“सलमान खानने काळवीट मारलं आहे. त्याला सर्व प्रकरणांमधून दोषमुक्त करण्यात आलंय. त्याने काळवीटाची शिकार करुन खूप मोठी चूक केली आहे. आम्ही उघडपणे सांगतोय की पुढे आम्ही सलमानचा कार्यक्रम करणार. यामध्ये कोणतीच शंका नाहीय,” हा इशारा सलमानला दिलाय बिष्णोईने टोळीचा प्रमुख असणाऱ्या लॉरेन्स विष्णोईचा मानलेला भाऊ राजवीर सोपूने! यापूर्वी चार वर्षांआधीही लॉरेन्स बिष्णोईने सलमानला ठार मारण्याची धमकी दिलेली. जेव्हा सलमान जोधपूरला येईल तेव्हा त्याला ठार मारु असं लॉरेन्स म्हणालेला. लॉरेन्स सध्या तुरुंगामध्ये आहे. मात्र त्याची टोळी सक्रीय आहे. पाच जून २०२२ रोजी सलमानला पत्राद्वारे ‘सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करून टाकू’ अशी धमकी देण्यामागे बिष्णोई टोळीच असल्याचं मुंबई पोलिसांच्या तपासात उघड झालंय. सध्या बिष्णोई टोळीनं सलमानला काळवीट शिकार प्रकरणावरुन पुन्हा थेट धककावलं आहे. “तुम्हाला शब्द देतो, सलमानचा कार्यक्रम करु द्या, त्यानंतर आम्ही कोणालाही काहीही करणार नाही,” असं सोपूने म्हटलं आहे. सलमानला जीवे मारण्याची धमकीच सोपूने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली. पण बिष्णोई टोळीकडून सलमानला ज्या प्रकरणावरुन धमकी देण्यात आलीय ते नेमकं आहे तरी काय? बिष्णोई टोळीचं काळवीटांशी काय कनेक्शन आहे? याच साऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा केलेला हा प्रयत्न…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बिष्णोई टोळीने आता काय धमकी दिलीय?
सलमानचे वडील सलीम खान यांना ५ जून रोजी त्यांच्या घराच्या आवारामध्ये एक पत्र आढळून आले. या पत्रात त्यांना आणि त्यांचा मुलगा म्हणजेच अभिनेता सलमान खानला धमकी देण्यात आली होती. ‘सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करून टाकू’ असे या पत्रात लिहण्यात आले होते. हे पत्र वाचल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून ही धमकी देण्यामागे बिष्णोई टोळीच असल्याचा खुलासा झालाय. बिष्णोईचा सहकारी विक्रम बराडने तीन लोकांच्या माध्यमातून हे पत्र सलीम खान यांच्यापर्यंत पोहचवलं असल्याचं पंजाबमधील गायक, काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित तसेच मोक्का कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर फरार झालेला गुंड सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकालच्या चौकशीमधून समोर आलं आहे.
पत्र त्या तिघांनी पोहचवलं…
“तुरुंगामध्ये असणाऱ्या लॉरेन्स बिष्णोईने हे पत्र सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या नावे पाठवलं होतं. राजस्थानमधील जलोरी येथून बिष्णोई टोळीचे तीन जण मुंबईमध्ये आले होते. त्यांनीच हे पत्र सलीम खान यांच्यापर्यंत पोहचवलं. तसेच त्यांनी सौरभ महाकालचीही यावेळी भेट घेतली,” असं पोलिसांनी चौकशीदरम्यान समोर आल्याचं स्पष्ट केलंय. तसेच हे पत्र सलीम खान यांच्यापर्यंत पोहचवण्याचं काम करणारे तीन जण कोण आहेत याबद्दलची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागलीय.
सहा पथके पाठवण्यात आली
“त्यांचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत. त्यांना लवकरच आम्ही अटक करणार आहोत. या लोकांची ओळख पटल्यानंतर देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सहा तुकड्या पाठवण्यात आल्यात,” असंही पोलीस म्हणाले. गुरुवारी पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयात करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान सौरभला थेट सलमानच्या घरी पत्र कोणी ठेवलं यासंदर्भात विचारण्यात आलं.
विक्रम बराड कोण?
