अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळानंतर पुन्हा निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर डेमोक्रॅटिक तिकिटावर त्यांची जागा कोण घेऊ शकेल, याबाबत चर्चा सुरू झाली. राजकीय चर्चेत प्रसिद्ध झालेल्या नावांमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या नावाचाही समावेश होता. त्यांनी दोन कार्यकाळ राष्ट्राध्यक्षपद भूषवले आहे. त्यांचे नाव जरी उमेदवारीसाठी चर्चेत आले तरी ते पुन्हा निवडणूक लढवतील, हे शक्य नाही. कारण- अमेरिकेतील राज्यघटनेत केलेल्या २२ व्या दुरुस्तीनुसार दोन काळ राष्ट्राध्यक्षपद भूषविणारा नेता पुन्हा निवडणुकीला उभा राहू शकत नाही. विशेष म्हणजे या मर्यादा असूनही ओबामांसारख्या माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना उमेदवारी देण्याबाबत बोलले जात होते. आता डोनाल्ड ट्रम्पही निवडणुकीत उतरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत; ज्यांनी आधीच एक टर्म सेवा दिली आहे.

ऑगस्ट २०२० मध्ये पुन्हा निवडून देण्याचे आवाहन करताना ट्रम्प एका सभेत म्हणाले, “आम्ही आणखी चार वर्षांसाठी जिंकून येणार आहोत. आम्हाला चार वर्षांचा कालावधी पुन्हा मिळाला पाहिजे.” ट्रम्प २०१६ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत रशियाच्या कथित हस्तक्षेपाविषयीही बोलले होते; ज्याची सध्या एफबीआय चौकशी सुरू आहे. परंतु, अमेरिकेत केवळ आठ वर्षे सत्तेवर राहण्याचा नियम का आहे? अमेरिकी राज्यघटनेतील २२ वी दुरुस्ती काय आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

How is the President of the United States elected Why is voting indirect
अमेरिकेचे अध्यक्ष कसे निवडले जातात? मतदान अप्रत्यक्ष का असते? समसमान मते मिळाल्यास काय? 
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमचं धोरण…”
Sharad Pawar Ajit Pawar fb
Ajit Pawar : “शरद पवार राजकारणातून बाजूला झाल्यानंतर हा पठ्ठ्या…”, अजित पवारांचं सूचक वक्तव्य
What Ajit Pawar Said About MVA and Balasaheb Thackeray?
Ajit Pawar : अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत, “बाळासाहेब ठाकरे हयात असते तर महाविकास आघाडी..”
trump kamala harris
कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प, कोण अधिक श्रीमंत? कोणाची संपत्ती किती?
devendra fadnavis reaction on harshwardhan patil about join ncp sharad pawar group
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “आर. आर. आबा आता हयात नाहीत, पण एवढंच सांगतो की…”, देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांच्या दाव्यावर उत्तर!

हेही वाचा : हुकूमशहा किम जोंग उन सक्रिय; उत्तर कोरिया-दक्षिण कोरिया युद्धाच्या उंबरठ्यावर?

२२ वी दुरुस्ती आणि रुझवेल्ट प्रेसिडेन्सी

२७ फेब्रुवारी १९५१ रोजी मंजूर झालेल्या २२ व्या दुरुस्तीनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठी औपचारिक अशा दोन कार्यकाळांची मर्यादा स्थापित करण्यात आली. मुख्यत्वे फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांनी चार कार्यकाळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पद भूषविल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यांचा कार्यकाळ म्हणजे दुसरे महायुद्ध आणि महामंदीचा काळ होता. ऐतिहासिकदृष्ट्या अध्यक्ष किती वेळा पुन्हा निवडला जाऊ शकतो यावर मर्यादा नव्हती. जॉर्ज वॉशिंग्टन यांनी १७९६ मध्ये तिसर्‍यांदा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेत, एक आदर्श ठेवला आणि एक अनौपचारिक परंपरा स्थापित केली की, अध्यक्ष दोन कार्यकाळांपेक्षा जास्त काळ काम करू शकत नाही. त्यांच्या निर्णयामुळे कोणत्याही राष्ट्राध्यक्षासाठी दोन कार्यकाळांचा कालावधी पुरेसा असतो ही संकल्पना प्रस्थापित होण्यास मदत झाली.

