केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने रविवारी (दि. १६ एप्रिल) आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांचे काका वाय. एस. भास्कर रेड्डी यांना अटक केली. चुलत भाऊ आणि माजी खासदार वाय. एस. विवेकानंद रेड्डी यांचा २०१९ मध्ये खून केल्याचा आरोप भास्कर रेड्डी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भास्कर रेड्डी हे माजी मुख्यमंत्री, दिवंगत नेते वाय. एस. राजशेखर यांचे चुलत भाऊ आहेत. ‘वायएसआर’ या नावाने प्रसिद्ध असलेले राजशेखर आंध्र प्रदेशच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते. २०१९ रोजी खून झालेले विवेकानंद हे राजशेखर यांचे सख्खे लहान भाऊ होते. कडपा जिल्ह्यातील पुलिवेंदुला येथील निवासस्थानी २०१९ साली विवेकानंद यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता.
भास्कर रेड्डी आणि त्यांचा मुलगा, कडपा लोकसभेचा खासदार अविनाश रेड्डी (दोघेही जगनमोहन यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षात आहेत) यांच्यावर विवेकानंद यांचा खून केल्याचा आरोप आहे. जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वातून खून झाल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे.
विवेकानंद खून प्रकरण
१५ मार्च २०१९ रोजी विवेकानंद आपल्या निवासस्थानी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्याचे दिसत होते. कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार केलेले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. पुलिवेंदुला येथून १९८९ आणि १९९४ असे दोनदा ते आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच कडपा लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा ते खासदार म्हणूनही निवडून आले होते. २००४ साली एकत्रित आंध्र प्रदेशच्या विधान परिषदेचेही ते सदस्य होते.
२०११ साली पुलिवेंदुला विधानसभेच्या पोटनिवडणुकीत वायएसआर यांच्या पत्नी आणि विद्यमान मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आई वायएसआर विजयालक्ष्मी यांच्या विरोधात विवेकानंद उभे राहिले होते. वहिनींविरोधात उभे राहिलेल्या विवेकानंद यांना त्या वेळी पराभवाचा सामना करावा लागला. २००९ साली माजी मुख्यमंत्री वायएसआर यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत अपघाती निधन झाले होते. त्यामुळे विजयालक्ष्मी यांच्यापाठी एक मोठी सहानुभूतीची लाट तयार झाली होती. त्या वेळी जगनमोहन यांनी काँग्रेसपासून फारकत घेत, स्वतःचा ‘वायएसआर काँग्रेस पार्टी’ (YSRCP) हा पक्ष स्थापन केला होता. कालांतराने विवेकानंद यांनीदेखील जगनमोहन यांच्या पक्षात उडी घेतली.
२०१७ साली झालेल्या विधान परिषद निवडणुकीत विवेकानंद यांचा पुन्हा एकदा पराभव झाला. या वेळी भास्कर रेड्डी आणि त्यांचा मुलगा अविनाश रेड्डी याने त्यांचा पराभव करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. २०१९ साली विवेकानंद यांचा खून झाला, त्या वेळी राज्यात तेलगु देसम पक्षाचे (TDP) चे सरकार होते. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली होती. तर YSRCP ने सीबीआयतर्फे तपास व्हावा, अशी मागणी लावून धरली. दोन्ही राजकीय पक्षांनी या हत्येवरून एकमेकांवर आरोप केले होते.
तपासामध्ये काय निष्पन्न झाले?
पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड विधान कायद्यांतर्गत कलम ३०२ (खून) नुसार गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात केली. जुलै २०२० मध्ये, राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २६ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिले आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर ३१ जानेवारी २०२२ रोजी पुरवणी आरोपपत्र जोडण्यात आले.
आंध्र प्रदेशमध्ये या खटल्याची निष्पक्ष सुनावणी होऊ शकत नाही, असे तथ्य समोर आल्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खटल्याची सुनावणी तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली. विवेकानंद यांची मुलगी सुनीथा रेड्डी आणि त्यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केल्यानंतर हा निर्णय देण्यात आला होता. मागच्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने नवीन एसआयटीची स्थापना करून या प्रकरणाचा तपास ३० एप्रिलच्या आधी पूर्ण करावा, असा आदेश दिल्यानंतर सीबीआयने वेगाने हालचाली केल्या.
खुनात कोण कोण आरोपी आहेत?
सीबीआयने या प्रकरणात २५० लोकांची साक्ष घेतली असून त्यांचे जबाब नोंदवले गेले आहेत. विवेकानंद यांच्या गाडीचा चालक आर. दस्तगीर याच्याकडून सीबीआयला महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. जो आता माफीचा साक्षीदार झाला असून भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम १६४ नुसार त्याचा जबाब कडपा जिल्ह्यातील प्रोद्दातूर येथील कनिष्ठ दिवाणी न्यायाधीशांसमोर नोंदविण्यात आला आहे.
कडपा जिल्ह्यातील राजकीय वर्चस्ववादाच्या लढाईतून भास्कर रेड्डी आणि त्यांचा मुलगा अविनाश रेड्डी यांनी विवेकानंद यांच्या खुनाचा कट रचला, असा आरोप सीबीआयने केला आहे. २०१७ च्या विधान परिषद निवडणुकीत विवेकानंद यांचा पराभव करूनदेखील ते पुन्हा कडपा जिल्ह्यात आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतील, या भीतीतून त्यांचा खून करण्यात आल्याचे सीबीआयकडून सांगण्यात येत आहे.
विवेकानंद यांचे नोकर असलेले वाय. गंगी रेड्डी, दस्तगीर आणि सुनील यादव हे अविनाश रेड्डी यांना विवेकानंद यांच्या हालचालीची बारीकसारीक माहिती पुरवीत होते. सीबीआयने अविनाश रेड्डी यांची आतापर्यंत तीन वेळा चौकशी केली आहे. पण आपण निर्दोष असल्याचा दावा अविनाशने वारंवार केला. विवेकानंद यांचा खून झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी अविनाश सर्वात आधी पोहोचला होता. विवेकानंद यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला, असे सांगून त्याने त्यांच्या जखमा लपविण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांनी सीबीआयला दिली.
या खून प्रकरणात अटक होणारी भास्कर रेड्डी ही पाचवी व्यक्ती आहे. त्यांना लवकरच सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर केले जाईल, अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यांच्यावर भादंवि कलम १२० ब (कट रचणे), कलम ३०२ (खून) आणि कलम २०१ (पुराव्यांशी छेडछाड आणि पुरावे नष्ट करणे) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१९ मध्ये, कडपा पोलिसांनी गंगी रेड्डी, विवेकानंद यांचा स्वीय सहायक क्रिष्णा रेड्डी आणि प्रकाश रेड्डी यांना अटक केली होती. त्यांच्यावर पुरावे नष्ट करणे आणि तपासाची दिशाभूल करणे, असे आरोप ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारी सीबीआयने अविनाश याचा सहकारी उदय रेड्डी यालादेखील ताब्यात घेतले आहे.