विक्रम बराड हा बिष्णोईचा सहकारी असून त्याच्यावर एक डझनहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. तो सध्या कॅनडामध्ये वास्तव्यास आहे. विक्रमजीत सिंह बराड असं त्याचं संपूर्ण नाव आहे. एकेकाळी विक्रम हा राजस्थानमधील कुप्रसिद्ध गँगस्टर आनंदपालचा सहकारी होती. मात्र आनंदपालला पोलिसांनी ठार केल्यानंतर तो बिष्णोई टोळीत सहभागी झाला. त्यातच आता पुन्हा काळवीट प्रकरणाचा उल्लेख करत सलमानला धमकावण्यात आलंय.
सलमानला नुकताच काळवीट प्रकरणात मिळालाय दिलासा
सलमान खान मुख्य आरोपी असणारं काळवीट प्रकरण हे २४ वर्षांपूर्वीचं आहे. नुकताच या प्रकरणामध्ये सलमानला एक मोठा दिलासा मिळालाय. सत्र न्यायालयात प्रलंबित असणारे सर्व अर्ज उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्यासाठी सलमानने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायलयाने सलमानच्या बाजूने निर्णय दिलाय. राजस्थान उच्च न्यायालयाने सलमानला याच वर्षी मार्च महिन्यामध्ये दिलासा देत कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेल्या सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात सलमान खानच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती.
हे काळवीट प्रकरण काय?
सप्टेंबर १९९८ मध्ये, सलमान राजस्थानच्या जोधपूरमध्ये सूरज बडजात्या यांच्या ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. यावेळी तो चित्रपटातील सहाय्यक अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीला गेला होता. तेथे संरक्षित प्राण्यांपैकी एक असणाऱ्या काळवीटाची शिकार त्याने केल्याचा आरोप लावण्यात आला. १-२ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन काळवीटांची शिकार केल्याचा सलमान खानवर आरोप आहे. यावेळी सलमानबरोबरच चित्रपटामधील इतर कलाकारही उपस्थित होते असा दावाही करण्यात आला. सलमानला शिकारीसाठी प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्याच्या सहकलाकारांवर होता. बिष्णोई समाजाच्या तक्रारीनंतर २ ऑक्टोबर १९९८ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सलमानला १२ ऑक्टोबर १९९८ रोजी अटक करण्यात आली होती.
अटक आणि सुटका…
काळवीट शिकारी सलमानला दोषी ठरवण्यात आले आहे. सलमानशिवाय इतर सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी सलमान खानला १२ ऑक्टोबर रोजी पहिली अटक झाली होती. पाच दिवसच्या तुरुंगवासानंतर १७ ऑक्टोबरला सलमानची जोधपूर तुरुंगातून जामिनावर सुटका झाली.
त्या रात्री नेमकं घडलं काय?
त्या रात्री सर्व आरोपी एका जिप्सी कारमध्ये होते आणि सलमान ती चालवत होता. काळवीटांचा एक कळप दिसताच सलमाने गोळ्या झाडून त्यांपैकी दोघांना ठार मारले, असा दावा सरकारी वकिलांनी केला. या प्रकरणात सलमान विरोधात पुरावे देखील आहेत, असे सरकारी वकिलांनी सुनावणीदरम्यान सांगितले होते.
सरकारी पक्षाने काय युक्तीवाद केला?
अभियोजन पक्षाच्या कथनात अनेक त्रुटी असून या प्रकरणातील आरोप सिद्ध करण्यात त्यांना अपयश आले आहे, असा दावा सलमानच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. तसेच सलमाननेच गोळीबार केल्याचा पुरावा सरकारी पक्षाकडे नसून सलमान आरोपी असल्याचं सिद्ध करता येत नसल्याचंही सलमानच्या वकिलांनी म्हटलेलं. या प्रकरणामध्ये दरवर्षी सुनावणीदरम्यान नवीन नवीन दावे केले जातात आणि सुनावणी पुढे जात असल्याने अद्यापही या प्रकरणी निकाल लागलेला नाही.
जबाब नोंदवताना सलमान काय म्हणाला?
