पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (पीएमएमएल) सदस्याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते व खासदार राहुल गांधी यांना जवाहरलाल नेहरूंशी संबंधित दानाबाबतची कागदपत्रे परत करण्यासाठी म्हणून पत्र लिहिले आहे. ही कागदपत्रे २००८ मध्ये सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार काढून टाकण्यात आली होती. भारतीय जनता पार्टी (भाजपा) या पत्रांच्या मुद्द्याचा वापर करत काँग्रेसवर जोरदार टीका करताना दिसत आहे. नेहरूंनी लिहिलेल्या पत्रांमध्ये एडविना माउंटबॅटन, अल्बर्ट आइन्स्टाईन, अरुणा असफ अली व जयप्रकाश नारायण यांच्यासह अनेकांच्या पत्रव्यवहाराचा समावेश होता, असे सांगत गांधी कुटुंबीयांवर टीका सुरू आहे. नेमके हे प्रकरण काय? या पत्रांमध्ये नक्की दडलंय तरी काय? त्याविषयी जाणून घेऊ.

पीएमएमएल सदस्याचे राहुल गांधींना पत्र

अहमदाबादस्थित इतिहासकार रिजवान कादरी यांनी राहुल गांधींना पत्र लिहून भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू यांच्याशी संबंधित ही महत्त्वपूर्ण कागदपत्रे परत करण्यासाठी मदत मागितली आहे. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, कादरी म्हणाले की, या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) आता पीएमएमएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेहरू मेमोरियल म्युझियम अॅण्ड लायब्ररी (एनएमएमएल) सोसायटीने या विषयावर चर्चा केली होती. सप्टेंबरमध्ये कादरी यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून कागदपत्रे परत करण्याची विनंती केली होती. ‘सीएनएन-न्यूज १८’शी बोलताना, इतिहासकार कादरी म्हणाले, “९ सप्टेंबर रोजी मी सोनिया गांधींना पत्र लिहिले आणि आता पुन्हा मी राहुल गांधींना पत्र लिहिले आहे.”

Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Opposition leaders hold protest in the Parliament complex over Adani issue
Priyanka Gandhi : ‘मोदी-अदाणी भाई भाई’ असं लिहिलेली बॅग घेऊन प्रियांका गांधी पोहचल्या संसदेत, राहुल गांधी म्हणाले, “क्यूट..”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Harshvarrdhan Patil Meets Devendra Fadnavis
Harshvarrdhan Patil: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन; चर्चांना उधाण

हेही वाचा : २०२५ मध्ये ‘या’ देशांतील प्रवासाचे नियम बदलणार; याचा भारतीयांवर काय परिणाम होणार?

“पत्रात मी राहुल गांधींना विनंती केली आहे आणि नमूद केले आहे की, २००८ मध्ये सोनिया गांधींच्या सांगण्यावरून जे काही संग्रह मागे घेण्यात आले होते, ते परत केले जावेत.” कादरी यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात, “वैयक्तिक कागदपत्रे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ५१ कार्टन्स एका दशकापूर्वी सोनिया गांधींना पाठविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जयप्रकाश नारायण, पद्मजा नायडू, एडविना माउंटबॅटन, अल्बर्ट आइन्स्टाईन, अरुणा असफ अली, विजया लक्ष्मी पंडित, बाबू जगजीवन राम व गोविंद बल्लभ पंत यांसारख्या व्यक्तिमत्त्वांशी संबंधित पत्रांचा समावेश होता,” असे म्हटले आहे. कादरी यांनी ‘एएनआय’ला, सप्टेंबरमध्ये माजी काँग्रेस अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी कागदपत्रे परत करण्याची किंवा त्या कागदपत्रांची प्रत मिळावी, अशी विनंती केली होती. त्यामुळे आम्हाला त्यांचा अभ्यास करता येईल आणि विविध विद्वानांच्या संशोधनाची सोय होईल,” असे सांगितले.

भाजपाचा काँग्रेसवर हल्ला

भाजपाने गांधी कुटुंबाला नेहरूंसंबंधित कागदपत्रे पीएमएमएलला परत करण्यास सांगितले आहे. भाजपा खासदार संबित पात्रा यांनी ट्विटमध्ये लिहिले, “पंतप्रधानांचे संग्रहालय व ग्रंथालय आणि पूर्वीचे नेहरू संग्रहालय व ग्रंथालय यांतील नेहरूंनी एडविना माऊंटबॅटन यांच्यासह विविध व्यक्तिमत्त्वांना लिहिलेल्या पत्रांची ५१ कार्टन तत्कालीन यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काढून घेतली होती. नुकत्याच पार पडलेल्या ‘पीएमएमएल’च्या एजीएम सदस्यांपैकी एक रिझवान कादरी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र लिहून त्यांची आई सोनिया गांधी यांची काढून घेतलेली पत्रे परत मिळवून देण्यासाठी मदत मागितली आहे.” भाजपाचे अमित मालवीय यांनी अशीच टिप्पणी केली आणि नेहरूंच्या एडविना माउंटबॅटन यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहारावर प्रश्न उपस्थित केला. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सोमवारी (१६ डिसेंबर) लोकसभेत सांगितले की, पत्रे परत करण्याच्या मागणीवर कारवाई केली जाऊ शकते.

