मुंबईची दुसरी लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या बेस्ट बसच्या ताफ्यात इलेक्ट्रीक डबल डेकर बसचा समावेश करण्यात आला. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबईत एका कार्यक्रमात डबल डेकर बसचे उद्घाटन करण्यात आले. मुंबईकरांच्या मनात दुमजली म्हणजे डबलडेकर बसबद्दल कायमच आकर्षण राहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ताफ्यातील डबलडेकर बस जुन्या झाल्याने नव्या बसच्या पर्यायांवर विचार सुरू करण्यात आला होता. त्यानंतर आता एसी डबलडेकर बसचा समावेश बेस्टने आपल्या ताफ्यात केला आहे. ही बस जागतिक दर्जाची असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘स्विच मोबिलिटी’ कडून ९०० इलेक्ट्रीक बसेस वेट लीज तत्वावर बेस्ट घेणार आहे. त्यातील तीन बसेस मुंबईत दाखल झाल्या आहेत. मात्र, एकेकाळी बेस्टनेच सेवेतून कमी केलेल्या या डबलडेकर बस पुन्हा सेवेत का आणल्या जात आहेत? आणि जुन्या डबलडेकर बसना सेवेतून का काढून टाकण्यात आलं होतं? माहिती आहे का, नसेल तर घ्या जाणून

हेही वाचा- विश्लेषण : वैयक्तिक कॅराव्हॅन पर्यटनाला परवानगी; काय आहे हे अभिनव धोरण?

नव्या बस मुंबईत कोणत्या मार्गावर धावणार?

मुंबईमध्ये बेस्टची ही इलेक्ट्रीक बस तीन मार्गांवर धावण्याची शक्यता आहे. त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बोरिबंदर ते नरिमन पॉईंट, कुलाबा ते वरळी आणि कुर्ला ते सांताक्रूझ या मार्गांवर बस चालवण्यात येण्याची शक्यता आहे.

तिकिट किती?

दर किमान पाच किमी अंतरापर्यंत सहा रुपये असणार आहे. सध्या असलेल्या एसी बसच्या दराप्रमाणे या बसच्या तिकिटाचे दर असणार आहेत.

मुंबईत पहिल्यांदा डबर डेकर बस कधी धावली होती?

१९३७ मध्ये ब्रिटीशांनी मुंबईत डबल डेकरची ओळख करून दिली होती. लंडनच्या डबल डेकर बसेस सारखे दिसणारे मॉडेल मुंबईतील बसेससाठी तयार केले होते. वर्षानुवर्षे, बॉम्बे म्हणून ओळखले जाणारे शहर जसजसे विस्तारत गेले, तसतसे या बसेसची संख्या वाढली. १९६० च्या दशकात या डबल डेकर बसची संख्या ९०० पर्यंत पोहोचली. तोपर्यंत ही बस मुंबईची नवी ओळख बनली होती.

डबल डेकर बस पर्यटक आणि स्थानिक दोघांमध्ये लोकप्रिय होते. क्षमतेसोबतच तिच्या उंचीमुळे प्रवाशांना मुंबईच्या दृश्यांचा आनंद घेता येत होता. विशेष: त्या काळी दक्षिण मुंबईमधील रस्ते शांत, कमी गर्दीचे आणि निसर्गरम्य होते. डबल डेकर बसच्या वरच्या डेक खुला असल्यामुळे तिथून आजूबाजूच्या दृश्य सहज दिसायचे. मुख्य करुन शहरातील वृद्ध मंडळी या बसच्या वरच्या भागात बसून आपल्या आठवणींना उजाळा देत असत.

हेही वाचा- विश्लेषण : एसी लोकलविरोधात रोष कशासाठी? सामान्य लोकलचा प्रवासी दुर्लक्षित?

मुंबईत या डबलडेकर बस कुठे धावत होत्या?

१९६० च्या दशकापर्यंत मुंबईतील २६ मार्गांवर या बसेस धावल्या. पर्यटक आणि मुंबईकरांमध्ये संध्याकाळच्या प्रवासासाठी या बसेस अधिक लोकप्रिय होत्या. उपनगरात शेवटच्या टोकांपर्यंत या बसेसनी आपली सेवा दिली आहे. उपनगरातील सर्वात लोकप्रिय मार्गांपैकी एक म्हणजे सांताक्रूझ स्टेशन ते जुहू चर्च. कारण येथे वाहतूकीसाठी बसशिवाय दुसरा पर्यार नव्हता. ऑटो-रिक्षा १९७० च्या दशकात उपनगरात आल्या होत्या.