२७ फेब्रुवारी १९५१ रोजी मंजूर झालेल्या २२ व्या दुरुस्तीनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठी औपचारिक अशा दोन कार्यकाळांची मर्यादा स्थापित करण्यात आली. (छायाचित्र-रॉयटर्स)

रुझवेल्ट यांनी १९४० मध्ये तिसरी आणि १९४४ मध्ये चौथी टर्म जिंकून नियम मोडेपर्यंत हा अलिखित नियम कायम होता. १९४५ साली रुझवेल्ट यांचा मृत्यू झाला. चौथ्या टर्मची शपथ घेतल्यानंतरच्या काही महिन्यांतच त्यांचा मृत्यू झाला आणि राष्ट्रीय चर्चेने जोर धरला. त्यांच्या मृत्यूनंतर लगेचच काँग्रेस (अमेरिकेतील संसद)मधील रिपब्लिकन पक्षाने भविष्यातील राष्ट्राध्यक्षांना केवळ दोन कार्यकाळ सेवा देण्याचा नियम असावा, अशी घटनादुरुस्ती करण्यासाठी दबाव आणला. अशा प्रकारे २२ वी घटनादुरुस्ती करण्यात आली; ज्यामध्ये अध्यक्षांना दोन वेळा निवडून आलेल्या मुदतीपर्यंत किंवा त्यांच्या उत्तराधिकाऱ्याद्वारे अध्यक्षपद स्वीकारल्यास जास्तीत जास्त १० वर्षांपर्यंत मर्यादित कार्यकाळ निश्चित करण्यात आला.

२२ व्या दुरुस्तीच्या प्रमुख तरतुदी

“कोणतीही व्यक्ती राष्ट्राध्यक्ष पदावर दोन पेक्षा जास्त वेळा निवडून येऊ शकत नाही. ज्या व्यक्तीने दोन वर्षे राष्ट्राध्यक्षपद धारण केले आहे किंवा राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले आहे किंवा जी व्यक्ती राष्ट्राध्यक्ष पदावर एकापेक्षा जास्त वेळा निवडून आली आहे, अशी कोणतीही व्यक्ती दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडली जाणार नाही. याचा अर्थ अध्यक्ष आठ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकतो. परंतु, जर उपाध्यक्ष किंवा दुसरा उत्तराधिकारी अध्यक्ष कार्यभार स्वीकारतो आणि पूर्ववर्तीच्या कार्यकाळाच्या दोन वर्षांहून अधिक काळ काम करतो, तर त्यांना आणखी एक पूर्ण टर्म कार्यभार स्वीकारण्याची परवानगी आहे. ही तरतूद सुनिश्चित करते की, कोणतीही व्यक्ती एकूण १० वर्षांपेक्षा जास्त काळ पदावर राहू शकत नाही. या दुरुस्तीमध्ये १९४५ मध्ये रुझवेल्ट यांच्यानंतर आलेल्या हॅरी एस. ट्रुमन यांना या नियमातून सूट देण्यात आली होती. त्यानुसार, ट्रुमन यांना नवीन नियमांनुसार आणखी एक पूर्ण मुदतीची मागणी करता आली असती. तरीही त्यांनी १९५२ मध्ये निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २०१७ ते २०२१ या कालावधीत केवळ एक टर्म सत्तेत राहिल्याने पुन्हा या पदासाठी पात्र ठरले आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

अमेरिकन अध्यक्षांना या दुरुस्तीचा फटका बसला का?

२२ व्या घटनादुरुस्तीने थेट प्रभावित झालेले पहिले अध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवर होते; ज्यांनी १९५३ ते १९६१ या कालावधीत दोन वेळा हे पद भूषवले. त्यांचा दुसरा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आयझेनहॉवर यांना पुन्हा निवडणूक लढविण्यास मनाई करण्यात आली. हे नवीन घटनात्मक निर्बंध अमलात आणले जाण्याचे पहिले उदाहरण होते. तेव्हापासून इतर अनेक राष्ट्राध्यक्षांवर या नियमांचा परिणाम झाला आहे. उदाहरणार्थ, १९६३ मध्ये जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येनंतर लिंडन बी. जॉन्सन यांनी पदभार स्वीकारला. जॉन्सन यांनी केनेडी यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरही त्यांना आणखी दोन पूर्ण मुदतीसाठी निवडणूक लढविण्याची परवानगी देण्यात आली.