एडविना माउंटबॅटन आणि नेहरूंचे संबंध

जवाहरलाल नेहरू यांनी लेडी एडविना माउंटबॅटन आणि त्यांचे पती भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड लुई माउंटबॅटन यांच्याशी वैयक्तिक संबंध सामायिक केले. एडविना आणि लॉर्ड लुई माउंटबॅटन यांच्या कन्या पामेला हिक्स यांनी ‘डॉटर ऑफ एम्पायर : लाइफ ॲज ए माउंटबॅटन’ या शीर्षकाच्या पुस्तकात लिहिले आहे की, तिची आई आणि नेहरू यांच्यात ‘गहन नाते’ आहे. मे १९४७ मध्ये नेहरूंना व्हाईसरॉय माउंटबॅटन आणि एडविना यांनी अनौपचारिक सुट्यांसाठी शिमला येथील माशोब्रा येथे आमंत्रित केले होते.

जवाहरलाल नेहरू यांनी लेडी एडविना माउंटबॅटन आणि त्यांचे पती भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड लुई माउंटबॅटन यांच्याशी वैयक्तिक संबंध सामायिक केले. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

ॲलेक्स वॉन टुन्झेलमन यांनी त्यांच्या २००७ च्या ‘इंडियन समर’ या पुस्तकात लिहिले, “जवाहरलाल नेहरू डिकी (लॉर्ड माउंटबॅटन) आणि एडविना यांच्याबरोबर बाग असलेल्या छतावर आणि वरच्या डोंगराळ मार्गांवर फिरत होते. तेथून पुढील डोंगरावर असणारी लॉर्ड किचनरची पूर्वीची हवेली ‘वाइल्डफ्लॉवर हॉल’ची झलक पाहिली जाऊ शकत होती. एकेकाळी तरुण असले तरी नेहरू साधी राहणी असलेली व्यक्ती होती; मात्र ते कधीही प्रतिकार करू शकत नसणाऱ्या दोन गोष्टी होत्या आणि त्या म्हणजे पर्वतीय दृश्यांचे चैतन्य व एका मनोरंजक स्त्रीचा सहवास. माशोब्रा येथे त्यांच्याडे दोन्ही होते. ते आनंदाने डिकी आणि एडविना यांना उतारावर चालत जाण्यास शिकवत होते.”

मात्र, दोन्ही नेत्यांची ही केवळ अनौपचारिक भेट नव्हती. ही पहिलीच वेळ होती जेव्हा माउंटबॅटन यांनी नेहरूंना सत्ता हस्तांतराची योजना दाखवली; ज्यामुळे भारतीय नेते संतप्त झाले, असे ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. टुन्झेलमन यांनी या घटनेबद्दल आपल्या पुस्तकात लिहिले आहे, “डिकी यांनी नियम तोडून आणि कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून रात्रीच्या जेवणानंतर त्यांच्या नवीन मित्राला (जवाहरलाल नेहरू) गुप्त योजनेची एक प्रत दाखवली. पण जेव्हा जवाहर यांनी ती गुप्त कागदपत्रे वाचली तेव्हा त्यांना धक्का बसला आणि ते क्रोधित झाले.” माउंटबॅटन यांनी नेहरूंचे विचार लक्षात घेतले आणि योजनेला स्वीकारण्यायोग्य आकार दिला, जेथे एडविना यांनी प्रस्तावातील काही सुधारणांची भरपाई करण्यासाठी नेहरूंकडून सवलत मिळविली”.

१९४८ मध्ये महात्मा गांधींच्या हत्येनंतर नेहरू आणि एडविना यांच्यात जवळचे नाते निर्माण झाले. “गांधींच्या हत्येनंतर एडविना यांचा जवाहरांना मोठा भावनिक आधार होता. मला खात्री नाही की त्यांनी आपल्या पत्नीचा् अशा प्रकारचा सहवास अनुभवला असेल,” असे ‘द लास्ट व्हाइसरीन’चे लेखक रिआनॉन जेनकिन्स त्सांग यांनी २०१७ मध्ये ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. माउंटबॅटन्स यांची मुलगी लेडी पामेला हिक्स यांनी २०१२ च्या ‘डॉटर ऑफ एम्पायर’ या पुस्तकात नेहरू आणि त्यांच्या आईचे नाते ‘आत्मा आणि बुद्धीच्या समानतेवर’ आधारित असल्याचे सांगितले. ‘पीटीआय’नुसार त्यांनी पुस्तकात म्हटले आहे की, नेहरूंनी त्यांच्या आईला लिहिलेली पत्रे वाचल्यानंतर लेखिकेला जाणवले की, त्यांचे आणि माझ्या आईचे एकमेकांवर किती प्रेम आणि आदर आहे”.

हेही वाचा : एलियन की शत्रू राष्ट्रांचा धोका? रहस्यमयी ड्रोन्समुळे अमेरिकेत खळबळ; नेमकं प्रकरण काय?

१९६० मध्ये बोर्निओमध्ये एडविना यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या बेडसाइड टेबलावर पत्रांचा मोठा ढीग सापडला. ती सर्व पत्रे जवाहरलाल नेहरूंची होती, असेही ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. “जेव्हा एडविना यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून त्यांना समुद्रात विलीन करण्यात आले. जवाहर नेहरूंनी त्यांना घेऊन जाणाऱ्या जहाजाबरोबर आणि समुद्रावर झेंडूंच्या फुलांचा पुष्पहार अर्पण करण्यासाठी भारतीय फ्रिगेट पाठवली,” असे जेनकिन्स त्सांग यांनी ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

Story img Loader