बसेसची नावे सुरुवातीला इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांवर ठेवण्यात आली होती, परंतु त्यांची मागणी वाढत गेल्याने आणि शहराचा विस्तार झाल्यामुळे त्यांची नावे क्रमांकासह ठेवण्यात आली. लोकप्रिय मार्ग ‘C’ हा मार्ग १२३ बनला. ही बस कुलाबा आणि तारदेव येथील आरसी चर्च दरम्यान धावायची. कुलाबा कॉजवे, रीगल सिनेमा, फ्लोरा फाउंटन, मरीन ड्राइव्ह आणि गिरगाव चौपाटीच्या पुढे ही बस जात असे. आणखी एक लोकप्रिय मार्ग १३०. यामध्ये फोर्ट मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, पायधोनी या भागांचा समावेश होता. तसेच शहरातील काही नाइटलाइफ भागांचाही यात समावेश होता.

बेस्टने या डबलडेकर बसना टप्प्याटप्प्याने सेवेतून बाहेर का काढले?

बेस्टने या बसेस टप्प्याटप्प्याने बंद करण्यास सुरुवात केली. कारण या बसचे सुटे भाग सहज उपलब्ध होत नव्हते. तसेच ते भाग मिळाले तरी अधिक महाग होते. त्यांच्या वजनामुळे वाहतूक करणे कठीण होते. डबल डेकर बसचे इंधन गळणारे आहे आणि ते आर्थिकदृष्ट्या महाग असल्याचा युक्तिवाद देखील करण्यात आला होता.

ब्रिटीश राजवटीत या बसेसेची निर्मिती झाल्यामुळे या सर्व बसेस डेमलर, एईसी (असोसिएटेड इक्विपमेंट कंपनी) आणि लेलँड मोटर्स सारख्या परदेशी उत्पादकांकडून पुरवल्या जात होत्या. १९५५ पर्यंत अशोक लेलँड या भारतीय कंपनीने त्यांचे उत्पादन सुरू केले. डबल डेकर बस चालवण्यासाठी टॉप डेकसाठी अतिरिक्त कंडक्टरसह अधिक कर्मचारी आवश्यक असल्याचे बेस्टकडून स्पष्ट करण्यात आले होते.

हेही वाचा- विश्लेषण : शिवस्मारकाचे झाले काय? हा प्रकल्प अजूनही प्रलंबित का?

बेस्टकडे सध्या किती बसेस आहेत?

बेस्टकडे सध्या ४०० सिंगल-डेकर इलेक्ट्रिक बस आणि ४८ नॉन-एसी डबल-डेकर आहेत. ज्या मुंबईतील १६ मार्गांवर कार्यरत आहेत. तथापि, गेल्या काही वर्षांत त्यांची संख्या कमी होत गेली आणि सध्या बेस्टच्या ताफ्यात आता फक्त ४८ डबलडेकर बस उरल्या आहेत. सध्या बेस्टच्या ताफ्यात ३,३७७ बस आहेत, त्यापैकी १,५,२४ बस ओला भाडेतत्त्वावर आहेत. परंतु या ९०० डबलडेकर बसेसची भर पडल्याने ओला भाडेतत्त्वावरील बसची संख्या २,४२४ होईल. जी एकूण ताफ्याच्या ५० टक्क्यांहून अधिक आहे.

नवीन एसी डबल डेकर बसमध्ये काय वेगळेपण आहे?

नवीन डबलडेकर बस पर्यावरणपूरक आणि वातानुकुलीत आहेत. बेस्टने त्यांना भाडेत्तवावर घेतले आहे. बेस्टकडून बस ऑपरेटरला प्रति किलोमीटर ५६.४० रुपये दिले जाणार आहेत. डबल डेकरची क्षमता प्रति बस ७८-९० प्रवासी असेल. नवीन बसेसमध्ये स्वयंचलित दरवाजे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि बसमधील दोन कंडक्टरमधील संवादासाठी विशेष व्यवस्था असेल. या इलेक्ट्रीक बसमध्ये पुढून आणि मागून दोन जीने आहेत. त्यामुळे प्रवाशांना चढ-उतार करणे अधिक सोप होणार आहे. गर्दीच्या वेळी याचा फायदा होईल. त्याशिवाय बसमध्ये सीसीटीव्हीदेखील लावण्यात आले आहेत. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली नवीन एसी डबल डेकर बस भारत-VI श्रेणीची आहे. पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसच्या काही चाचण्याही केल्या जाणार आहेत. त्यामुळे सप्टेंबरपासून त्या मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील.