कोविड महामारी अचानक आली, वेगाने पसरली आणि जगभरातील लाखो लोकांचा या संसर्गजन्य आजाराने बळी घेतला. तेव्हापासून लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. असे म्हणणे योग्य राहील की, बहुतेक लोक भविष्यात मोठ्या संसर्गजन्य रोगाच्या उद्भवण्याबद्दल चिंताग्रस्त आहेत. ते विषाणू, जीवाणू, बुरशी किंवा परजीवी काहीही असू शकतात. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांना सर्वात जास्त चिंता निर्माण करणारे तीन संसर्गजन्य रोग सांगितले आहेत, ते म्हणजे मलेरिया, एचआयव्ही आणि क्षयरोग. या आजारांमुळे दरवर्षी सुमारे दोन दशलक्ष लोक मारले जातात. मात्र, आता वैज्ञानिकांनी ज्या आजाराविषयी चिंता व्यक्त केली आहे, तो आजार आहे बर्ड फ्लू. या आजाराचे संकट संपूर्ण जगासमोर आहे. एवियन इन्फ्लूएंजा बर्ड फ्लू आता पक्ष्यांपर्यंत मर्यादित राहिला नसून जनावरे आणि माणसांनाही संक्रमित करत आहे. या उद्रेकामागील कारण काय? हे संकट जागासाठी किती मोठे? यामुळे महामारीसारखी परिस्थिती निर्माण होणार का? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बर्ड फ्लू

इन्फ्लूएंझा विषाणू सध्या मोठ्या चिंतेचे कारण ठरत आहे आणि २०२५ मध्ये यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकते, असे सांगितले जात आहे. हा इन्फ्लूएंझा ए उपप्रकार H5N1 आहे, ज्याला बर्ड फ्लू म्हणूनही संबोधले जाते. हा विषाणू कुक्कुटपालनासारख्या जंगली आणि पाळीव पक्ष्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरतो. अलीकडे, अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये दुग्धजन्य गुरांना या विषाणूचे संक्रमण झाले आहे आणि मंगोलियातील घोड्यांनाही या विषाणूची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा पक्ष्यांसारख्या प्राण्यांमध्ये इन्फ्लूएंझा प्रकरणे वाढू लागतात, तेव्हा नेहमीच काळजी असते की त्याचा परिणाम माणसांवरही होऊ शकतो. खरंच, बर्ड फ्लूचा संसर्ग मानवांना होऊ शकतो का, असा प्रश्न निर्माण झाल्यास हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, या वर्षी अमेरिकेमध्ये ६२ प्रकरणे आधीच आढळून आली आहेत, ज्यात बहुतेक संक्रमित गुरांच्या संपर्कात आल्याने आणि कच्चे दूध पिणाऱ्या लोकांना याची लागण झाल्याचे स्पष्ट आहे. मागील दोन वर्षांत अमेरिकेतील केवळ दोन प्रकरणांच्या तुलनेत ही बरीच मोठी वाढ आहे. मानवी संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूच्या ३० टक्के दरासह, बर्ड फ्लू सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या प्राधान्यांच्या यादीत झपाट्याने वरच्या स्थानावर जात आहे.

हेही वाचा : तुम्हीही इंजेक्शनला घाबरता? आता सुईशिवाय मिळणार इंजेक्शन; काय आहे वेदनारहित शॉक सिरिंज?

सुदैवाने, H5N1 बर्ड फ्लू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारित होताना दिसत नाही, ज्यामुळे मानवांमध्ये साथीचा रोग होण्याची शक्यता खूप कमी होते. इन्फ्लूएंझा विषाणूंना पेशींच्या बाहेरील बाजूस असलेल्या सियालिक रिसेप्टर्स नावाच्या आण्विक संरचनांशी जोडणे आवश्यक असते; ज्यामुळे ते आत जाण्यास आणि प्रतिकृती तयार करण्यास सुरुवात करतात. फ्लूचे विषाणू मानवांसाठी अत्यंत अनुकूल आहेत, ते या सियालिक रिसेप्टर्सना चांगल्या प्रकारे ओळखतात; ज्यामुळे त्यांना आपल्या पेशींमध्ये प्रवेश करणे सोपे होते, ज्यामुळे त्यांचा मानवांमध्ये प्रसार होण्यास हातभार लागतो. दुसरीकडे बर्ड फ्लू बर्ड सियालिक रिसेप्टर्सशी अत्यंत जुळवून घेतो आणि माणसांना ‘बाइंडिंग’ (संलग्न) करताना काही विसंगती असतात, त्यामुळे सध्याच्या स्वरूपात, H5N1 मानवांमध्ये सहज पसरू शकत नाही.