सलमानने २७ जानेवारी २०१७ रोजी न्यायालयात त्याच्यावर असलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. सलमानला विचारण्यात आलेल्या ६५ प्रश्नांची उत्तरे देताना त्याने आपल्याला वन विभागाकडून या प्रकरणी मुद्दामहून गोवण्यात येत असल्याचे म्हटले होते. “मी निरपराध असून, माझ्यावर खोटा आरोप केला जात आहे,” असे सलमानने न्यायालयात म्हटले होते. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी वन विभाग आपल्याला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्याने म्हटले होते. सलमानचा जबाब नोंदवण्यात आला तेव्हा न्यायालयामध्ये अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम हेसुद्धा उपस्थित होते.
सलमान दोषी ठरला
२००६ मध्ये वन्य प्राणी कायद्यानुसार जोधपूर येथील भवद जवळ चिंकाराची शिकार केल्या प्रकरणी सलमानला एक वर्ष कारावास आणि ५००० रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. २०१८ मध्ये न्यायालयाने ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सलमान खानने काळवीट हत्या प्रकरणी दोषी ठरवत पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. सलमानला यासाठी २०१८ मध्ये दोन दिवस तुरुंगामध्ये रहावं लागलं होतं. दोन दिवसांचा कारावासानंतरच न्यायालयाने सलमानला जामीन मंजूर केला आणि तो मुंबईत परतला होता. या प्रकरणात सध्या तो जामीनावर बाहेर आहे.
२००३ ला म्हणाला बंदुकीचा परवाना हरवला नंतर म्हणाला…
फेब्रुवारी २०२१ मध्ये राजस्थान सरकारने सलमान खानविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सलमानने खोटं शपथपत्र दाखल केल्याचा दावा करत त्यावर शस्त्रांसंदर्भात खोटी माहिती दिल्याचं सरकारने म्हटलं होतं. यासंदर्भात २००३ मध्ये सलमान खानने जोधपूर सत्र न्यायालयात चुकीचे प्रतीज्ञापत्र दिल्याबद्दल न्यायालयाची माफी मागितली होती. ६ फेब्रुवारी रोजी जोधपूर सत्र न्यायालयात काळवीट हत्या प्रकरणी सुनावणी होणार होती. त्यावेळी सलमान खानने सुनावणीला वर्च्युअली उपस्थित राहण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्याची ही विनंती न्यायालयाकडून मंजूर करण्यात आली होती. आता सलमानच्या वकिलांनी सलमानने ८ ऑगस्ट २००८ रोजी चुकून चुकीचे प्रतिज्ञापत्र दिले असल्याचे म्हटले. या प्रकरणी २००३मध्ये सलमान खानने न्यायालयात त्याचे लायसन्स हरवल्याचे सांगितले होते. सलमानने वांद्रे पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार देखील दाखल केली होती. मात्र, सलमानचा शस्त्र परवाना हरवला नसून, नूतनीकरणासाठी पाठवण्यात आलेला असल्याची माहिती न्यायालयाला कळाली होती. त्यानंतर सरकारी वकील भवानीसिंग भाटी यांनी सलमानविरोधात न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. जोधपूर सत्र न्यायालयाने सरकारची ही याचिका फेटाळून लावली.
अनेक वर्षांपासून सुरु आहे प्रकरण
गेल्या काही वर्षांमध्ये या काळवीट प्रकरणात सलमानला बऱ्याच खटल्यांना सामोरे जावे लागले. काळवीटची शिकार करणे, बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे आणि शस्त्रास्त्रांचा गैरवापर अशा विविध कलमांखाली सलमान खानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजस्थान उच्च न्यायालयाने गेल्यावर्षी जुलैमध्ये सलमानची काळवीट शिकार प्रकरणातून निर्दोष सुटका केली होती. न्यायालयाने सलमान खानच्या परदेशवारीवर निर्बंध घातले होते. मात्र राजस्थान सरकारने याविरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सर्व याचिकांची आता लवकरच सुनावणी होणार आहे.
बिष्णोई समाजासाठी काळवीट एवढं महत्वाचं का?
