन मांजाची विक्री केल्यास कारवाई करण्यात येईल, अशा सूचना देतात. मात्र, काही विक्रेते छुप्या पद्धतीने नायलाॅन मांजाची विक्री करत असल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा : विश्लेषण : ‘अबकी बार चारसौ पार’!.. पण भाजप इतक्या जागा निवडून आणणार कशा? कुठून?

नायलाॅन मांजा म्हणजे काय?

मांजा तयार करण्यासाठी साध्या दोऱ्याचा वापर केला जातो. खळ, काचेचा चुरा, रांगोळी आणि रंगाच्या मिश्रणात साधा दोरा भिजवून तो वाळवत ठेवला जातो. दोरा वाळविण्यात आल्यानंतर तो मांजा म्हणून ओळखला जातो. पारंपरिक पद्धतीने तयार केल्या जाणाऱ्या मांजाला धार कमी असायची. तो साध्या डोळ्यांना दिसू शकतो. तो सहज तुटायचादेखील. मात्र, गेल्या काही वर्षांपासून नायलाॅन मांजा बाजारात उपलब्ध होऊ लागला. तो प्लॅस्टिकसारखा असल्याने सहजासहजी तुटत नाही. हाच नायलाॅन मांजा नागरिक, पक्ष्यांसाठी धोकादायक ठरतो.

नायलाॅन मांजावरची बंदी कागदावरच?

जिवाला धोका असणाऱ्या या नायलाॅन मांजावर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे तो अतिशय सावधगिरी बाळगून तयार केला जातो. एवढेच नव्हे, तर तो बाजारातही सहजपणे उपलब्ध होतो. मोठी शहरे तसेच गावांत संक्रांतीच्या आधी नायलाॅन मांजा पतंगविक्रेत्यांकडे उपलब्ध होतो. झोपडपट्ट्यांमधील दुकानांपासून उच्चभ्रू भागात नायलाॅन मांजा सहज उपलब्ध होतो. या मांजाला बोलीभाषेत चिनी मांजा असे म्हटले जाते. बंदी असल्यामुळे छापील किमतीपेक्षा जादा दराने नायलाॅन मांजाची विक्री केली जाते. नायलाॅन मांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलीस कारवाई करत असले, तरी, आतापर्यंत नायलाॅन मांजा उत्पादकाचा शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. नायलाॅन मांजा बाजारात कसा उपलब्ध होतो, याची माहितीदेखील पाेलिसांना मिळत नसल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा : सुवर्णपदक धावपटू ऑस्कर पिस्टोरियसला पॅरोल मंजूर, तुरुंगाबाहेर येण्यासाठी नेमक्या कोणत्या अटी?

नायलाॅन मांजा जीवघेणा का?

गेल्या काही वर्षांपासून पतंग उडविण्यासाठी नायलाॅन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. काही संस्थांकडून संक्रातीला पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते. चिनी बनावटीचा मांजा, नायलाॅन मांजा, तसेच काचेचा चुरा लावलेल्या मांजामुळे पक्षी, तसेच नागरिकांना गंभीर स्वरूपाच्या इजा होण्याच्या घटना राज्यात दर वर्षी घडतात. नायलाॅन मांजामुळे चार वर्षांपूर्वी भोसरीतील उड्डाणपुलावर दुचाकीस्वार डाॅक्टर महिलेचा मृत्यू झाला होता, तसेच एका महिलेच्या गळ्याला नायलाॅन मांजामुळे गंभीर इजा होऊन तिचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गेल्या वर्षी सातारा रस्त्यावर उड्डाणपुलावर नायलाॅन मांजामुळे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली होती. मुंबईत अलीकडेच एका पोलिसाचा गळा चिरून मृत्यू झाला. पालघरमध्ये एका लहान मुलाचा गळा तो कारचे सनरूफ उघडून उभा राहिल्यामुळे चिरला गेला आणि त्यात तो दगावला.

हेही वाचा : बांगलादेशमध्ये नोबेल पुरस्कारविजेत्यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास; कोण आहेत मुहम्मद युनूस? नेमके प्रकरण काय? वाचा….

कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद हवी?

पंधरा ते वीस दिवसांवर संक्रात येऊन ठेपलेली असताना बंदी घातलेल्या नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू झाली असून पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ कलम ५, १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे. एखाद्या गुन्ह्यात दोन ते सात वर्षांची शिक्षेची तरतूद असेल, तर अशा गुन्ह्यात आरोपीला अटक न करता त्याला नोटीस बजावावी, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. नोटीस बजावण्यात आल्यानंतर आरोपीला न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना हजर केले जाते. गुन्हा गंभीर नसल्याने न्यायालय संबंधित आरोपीला जामीन मंजूर करते. कमी शिक्षेची तरतूद असल्याने नायलाॅन मांजा विक्री करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई करण्यास मर्यादा येतात. कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद केल्यास नायलाॅन मांजा विक्रेत्यांना चाप बसेल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

rahul.khaladkar@expressindia.com