जॉन्सन यांनी १९६४ मधील निवडणूक जिंकली; मात्र १९६८ च्या निवडणुकीसाठी पात्र असूनही त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. १९६८ मध्ये निवडून आलेले आणि १९७२ मध्ये पुन्हा निवडून आलेले रिचर्ड निक्सन यांनी त्यांची दुसरी टर्म पूर्ण केली असती, तर या दुरुस्तीचा त्यांच्यावरदेखील प्रभाव पडला असता. मात्र, वॉटरगेट घोटाळ्यामुळे त्यांनी १९७४ मध्ये राजीनामा दिला. निक्सन यांचे उत्तराधिकारी जेराल्ड फोर्ड यांनी निक्सन यांच्या कार्यकाळातील उर्वरित २९ महिने काम केले; ज्यामुळे ते २२ व्या दुरुस्तीअंतर्गत केवळ एक पूर्ण टर्म निवडणूक लढण्यास पात्र ठरले. फोर्ड यांनी १९७६ साली निवडणूक लढवली. परंतु, जिमी कार्टरकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. अगदी अलीकडे रोनाल्ड रेगन, बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू. बुश व बराक ओबामा यांसारखे अध्यक्ष २२ व्या दुरुस्तीमुळे दोन टर्मपर्यंत मर्यादित आहेत. या माजी राष्ट्राध्यक्षांच्या राजकीय मंचावर परतण्याच्या कल्पनेने काही मतदारांची उत्सुकता वाढवली असली तरी कायद्याने त्यांना तिसऱ्यांदा निवडणूक लढविण्यास प्रतिबंधित केले आहे.

दोन टर्म राष्ट्राध्यक्ष हे उपाध्यक्ष म्हणून निवडून येऊ शकतात का?

एकीकडे घटनात्मकदृष्ट्या बराक ओबामा यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या तिसऱ्या टर्मसाठी उभे राहता येत नाही. दुसरीकडे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २०१७ ते २०२१ या कालावधीत केवळ एक टर्म सत्तेत राहिल्याने पुन्हा या पदासाठी पात्र ठरले आहेत. २२ व्या दुरुस्तीचे निर्बंध केवळ त्या राष्ट्राध्यक्षांना लागू होतात; ज्यांनी यापूर्वी दोन टर्म्स पूर्ण केल्या आहेत. २२ व्या आणि १२ व्या दुरुस्तीच्या तरतुदीवरून आणखी एक कायदेशीर संदिग्धता उद्भवली आहे. १२ वी घटनादुरुस्ती म्हणते की, राष्ट्राध्यक्षपदासाठी घटनात्मकदृष्ट्या अपात्र असलेली कोणतीही व्यक्ती उपाध्यक्ष म्हणून निवडली जाऊ शकत नाही. परंतु, २२ वी घटनादुरुस्ती एखाद्या व्यक्तीला दोनपेक्षा जास्त वेळा राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्यास प्रतिबंधित करते. त्यामुळे ओबामांसारखी दोन टर्म राष्ट्राध्यक्ष राहिलेली व्यक्ती उपाध्यक्ष म्हणून निवडून येऊ शकते का आणि विद्यमान अध्यक्षाने राजीनामा दिल्यास, त्यांचा मृत्यू झाल्यास किंवा त्यांना पदावरून काढून टाकल्यास ते उत्तराधिकारी म्हणूनही अध्यक्षपदावर जाऊ शकतात का, यावर अनेक वादविवाद झाले आहेत.

हेही वाचा : भारत-कॅनडा बिघडलेल्या संबंधांमुळे तिथल्या भारतीय विद्यार्थ्यांचे काय होणार?

२२ वी घटनादुरुस्ती का आवश्यक?

२२ व्या घटनादुरुस्तीने नेतृत्वात होणारे बदल सुनिश्चित करून आणि कोणत्याही एका व्यक्तीला जास्त काळ सत्ता धारण करण्यापासून रोखून, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाला एक आकार दिला आहे. समर्थकांचा असा युक्तिवाद आहे की, हे बदल निरोगी लोकशाही, नवीन दृष्टिकोन सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहेत. मात्र, समीक्षक असेही सुचवतात की, दुरुस्ती लोकप्रिय नेत्यांना सेवा देण्यापासून प्रतिबंधित करून, एक प्रकारे मतदारांच्या निवडीवर प्रतिबंध आणते.

Story img Loader