बिष्णोई समाजाचा इतिहास अगदी १५ व्या शतकापासून उपलब्ध आहे. सध्याच्या राजस्थानमधील जोधपूर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अगदी मागील अनेक शतकांपासून हा समाज राहतो. या समाजामधील लोक निसर्गाला देव मानतात. अगदी पानं, फुलं, झाडांपासून प्राण्यांपर्यंत अनेक गोष्टींच्या संवर्धनासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यातही काळवीटाला त्यांच्याकडे फार महत्व आहे. याचं मुख्य कारण म्हणजे काळवीट हे त्यांच्या धर्मातील गुरु भवान जांम्बेश्वर किंवा जंम्बाजी यांचं रुप असल्याचं हा समाज मानतो. त्यामुळेच काळवीटांना त्रास देणं किंवा त्यांची हत्या करणं हा या समाजाच्या दृष्टीने सर्वात मोठा गुन्हा आहे. याच समाजाच्यावतीने सलमानविरोधात पहिल्यांदा या शिकार प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आलेली. त्यानंतर सरकारी पक्ष या प्रकरणात बाजू मांडत आहे.
यावरुनच मिळालंय समाजाला नाव…
गुरु भवान जांम्बेश्वर किंवा जंम्बाजी हे या समाजाचे आद्यगुरु मानले जातात. काहीजण बिष्णोई हा शब्द विष्णू शब्दावरुन आल्याचं सांगतात. तर काहीजण हा शब्द राजस्थानमधील स्थानिक भाषेनुसार बिश म्हणजेच वीस आणि नोई म्हणजेच नऊ यावरुन आल्याचं सांगतात. गुरु भवान जांम्बेश्वरांनी सांगितलेल्या २९ नियमांचं पालन करणारा समाज म्हणून या समाजाचं नाव बिष्णोई असं असल्याची एक मान्यता आहे. प्राण्यांच्या संवर्धानासाठी या समाजातील लोक अगदी स्वत:चा जीवही पणाला लावू शकतात.
१७०० जणांना पकडून दिलंय…
काळवीट हा वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षण प्राण्यांपैकी एक आहे. मात्र बिष्णोई समाजासाठी तो एखाद्या देवाप्रमाणे आहे. बिष्णोई ही जगातल्या काही मोजक्या समाजांपैकी आहे जे प्राणी, पक्षी आणि वनस्पतींनाही त्यांचे हक्क असल्याचं मानतात. निसर्ग आणि माणसाने एकत्र राहिलं पाहिजे यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. २०१६ च्या एका अहवालानुसार वन्यप्राण्यांसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये राजस्थानमध्ये झालेल्या एकूण अटकेंपैकी १७०० शिकारी आणि आरोपी या समाजाच्या पुढाकारामुळे पोलिसांच्या ताब्यात आले.
काळवीट शिकार प्रकरणाचा घटनाक्रम
२ ऑक्टोबर १९९८ – वनविभागाकडून तक्रार दाखल करण्यात आली.
एकूण ७ आरोपी –
सलमान, सैफ, सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू, दुष्यंत सिंग आणि दिनेश गावरे.
९ नोव्हेंबर २००० – न्यायालयाने तक्रारीची दखल घेतली.
१९ फेब्रुवारी २००६ – आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्यात आले.
२३ मार्च २०१३ – ट्रायल कोर्टाने सुधारणा आरोप निश्चित केले.
२३ मे २०१३ – मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुनावणीला सुरुवात फिर्यादी पक्षाने २८ साक्षीदारांची साक्ष नोंदवली.
१३ जानेवारी २०१७ – साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण.
२७ जानेवारी २०१७ – जबाब नोंदवण्यासाठी सर्व आरोपी न्यायालयात हजर झाले.
१३ सप्टेंबर २०१७ – फिर्यादी पक्षाकडून अखेरच्या युक्तिवादाला सुरुवात.
२८ ऑक्टोबर २०१७ – बचावपक्षाकडून अखेरच्या युक्तिवादाला सुरुवात.
२४ मार्च २०१८ – ट्रायल कोर्टातील युक्तिवाद संपला.
२८ मार्च २०१८ – ट्रायल कोर्टाने निर्णय राखून ठेवला.
५ एप्रिल २०१८ – सलमान खान दोषी, इतरांची निर्दोष मुक्तता.
११ फेब्रुवारी २०२१ – सलमानने खोटं प्रतिज्ञापत्र दिल्याचा राजस्थान सरकारची याचिका न्यायालयाने फेटाळली.
२१ मार्च २०२२ – सर्व खटल्यांची एकत्र सुनावणी करण्याचे राजस्थान उच्च न्यायालयाचे निर्देश.