वैज्ञानिकांनी ज्या आजाराविषयी चिंता व्यक्त केली आहे, तो आजार आहे बर्ड फ्लू. (छायाचित्र-रॉयटर्स)

परंतु, अलीकडील अभ्यासात असे दिसून आले आहे की, फ्लू जीनोममधील एकच उत्परिवर्तन H5N1 मानवाकडून मानवामध्ये पसरण्यास पारंगत ठरवू शकते, ज्यामुळे साथीच्या रोगाची सुरुवात होऊ शकते. जर बर्ड फ्लू मानवांमध्ये प्रसारित होऊ शकला तर सरकारांनी प्रसार नियंत्रित करण्यासाठी त्वरीत कार्य केले पाहिजे. जगभरातील रोग नियंत्रण केंद्रांनी बर्ड फ्लू आणि क्षितिजावर असलेल्या इतर रोगांसाठी साथीच्या तयारीच्या योजना तयार केल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, २०२५ मध्ये त्या जोखमीच्या तयारीसाठी, ब्रिटनने H5 लसीचे पाच दशलक्ष डोस विकत घेतले आहेत, जे बर्ड फ्लूपासून संरक्षण करू शकतात. मानवांमध्ये पसरण्याची संभाव्य क्षमता नसतानाही, बर्ड फ्लूचा प्राण्यांच्या आरोग्यावर अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. यात केवळ मोठ्या प्राण्यांच्या कल्याणावर परिणाम होत नाही तर अन्न पुरवठ्यात व्यत्यय आणण्याची आणि आर्थिक परिणामदेखील होण्याची शक्यता असते.

प्राणी आणि पर्यावरणाचे रक्षण

मनुष्य, प्राणी आणि पर्यावरण एकमेकांशी जुळलेले घटक आहेत. आरोग्याकडे एकमेकांशी जोडलेले घटक म्हणून पाहणे, सर्वांचे एकमेकांवर समान महत्त्व आणि प्रभाव आहे. आपल्या वातावरणातील आणि आपल्या सभोवतालच्या प्राण्यांमधील रोग समजून घेऊन आणि प्रतिबंधित करून, त्याचप्रमाणे मानवांमधील संसर्गजन्य रोगांचे सर्वेक्षण करून आणि त्यात व्यत्यय आणून, आपण आपल्या प्राण्यांचे आणि पर्यावरणाच्या आरोग्याचेही रक्षण करू शकतो. परंतु, मलेरिया, एचआयव्ही, क्षयरोग आणि इतर रोगजनकांमुळे माणसांमध्ये सतत या आजारांची भीती असते.

हेही वाचा : क्रेडिट कार्ड बिल न भरल्यास काय होणार? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात काय?

बर्ड फ्लू संसर्ग चिकन, मोर, टर्की अशा पक्ष्यांमुळे अधिक पसरतो. माणसांना या विषाणूचे संक्रमण झाल्यास ताप, सर्दी, घशात सूज येणे, पोटात जंत होणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. डोळे, कान, नाक आणि तोंडाद्वारे या विषाणूचे संक्रमण होऊ शकते. संक्रमित पक्षी असलेल्या ठिकाणी श्वास घेतल्यास, कच्चे दूध, चिकन खाल्ल्यास, पोल्ट्री फर्ममध्ये काम करणाऱ्या व्यक्तीस या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. माणसांमध्ये यांची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत, त्यामुळे २०२५ मध्ये हा विषाणू मोठे संकट निर्माण करू शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.